मुपीसाठी लेख : कृपया मदत करा

Submitted by खटासि खट on 22 March, 2013 - 12:11

लिखाणाचे निमित्त : लिहीण्याची खुमखुमी
उद्देश : मनोरंजन, विरंगुळा, वेळ जात नसणे
फायदे : मायबोलीवर (कु)प्रसिद्ध होणे
टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक

प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे. मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
कळावे
आपला नम्र

खट
--------------------------------------------------------------------------------------------------------------

साधारण पंधरा वर्षापूवीची गोष्ट. माझे लग्न होऊन नुकतीच सौ. घरी आली होती. सौ शीच लग्न झालं होतं त्यामुळे कृपया गोंधळ वाढवू नये. ( सौ माझ्याच घरी आली होती). तिची हौसमौज पुरवण्यात दिवस चांगले चालले होते. तिचा पहिलाच नोव्हेंबर असल्याने तो साजरा करण्यासाठी आम्ही दापोलीला पिकनिकला जाण्याचे ठरवले. आम्ही नुकतेच एक विमान खरेदी केले होते. सर्वांनी ठरवले कि विमानानेच जाऊ. माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) असे चौघे दापोलीस विमानातून कूच करते झालो. जाताना आम्ही वरंधा घाटातून जायचे ठरवले. त्या वेळी टोल नाका असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ठरले. रस्त्याने मीच विमान चालवत होतो. साठच्या पुढे वेग नको असे पिताश्रींनी बजावल्याने त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. हास्यविनोद करीत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत आम्ही दापोलीस पोहोचलो. जेवण वगैरे करून विमानाने कर्दे या गावी पोहोचलो. दिवसभर समुद्र्वर मजा केल्यावर अंधार पडायच्या आधी निघावे असे ठरले. कारण या आधी विमानाने कुठेच गेलेलो नसल्याने हेडलाईट आणि डीपर ( डिप्पर) चालतात किंवा नाही याबद्दल काहो कल्पना नव्हती.

जाताना ताम्हणी घाटातून जायचे ठरवले होते. ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. तरीही एका हाताने विमानाचे स्टियरींग सौ ला पकडायला सांगून मी खाली वाकून पाहीले तर काय, ब्रेकच्या खाली फूटबॉल आलेला ! आम्ही बीच वर व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन हे सगळे खेळ खेळल्यानंतर ते सगळं साहीत्य मागच्या सीट्खाली टाकलेलं. हा बॉल घरंगळ येऊन कधी ब्रेकखाली आला कळलंच नाही. जेव्हां बॉल काढला तेव्हां ब्रेक लागायला सुरूवात झाली. सगळ्यांच्या जिवात जीव आला.

आम्ही आता वर चढून जंगलात आलो होतो. आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते. आमचे विमान आणि आम्ही इतकेच काय ते हलत होतो. अंधार मी म्हणत होता. आणि इतक्यात रस्त्यावर काहीतरी चमकलं. पुन्हापुन्हा पाहील्यावर खात्रीच पटली. शंकाच नको. दोन डोळे होते ते. सर्वांची भीतीने गाळणच उडाली. अचानक कुठलं जनावर पुढ्यात येऊन ठाकलंय याची कल्पना नव्हती. मागच्या मागे जाणं धोक्याचं होतं. वळणं वेडीवाकडी होती आणि विमान रिर्व्हर्समधे चालवायची माहिती नव्हती. घरी गेल्यावर काशीहून तज्ञांना बोलावून शिकून घ्यायचा मनोमन निश्चय केला. पण सध्या वेळ मारून न्यावी लागणार होती.

पिताश्री मनाचा हिय्या करून खाली उतरले. ( आमच्यापुढे भविष्यकाळ होता तर पिताश्रींकडे भूतकाळ ). हेडलाईटच्या प्रकाशात चमकणा-या डोळ्यांकडे ते सावकाश जाऊ लागले. मला हेडलाईट बंद करायला लावला. जवळ गेल्यावर ते डोळे इकडे तिकडे पळू लागले. पिताश्रींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि जवळचा टॉर्च काढून त्यांच्यावर प्रकाशझोत सोडला. त्याबरोबर डोळे गायब झाले.

पिताश्री विजयी मुद्रेने परत आल्यावर विमानातील दोन्ही महिलांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहीले. पिताश्रींनी सांगितले आता घाबरायचं कारण नाही. पण कुठले जनावर होते हे विचारल्यावर पिताश्रींनी हसतच उत्तर दिले, तो एक मोठ्या आकाराचा उंदीर होता. हे ऐकताच मातोश्री आणि सौ किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही हसत सुटलो.

आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्ही खूप हसतो. पण त्याच वेळी जर खरंच एखादं मोठं जनावर असतं तर ? या विचाराने अंगावर शहारा येतो.

आपला नम्र
खटासि खट

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीयुत चिखल्या यांनी खोट्या ब्रह्मे [अर्थात चोराने ब्रम्हे असे लिहिलेले असल्यामुळे ते डुप्लिकेट आहेत हे जाणकारांना कळलेच असेल एव्हाना] चे पितळ उघडे पाडल्याबद्दल त्यांचे आभिनंदन व आभार.
धन्स श्रीयुत चिखल्या. Happy

कालचा माधवी कुंटेंचा लेख अपवाद होता. प्रत्येकाने वाचायला हवा.
आज पुन्हा शहाम्रुगाची राइड छापलीये Lol शनिवार असल्याने लेखाला फोडून काढलेलं दिसत नाही.

मला ना दिवस, तास, वर्षं काही कळत नाही. एकदा ना गंमतच झाली. मी एका पेट्रोल पंपावर एका सुंदर तरुणीचं रूप घेऊन उभी होते. तर एक लुनावाला माझ्याकडे डोळे फाडून पहायला लागला. म्हटलं, याची गंमतच करावी म्हणून लिफ्ट मागितली.. आता त्याचा लेख वाचला म्हणून लक्षात आलं. २२ वर्षं झाली का त्या घटनेला ? मला तर काल परवाच घडल्यासारखं वाटतंय. भोळं भाबडं ध्यान होतं बिच्चारं.

त्याची खूप टर उडवतात इथं. बिच्चा-याने एकाच मुलीला लिफ्ट दिल्याची "सत्य"कथा सांगितली. काही दोन डझन कथा नाही सांगितल्या इतकी टिंगल करायला.

परवाच मी इकडे आले, तर लगेच माझ्यासारखा आयडी तिकडे दिसला. हम्म. कळतंय हं सगळं. जरा या भूतपीठातले लेख लिहून झाले कि बघतेच एकेकाकडे. खास करून तो एक आयडी माझ्या मागे लागलाय त्याच्याकडे. हुं ! (फणकारा)

आता हिच्या मागे लागावं असं काही उरलं तरी आहे का हिच्यात?
हीच माझ्या मागे मागे फिरते.
मी हँडसम असल्याने माझ्या लूनावर कुणा मुलीला लिफ्ट दिली की ही तिला पझेस करते अन माझ्याकडून ४००० रुपये मागायला लावते. Wink

ज्या अजाण बालकांनी अजूनही समग्र लुब्र पुराण वाचले नाहीय त्यांसाठी हा ज्ञानाचा खजिना.. डुंबा, मनसोक्त डुंबा.. परंतु त्याचबरोबर इतर अभ्यासदेखिल करा..
http://www.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm

मुक्तपीठवरच्या प्रतीक्रिया भयाण विनोदी असतात हे मात्र खरे.

पुढे मुपी मध्ये लेख लिहीताना हे लोक आता १०० वेळा विचार करतील्.:फिदी:

लुनावाले ब्रह्मे,

तुम्ही लुना कधीच का सोडणार नाही याचं कारण मला माहितीये. तसं केलंत तर पुढची पायरी म्हणजे कायनेटिक घ्यावी लागेल. मग लुनावाले + कायनेटिक असा संकर होऊन लोक तुम्हाला लुनाटिक म्हणतील. अशा रीतीने नवीन गाडीचा खर्च माथी येईल, पण पदवी तीच राहील! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

कालचा माधवी कुंटेंचा लेख खरोखरच वेगळा होता. वाचून अंतर्मुख व्हायला झालं.
बाकी इथे फक्त ब्रह्मे च आले.पोतदार -पावस्कर मॅडम्,संग्राम ,सुमेध्,स्वाती टेके, स्वाती ठकार, बालमोहन (usa) आले असते तर अजून मजा आली असती. मूळ लेख व प्रतिक्रिया ही भारी .जिज्ञासूंनी लाभ घ्यावा - http://www.esakal.com/esakal/20100719/4711632484305432417.htm

<<<आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते.>>>
यापेक्षा आजूबाजूला 'झाडे लाल फळांची' व 'चिमण्या होत्या त्यावर' असं म्हटलेलं चालेल ना..

Lol

पूर्वी त्या सार्सेना इस्त्रायल मॅडम पण असायच्या. आताशा दिसत नाहीत.

अमेरिका आणि पुणे दोन्ही नसलं असतं तर ऑनलाईन सकाळ बंद पडला असता.

हे लिंक दिलेले मु.पी. वरचे लेख चौथ्या का काय म्हणतात त्या मितीत घडलेल्या गंभीर घटनांचे वृत्तांत आहेत. तिथे हे विलक्षण वैचारिक - गंभीर लिखाण म्हणून ओळखले जात असणार. आपण पामरांना त्यातले ज्ञान नसल्याने आपण विनोदी समजून हसत आहोत.

मुपीवर लेख लिहिणारे लोक सिरियसली लिहितात की मुद्दाम धमाल उडवून देण्यासाठी लिहितात? मी १-२च लेख वाचले आहेत आतापर्यंत, ते सुद्धा कुणीतरी माबोवरच लिंक्स दिल्यामुळे.

पण एकंदर माहौल पहाता मुपी नियमित वाचनात ठेवावे असं वाटू लागलं आहे. तब्बेत एकदम टकाटक राहील लेख आणि प्रतिसाद वाचून Wink

पण एकंदर माहौल पहाता मुपी नियमित वाचनात ठेवावे असं वाटू लागलं आहे. तब्बेत एकदम टकाटक राहील लेख आणि प्रतिसाद वाचून >>>> +१
:p

पण एकंदर माहौल पहाता मुपी नियमित वाचनात ठेवावे असं वाटू लागलं आहे. तब्बेत एकदम टकाटक राहील लेख आणि प्रतिसाद वाचून<<<अगदी अगदी.

मंडल आभारी आहे. आपले सल्ले आणि प्रतिसाद यांचा मी जरूर अभ्यास करून लेख लिहून पाठवीन. आशिर्वाद असू द्यावेत.

बेफिकीर हे कुणी महान व्यक्तिमत्व आहे का इथले ? त्यांचाही अभ्यास करून कळवतो.

http://www.esakal.com/esakal/20130323/5334762824676718348.htm

वरील लेखावर ज्या भयाण विनोदी प्रतीक्रिया आल्यात ते वाचुन हसताच येईना. डोळ्यात हसुन हसून एवढे पाणी आले की बस्स.:हहगलो:

खटासी खट तुमचा मुपी लेख भारी आहे, पण अजून रंगत वाढवता आली असती.:फिदी:

भारीच आहे हा.. हा लेखही आणि मुक्तपीठ ही.. Proud

तिथे लेख आणि पर्तिक्रिया कश्या टाकायच्या.. पैसे द्यावे लागतात की असाच "अंड्या" नावाचा आयडी बनवले की काम झाले..

ब्रह्मे आहेच पण पावसकर पोतदार मॅडम आयडीने पण भारी प्रतिक्रिया अस्तात.. Happy "आमच्या नाना वाड्यातल्या शाळेत .." Happy मागे ईथे माबो वर पण कोणीतरी (बहुदा पाभे) नी असाच एक मुपी स्टाईल लेख लिवला होता..

हा घ्या पावसकर बाईंचा लेख..

http://www.esakal.com/esakal/20130123/4732439127621725895.htm

Pages