मुपीसाठी लेख : कृपया मदत करा

Submitted by खटासि खट on 22 March, 2013 - 12:11

लिखाणाचे निमित्त : लिहीण्याची खुमखुमी
उद्देश : मनोरंजन, विरंगुळा, वेळ जात नसणे
फायदे : मायबोलीवर (कु)प्रसिद्ध होणे
टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक

प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे. मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
कळावे
आपला नम्र

खट
--------------------------------------------------------------------------------------------------------------

साधारण पंधरा वर्षापूवीची गोष्ट. माझे लग्न होऊन नुकतीच सौ. घरी आली होती. सौ शीच लग्न झालं होतं त्यामुळे कृपया गोंधळ वाढवू नये. ( सौ माझ्याच घरी आली होती). तिची हौसमौज पुरवण्यात दिवस चांगले चालले होते. तिचा पहिलाच नोव्हेंबर असल्याने तो साजरा करण्यासाठी आम्ही दापोलीला पिकनिकला जाण्याचे ठरवले. आम्ही नुकतेच एक विमान खरेदी केले होते. सर्वांनी ठरवले कि विमानानेच जाऊ. माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) असे चौघे दापोलीस विमानातून कूच करते झालो. जाताना आम्ही वरंधा घाटातून जायचे ठरवले. त्या वेळी टोल नाका असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ठरले. रस्त्याने मीच विमान चालवत होतो. साठच्या पुढे वेग नको असे पिताश्रींनी बजावल्याने त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. हास्यविनोद करीत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत आम्ही दापोलीस पोहोचलो. जेवण वगैरे करून विमानाने कर्दे या गावी पोहोचलो. दिवसभर समुद्र्वर मजा केल्यावर अंधार पडायच्या आधी निघावे असे ठरले. कारण या आधी विमानाने कुठेच गेलेलो नसल्याने हेडलाईट आणि डीपर ( डिप्पर) चालतात किंवा नाही याबद्दल काहो कल्पना नव्हती.

जाताना ताम्हणी घाटातून जायचे ठरवले होते. ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. तरीही एका हाताने विमानाचे स्टियरींग सौ ला पकडायला सांगून मी खाली वाकून पाहीले तर काय, ब्रेकच्या खाली फूटबॉल आलेला ! आम्ही बीच वर व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन हे सगळे खेळ खेळल्यानंतर ते सगळं साहीत्य मागच्या सीट्खाली टाकलेलं. हा बॉल घरंगळ येऊन कधी ब्रेकखाली आला कळलंच नाही. जेव्हां बॉल काढला तेव्हां ब्रेक लागायला सुरूवात झाली. सगळ्यांच्या जिवात जीव आला.

आम्ही आता वर चढून जंगलात आलो होतो. आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते. आमचे विमान आणि आम्ही इतकेच काय ते हलत होतो. अंधार मी म्हणत होता. आणि इतक्यात रस्त्यावर काहीतरी चमकलं. पुन्हापुन्हा पाहील्यावर खात्रीच पटली. शंकाच नको. दोन डोळे होते ते. सर्वांची भीतीने गाळणच उडाली. अचानक कुठलं जनावर पुढ्यात येऊन ठाकलंय याची कल्पना नव्हती. मागच्या मागे जाणं धोक्याचं होतं. वळणं वेडीवाकडी होती आणि विमान रिर्व्हर्समधे चालवायची माहिती नव्हती. घरी गेल्यावर काशीहून तज्ञांना बोलावून शिकून घ्यायचा मनोमन निश्चय केला. पण सध्या वेळ मारून न्यावी लागणार होती.

पिताश्री मनाचा हिय्या करून खाली उतरले. ( आमच्यापुढे भविष्यकाळ होता तर पिताश्रींकडे भूतकाळ ). हेडलाईटच्या प्रकाशात चमकणा-या डोळ्यांकडे ते सावकाश जाऊ लागले. मला हेडलाईट बंद करायला लावला. जवळ गेल्यावर ते डोळे इकडे तिकडे पळू लागले. पिताश्रींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि जवळचा टॉर्च काढून त्यांच्यावर प्रकाशझोत सोडला. त्याबरोबर डोळे गायब झाले.

पिताश्री विजयी मुद्रेने परत आल्यावर विमानातील दोन्ही महिलांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहीले. पिताश्रींनी सांगितले आता घाबरायचं कारण नाही. पण कुठले जनावर होते हे विचारल्यावर पिताश्रींनी हसतच उत्तर दिले, तो एक मोठ्या आकाराचा उंदीर होता. हे ऐकताच मातोश्री आणि सौ किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही हसत सुटलो.

आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्ही खूप हसतो. पण त्याच वेळी जर खरंच एखादं मोठं जनावर असतं तर ? या विचाराने अंगावर शहारा येतो.

आपला नम्र
खटासि खट

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स. दा. शहामृगे said:
मागे एकदा मी देखील शहामृग ride मारली होती , पण त्याच्या डोक्या वरची टोपी उडून गेली आणि त्याने मान मागे करून माझ्या डोक्यात जोरात चोच मारली तेंव्हा पासून मी निश्चय केला कि आता कुठल्याच पक्षाच्या पाठी वर बसायचे नाही ,कोंबडीच्या नाही..चिमणीच्या पण नाही भले मग ती अमेरिकन का असेना ..

>>>> Rofl

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=y5VVC

पोतदार-पावसकर मॅडम - मंगळवार, 3 सप्टेंबर 2013 - 12:51 PM IST

मारुत माझा नाना वाड्यातील शाळेचा विद्यार्थी. आमच्या नाना वाड्यातील शाळेतील वात्रटांच्या घोळक्यातील अतिशय आडदांड, निगरगट्ट आणि वांड. त्याला लहानपणापासुनच झुपकेदार मिशांची फार आवड. एकदा मी वर्गात काहीतरी तुटक-तुटक आणि असंबंध शिकवत असताना बर्याच विद्यार्थी-विद्यार्थिनींचा डोळा लागला होता. हा पठ्ठा मात्र समोरच्या बाकावर बसलेल्या मुलीच्या झुपकेदार वेणीवर करडी नजर ठेऊन बसला होता. अचानक मुलीची किंकाळी ऐकू आली आणि ती ओरडू लागली 'माझी वेणी कुठाय.. वेणी कुठाय..' मी तिथे जाउन बघते तर तिच्या वेणीचा झुप्काच गायब. मी इकडे-तिकडे बघितले तर फक्त मारुतराव जागा दिसला. त्याल बघून मला दरदरून घामच फुटला. एवढ्या कमी वयात त्याच्या ओठांवर झुपकेदार मिशा आलेल्या होत्या. मला जरा विचित्र वाटलं म्हणून मी त्याच्या मिशा ओढल्या तर तो कापलेल्या वेणीचा झुपका होता. एवढ्यात हेड सर दारात हजर..! त्यांनी मुलीची छाटलेली वेणी बघितली आणि मला प्रश्न केला कि तुम्ही वर्गात असताना हे झालेच कसे.? मी काही उत्तर देण्याच्या आत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि माझी बदली येरवड्यातील शाळेत केली.

चालणारी आमसुले
http://www.esakal.com/esakal/20130810/4791421851664957659.htm
याच्या कॉमेंटस भ यं क र आहेत.
यावरुन प्रेरणा घेऊन पावसाळ्यात घरात उडणार्‍या झुरळांना उडते खजूर म्हणण्याच्या विचारात आहे.

वाचलेलं आहे हे कुठेतरी. Lol
मुपी म्हणजे मुपीच. अन्य कशाला सर नाही यायची.
सकाळने बंद करून अन्याय केलाय चाहत्यांवर Sad

मुपीच्या (प्रतिसादात) गाजलेले लेख आणि प्रतिसाद काही परोपकारी व्यक्तींनी स्क्रीन शॉट्स काढून फेबुवर टाकले होते. ते पेज सापडलं तर शोधून टाकेन.

अतीव सुंदर लिखाण ज्याला म्हणतात.. ते हे नव्हे. दुपारचे जेवण झाल्यावर नाडी सैल करून लिहायला बसले असाल. तरीपण म्हणते कि वदनी जवळ घेता... एकंदर काय.. तर पुढील शिक्षण घेऊन आपण काय केले हे धूर्त वाचकांना विचारायचे आहे. असा लेख लिहिला आहे कि असे वाटते जणू चतुर पक्ष्यालाच बघत राहावे. आमच्या घराशेजारी उकिडवे काका राहतात. मी जेव्हा पण गाऊन घालून चाउमीन करत असे तेव्हा खिडकीतून उकिडवे काका व्हाव व्हाव असे आवाज काढत असत... हे शोभून नाही दिसायचा त्यांना... आणि मी तरी असे आवाज का म्हणून सहन करायचे? मी तशीच भूभूत्कार करत वाण्याकडे जाऊन बसायची. आम्ल आणि पित्त ह्यांचा समागम होता आमचा वाणी. रक्षणकर्ता मात्र मुकुंदा.. मी ह्या विचारात गिरकी घेऊन पुटपुट करायची "कधीतरी, कुठेतरी, कसेतरी थांबा" ...

मला किनई तुमच्या बरगड्यांवर मेंदी काढायची इच्छा होते आहे. बरगड्यांपासून सुरुवात करून गोल अशी पाठीवर आणि पाठीवरून खाली ओघळत नेमक्या ठिकाणी थांबवीन मी. अशी खेकड्यांची रांग काढायची मेंदीवर. हिरडीला लावायचा चुना आणि दात विचकायचे. एका हातात समई तर दुसऱ्या हातात फणस धरायचे. अश्या वेशात आणि अश्या अविर्भावात गेट वे ऑफ इंडिया समोर शांत उंध्ये राहायचे. तुमचे खूप गालगुच्चे घ्यायची इच्छा होते आहे.

सर, तुम्ही परत का आलाय ? Lol नेमके टार्गेट कोण आहे तुमचे ?
https://www.maayboli.com/node/70259#new हा उच्च शिक्षणाचा धागा. कि खट कि या पानावर आमची चर्चा चालू आहे म्हणून त्यातले एक ? Lol

बाबूच तो. जरी टक्कल पडलं, तेलकट चेहर्‍यामुळे मूळचा असलेला टॅन्ड रंग अजूनच किळसवाणा वाटू लागला तरी बायकी लिखाण काय सुरेख करायचा तो. बाबूचा संबंध असो कि नसो, इथल्या आयड्यांवर बाबू तुटून पडायचा आणि अशी हिरोगिरी करून प्रमुख स्त्री आयड्यांकडे कुत्र्याने मालकाकडे पहावे तशा थाटात शाबासकीसाठी पहायचा. मग त्याला हहगलो मिळाले कि खुशीत येऊन शेपूट हलवीत जायचा.

बाकी आयडी पुरूष काढला तरी बायकी वास जात नाही ते नाहीच. आमच्या वाड्यातल्या भोचककाकू चावटच होत्या. वय वाढेल तसा चावटपणा पण वाढत चाललेला. पण असा कसा चारचौघात चावटपणा करायचा ? मग कि नाही त्या मोठ मोठ्या लेखकांची नावे घालून वैचारीक लेख लिहायच्या. वैचारीकतेच्या आडून चावटपणा करायची ही ट्रीक इतकी बेमालूम जमली कि भोचककाकू राजरोस चावटपणा करू लागल्या. त्याचा साईड इफेक्ट असा झाला कि त्या स्वतःच स्वतःला विचारवंत समजू लागल्या. मूळच्या चावट काकूंचं ट्रान्सफॉर्मेशन झालं ते असं कायमचंच. आता चावट पणासाठी ड्युआयडी घेऊन फिरतात गावभर.

बाबूला सांगा काळजी घे. आता वय झालं. टक्कल, तेलकट गोल आणि उंचीच्या मानाने भला मोठा पसरट चेहरा, बेताच्या उंचीला सुटलेले पोट, बेढब आकार या सर्वांना स्त्री अवतार शोभत नाही आता. मासे पाळत रहा पण इन्पेक्टर नवर्‍याला घेऊन फिरू नकोस पुन्हा.

Pages