कोवळ्या किंवा पक्की बाठ न धरलेल्या लहान लहान कैर्यांचे हे सालन म्हणजेच आपल्याकडे "कैरीचे कोयाडे".राजस्थान ला थोडेसे मसाले वेगळे वापरुन करतात्.कैरीचे गोड लोणचे किंवा मेथांबा करताना कैरीचे साल सोलुन फोडी करतो .तेव्हा कोयीच्या अगदी जवळुन फोडी चिरायच्या नाहीत्.अशा अर्धवट गर असलेल्या कैरीचे हे सालन करता येते.तसेच गोडसर किंवा मऊ पडलेल्या पिवळ्या /केशरी कैरीचे ही खूप छान सालन करता येते.
सालन साठी चे साहित्य:---
वर उल्लेख केल्याप्रमाणे ५-६ कैर्या.
२-३ लवंगा,
१ लहान दालचिनीचा तुकडा,
१ मोठी वेलची,
१ चक्री फूल.
१ टेबलस्पून धणे व १/२ टेबलस्पून जिरे भाजुन त्याची पुड,
२ टेबलस्पून तीळ भाजुन त्याची जाडसर पूड,
१/२ टेबलस्पून बडीशोप,
१ टेबलस्पून मोहोरी ची डाळ,
२ सुक्या लाल मिरच्या,
बेसन -१ १/२ टेबलस्पून्,[बेसनाऐवजी तांदुळपिठी घेता येईल]
हे बेसन पाऊण वाटी पाण्यात कालवुन घ्यावे.
७-८ कढीलिंबाची पाने.
याशिवाय लागणारे इतर साहित्य असे-
तेल २ टेबल स्पून फोडणी साठी.
हिंग पाव चमचा,
मेथीदाणा ७-८ दाणे,
मोहोरी -पाव चमचा,
हळद्-पाव चमचा,
तिखट व मीठ चवीनुसार,
गूळ २ टेबलस्पून -[कैरी च्या आंबटपणानुसार गूळ कमी जास्त घालावा]
पाणी साधारण एक ते दिड फुलपात्र भरुन.
कृति--
एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात हिंग-जिरे-मोहोरी-मेथीदाणा-सुक्या लाल मिरच्या-मोठी वेलची-दालचिनी-लवंग-चक्रीफूल-दालचिनी -कढीलिंबाची पाने-बडीशोप आणि कैर्या घालुन परतावे.त्यात हळद,तिखट,धणे-जिरेपुड,तीळकूट ,गूळ व पाण्यात कालवलेले बेसन घालुन परतावे.पाणी घालावे.चवीप्रमाणे मीठ घालावे.मध्यम आचेवर छान उकळावे.चव पाहुन फार आंबट वाटल्यास गूळ घालावा.तसेच तिखट ही घालता येईल.थोडे दाटसर झाले कि अमिया का सालन तयार.वरुन कोथिंबीर घाला..चवीला आंबट-गोड आणि तिखट अशा मधुर चवीचे सालन भात व पोळी बरोबर खाता येते.
टिपः--
१]लहान बाळकैरी मिळाली नाही तर उपलब्ध कैरीची साले काढुन त्याच्या मोठ्या फोडी वापराव्या.
२]वाण्याकडे कैरीच्या वाळवलेल्या चकत्या /फोडी [आंबोशी म्हणतात.]तयार मिळतात त्या थोड्या गरम पाण्यात भिजवुन नरम करन घ्यायच्या.या फोडी सालन साठी वापराव्या.
अमिया का सालन.
Submitted by सुलेखा on 19 March, 2013 - 05:29
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैशिष्ट्यपूर्ण वाटतेय.
वैशिष्ट्यपूर्ण वाटतेय.
मस्त प्रकार. आमच्याकडे
मस्त प्रकार. आमच्याकडे आंब्याचा सिझन सुरु झाला कि करतोच !
खरच फोटो पाहुन चवीला
खरच फोटो पाहुन चवीला ...आंबट-गोड आणि तिखट दिसतय ..
मस्तच
मस्तच
आहाहा... कसलं तोंपासु दिसतय
आहाहा... कसलं तोंपासु दिसतय ते सालान!!!
आमचा आंबा सिझन फिनीश्ड, त्यामुळे आता नोव्हेंबर पर्यंत वाट बघायला लागणार .....
अमिया म्हणजे?
अमिया म्हणजे?
मस्त दिसतय. इकडे आता कैर्या
मस्त दिसतय. इकडे आता कैर्या येत आहेत बाजारामधे.
माधवी,अमिया म्हणजे लहान
माधवी,अमिया म्हणजे लहान आकाराची कैरी्. हिन्दी बोली भाषेत आम वरुन अमिया शब्द आहे.
पाककृती आणि फोटो दोन्ही फार
पाककृती आणि फोटो दोन्ही फार आवडलं. बाळकैरी नसल्यामुळे अॅडल्टकैरी वापरून करण्यात येईल.
भारी दिसतंय सालन. फोटो एकदम
भारी दिसतंय सालन. फोटो एकदम तोंपासु आहे
मृण्मयी, "अॅडल्टकैरी" एक
मृण्मयी, "अॅडल्टकैरी" एक भन्नाट शब्द..फारच आवडला !!!!!
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
मस्त. हे किती दिवस टिकेल?
मस्त. हे किती दिवस टिकेल?
सुचित्रा, हे टिकाऊ नाही.फ्रीज
सुचित्रा, हे टिकाऊ नाही.फ्रीज मधे फारतर दोन दिवस.पण ताजे करुन खाणे जास्त योग्य.
मस्त!
मस्त!