वर्षाविहार २०१३: संयोजक आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13

यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...

या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए नको नको कृष्णा. मेजॉरिटी लोक्स पुण्या मुंबईचे असतात. भलतीकडेच ववि केला तर सगळ्यांनाच येण्याजाण्याचा त्रास होईल आणि काही एन्जॉय करता येणार नाही.

भलतीकडेच ववि केला तर सगळ्यांनाच येण्याजाण्याचा त्रास होईल आणि काही एन्जॉय करता येणार नाही.>>>

मग वेगळे ठिकाण शोधा जरा! घाटाखाली किंवा वर! तेच तेच नको!

यंदाचा ववि केरळमधे करू या>>>

तो मे महिन्यात करावा लागेल

मायबोलीचा ववि म्हणजे सगळ्या ठिकाणच्या मायबोलीकरांना एकत्र भेटण्याची, त्यांच्या सहवासाची संधी असते. वविवेळी आपण टिशर्ट उपक्रम करून थोडीफार सामाजिक बांधिलकीही जपत असतो. पण ती केवळ आर्थिक मदत होते, प्रत्यक्ष सहभाग होत नाही. मायबोलीकर स्वत: श्रमदान/ वृक्षारोपण करू शकतील आणि त्यानंतर सालाबादमाणे वविचा आनंद यथेच्छ लुटू शकतील असं एखादं ठिकाण वविसाठी निवडलं तर मला स्वतःला फार आवडेल.

बाकी सहज सूचना म्हणजे प्रवासात खूप वेळ जाईल असं ठिकाण नको.
आणि अगदीच कमीत कमी खर्चातलं वविठिकाण नको, अश्या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असतो. बजेट वाढलं तरी हरकत नाही.

हाऊ अबाऊट रायगड किल्ला?

चालेल. एखादी थिम ठेवुन सुद्धा ववी करता येईल.
मग थिमला अनुसरुन कार्यक्रम वगैरे आयोजीत करता येईल.

आर्या Lol

रायगडावर रोपवेनेच जावं लागेल मग बजेट वाढेलच आपोआप... पुणे-मुंबई दोन्हीकडून पोचता येईल. धुक्यात हरवलेला रायगड बघून पाय निघणार नाहीत आणि मग पुढचा वविपण तिथेच होईल...
Proud

प्रत्येक वविला सुरुवात म्हणून थोड्या प्रमाणात का होईना वृक्षारोपणाचा कार्यक्रम करता येईल. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी हा उत्तम सामाजिक उपक्रम ठरू शकतो.

या प्रोजेक्टसंबंधी काही कल्पना इथे मिळू शकतील.
धन्यवाद!

ववि कब है....... कब है ववि??

थिम बेस्ड वविची कल्पना चांगली आहे.. (म्हणजे निसर्ग थिम असेल तर सगळ्यांनी हिरवे कपडे घालून यायचे का? :फिदी:)

. (म्हणजे निसर्ग थिम असेल तर सगळ्यांनी हिरवे कपडे घालून यायचे का? )
नशीब आत्ये, पालापाचोळा बांधुन यायचं नाहीम्हनालीस. Uhoh

यंदाचा ववि केरळमधे करू या>>> म ग मी ये णा र च ना ही आ जि बा त Angry
हे ठिकाण सुचवल्याबद्दल नंदिनीचा णिशेध Proud

(म्हणजे निसर्ग थिम असेल तर सगळ्यांनी हिरवे कपडे घालून यायचे का? )
नशीब आत्ये, पालापाचोळा बांधुन यायचं नाहीम्हनालीस.
>>
Rofl

वर्षाविहाराचे ठिकाण हे नेहमी मुंबई व पुणेकरांच्या सोयीने/सोयीसाठी ठरवले जाते हे अजिबात आवडत नाही. इतर महाराष्ट्रातल्या मायबोलीकरांकरीता हे अत्यंत निराशाजनक असावे असे माझे मत आहे.

धन्यवाद.

कसार्‍याच्या जवळ एखादे ठेवल्यास मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगरकरांसाठी सोयीचे ठरेल...

ववित सांस्कृतिक समिती वगैरेचा अजिबातच समावेश असू नये. त्यांनी आयोजित केलेल खेळ उच्च आणि टिम बिल्डिगचे असतात ह्यात वादच नाही. पण वविला जाणे म्हणजे केवळ पाण्यात डुंबने ( ते ही एखाद्या वॉटर पार्कच्या), जेवण (अर्थात अतिशय महत्वाचा भाग Happy ) आणि नंतर सांस्कृतिक समितीने केलेला टेकओव्हर असे असू नये. ह्याने होते काय की आपण टीम बिल्ड नीट करतो पण टीम बिल्ड करायला आपण एक कंपनी नाही आहोत, ज्या आयडींना आपण केवळ लिहिण्यामुळे ओळखतो त्यांच्याशी आणखी घसट वाढविणे हा उद्देश असावा. किंवा काही आयडी केवळ एखाद्या छंदामुळे एकत्र (ऑन्लाईन नाही तर पर्सनली) येऊ शकतात. ज्यावर विचार करायला ह्या टेकओव्हर मुळे वेळ मिळत नाही.

सामजिक उद्देश असावा की नाही ह्याबाबत माझे काही मत नाही. होतं काय की बरेचदा आपण सुरूवात गप्पा मारायला म्हणून ववि (किंवा कोणतेही गटग) सुरू केला. आता त्याला थोडी वेगळीच झाक येते आहे, जसे की १० वा ववि, ११ ववि म्हणून ग्रँड वगैरे. असे असू नये असे मला वाटते. केवळ गप्पा मारणे आणि ज्याला जे सोयिचे वा हवे ते करणे (स्पेशली जेवनानंतर) म्हणजे ( गो विथ द फ्लो, नो प्लानिंग) असे काहीसे स्वरूप ह्या पुढील वविला देता आले तर मजा येईल. अर्थातच मी वृक्षारोपनाच्या विरोधी वगैरे नाही, ती एक खूप चांगली कल्पना आहे आणि श्रमदान पण. तसे काही झाले तर ती सामाजिक बांधिलकी जपल्यासारखे होईल. पण तो वविचा उद्देश होता का? उलट वविला (भेटिला) काही उद्देशच नसावा.

सध्या ववि त्याच त्या रुटिन मध्ये अडकला आहे असे अनुभवून व काही वृत्तांत वाचून वाटायला लागले आहे.

माझ्या दृष्टिने ववि संयोजन म्हणजे -- १. जागा सिलेक्शन. २. जेवणाची व ने-आण करायची सोय. एवढेच. ह्यापुढे लोकांनी स्वफुर्तीनेच जे काय करायचे ते करावे. मी असे संयोजन काही वेळा केले आहे आणि अनुभव असा की लोकांना बंदिस्त (म्हणजे खूप कार्यक्रम आखून दिशा दर्शविने) पेक्षा ओपन कार्यक्रम (आळशी पणा आणि इप्रॉम्प्टू ) जास्त आवडतात व कंपू सोडून इतरांना लोकं जास्त बोलतात.

पहिली गोष्ट म्हणजे सांस्कृतिक समिती 'टेकोव्हर' करत नाही. ती लोकांना एकत्र आणते Happy

कंपू सोडून इतरांना लोकं जास्त बोलतात.>> उलट, काहीच करायला नाहीये, म्हणून लोक आपल्या ओळखीच्याच लोकांशी गप्पा मारत बसतात. आपणहोऊन जाऊन अनोळखी लोकांशी गप्पा मारणे, बोलणे होत नाही- हा अनुभव आहे. खेळांच्या निमित्ताने लोक किमान आपल्या कम्फर्ट कंपूमधून बाहेर तरी पडतात. आणि हे खेळ फक्त उत्तरार्धात असतात, जेव्हा पाण्यात डुंबणे आणि जेवण हे मुख्य कार्यक्रम आटपलेले असतात. जेव्हापासून खेळ सुरू झाले आहेत, तेव्हापासून वविला अधिक मजा यायला लागलेली आहे. जेव्हा ग्रूप संख्या ३०-४० होती, तेव्हा लोकांना मोकळं सोडणं ठीक आहे. पण जेव्हा वविला ८०-१०० दरम्यान लोक येतात, तेव्हा त्यांना एकसंध ठेवायला काही ना काही कार्यक्रम लागतोच.

ह्यावेळी पावसात भिजणे/ डुंबणे आणि जेवण यानंतर खेळांना वेळ न देता, त्याच वेळात दुसरा काही अभिनव कार्यक्रम ठरला तरी काहीच हरकत नाही. पण सांसवरचे आक्षेप मान्य नाहीत Happy

. पण सांसवरचे आक्षेप मान्य नाहीत स्मित >>

चूक. आक्षेप हा शब्दच चूक. मला स्वतःला सांस्कृतिक समिती आवडते. अनेक अनोखे कार्यक्रम केले आहेत. मागच्या वेळेसचा तो उतारा वाचन कार्यक्रम अनोखा होता. मला आवडला.

माझा मुद्दा कदाचित पोचला नसावा. पण मी सासं वर आक्षेप वगैरे घेतो असे कृपया नको म्हणू. Happy आता नविन काही सुचवा असे लिहिले आहे म्हणून मी नविन सुचवले आहे.

खरे तर मला कोणावरही काहीही आक्षेप कधीही नसतो. कारण मी स्वतः ह्या लष्कराच्या भाकर्‍या नेहमीच भाजल्या आहेत. मायबोली सोडूनच्या विश्वात आणि आय नो की कुठल्याही आयोजनाला नावे ठेवणे किती सोपे आणि ते आयोजन करणे किती कठिण. असो मुद्दा मान्य नसने समजू शकेन पण टँजंट नको जाऊ. Happy

नुसते नवीन सुचवले नाहीस, जुन्यावर कमेन्टही केली आहेस. (आक्षेप शब्द वापरला नाहीये इथे! :))

टॅंजन्ट कुठे गेलेय? सांस समितीचे समर्थन केले आहे मी. तुला जे आवडले नाही, ते खोडलेय फक्त. तो तुझा पीओव्ही. हा माझा.

असो. या वर्षीचे संयोजक ठरवतील आता काय ते.

केदारची लोकांना जेवणानंतर नुसतंच मोकळं सोडण्याची आयडिया पटली नाही. प्रचंड बोअर होईल त्यामुळे.

पूनम +१

मायबोलीचा ववि म्हणजे सगळ्या ठिकाणच्या मायबोलीकरांना एकत्र भेटण्याची, त्यांच्या सहवासाची संधी असते. वविवेळी आपण टिशर्ट उपक्रम करून थोडीफार सामाजिक बांधिलकीही जपत असतो. पण ती केवळ आर्थिक मदत होते, प्रत्यक्ष सहभाग होत नाही. मायबोलीकर स्वत: श्रमदान/ वृक्षारोपण करू शकतील आणि त्यानंतर सालाबादमाणे वविचा आनंद यथेच्छ लुटू शकतील असं एखादं ठिकाण वविसाठी निवडलं तर मला स्वतःला फार आवडेल. >>>>
१०० टक्के सहमत तुझ्याशी ... ही कल्पना मस्त आहे ... कारण आर्थिक मदती पेक्षा असे उपक्रम जास्त प्रभावी ठरतात अस माझ मत.

वर्षाविहाराचे ठिकाण हे नेहमी मुंबई व पुणेकरांच्या सोयीने/सोयीसाठी ठरवले जाते हे अजिबात आवडत नाही. इतर महाराष्ट्रातल्या मायबोलीकरांकरीता हे अत्यंत निराशाजनक असावे असे माझे मत आहे. >>>>>
काही अंशी हे खरय ...पण त्यात सगळ्यांना सामावुन घेण खुप कठिण आहे... मुंबई पुणे या व्यतिरिक्त ठिकाणी राहणार्‍या लोकांनी जर मनावर घेतल .. तर ववि चा दिवस जोडून ते मुंबई पुण्याचा कार्य्क्रम ठेवुन ववि ला येउ शकतात.

कसार्‍याच्या जवळ एखादे ठेवल्यास मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगरकरांसाठी सोयीचे ठरेल... >>> उत्तम कल्पना आहे ... योग्य ठिकाण शोधण आवष्यक आहे याकरता...

असाही एक विचार आहे की ... मुख्यत्वे हा गटग पावसाळ्या व्यतिरिक्त कोणत्या वेगळ्या ॠतुत ठेवला तर जास्त लोकांना येण सोयीस्कर पडेल का ?

धन्यवाद.

केदार जेव्हा जास्त लोक जमा होतात तेव्हा प्रत्येकाच्या कल्पना .. 'वेळ घालवायच्या' वेगवेगळ्या असतात
शिवाय बरेच जण नवीन असतात .. सगळ्यांशी जुळवुन घेण , बोलण होण्याकरता एक माध्यम म्हणुन सांस चे कार्यक्रम

त्याऐवजी काही कल्पना असतील तर नक्कीच हव्या आहेत ...

नुसते नवीन सुचवले नाहीस, जुन्यावर कमेन्टही केली आहेस >> त्या शिवाय का मला दोन्हीतील फरक दाखवता आला असता का? उलट मी किमान तिनदा लिहिले की सासं तुमचे कार्यक्रम चांगलेच असतात पण ह्या वेळी नविन करा असे सुचवत आहे.

अगं टँजट ह्यासाठी लिहिले की तू मी आक्षेप घेतो आहे असे म्हणालीस. मी म्हणतोय की नविन करू. म्हणजे जुन्यावर आक्षेप घेणे कसे ठरेल?

मुख्यत्वे हा गटग पावसाळ्या व्यतिरिक्त कोणत्या वेगळ्या ॠतुत ठेवला तर जास्त लोकांना येण सोयीस्कर पडेल का ?
>> मग त्याला वर्षाविहार म्हणता येईल का? Light 1

रिया, मी तमिळनाडू सुचवलं अस्तं पण इकडे पाऊस नोव्हेंबरात पडतो, त्यापेक्षा केरळ मस्त. पुण्यामुंबईपेक्षा मला जवळ.

कोकणात ववि करायचा असेल तरीदेखील मला चालेल. तेवढंच घरीपण येता येईल. कोकणामधे पावसाळ्यातून रीझोर्टमधे वगैरे चांगला डिस्काऊंट पण मिळेल. (गर्दीपण फारशी नसेल) Happy

Pages