रंगपंचमी - एक विनंती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महाराष्ट्रातील अनेक गावातील दुष्काळ लक्षात घेता आणि रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर पाहता, सर्वांना एक विनंती ..
holi_request.jpg(वरील प्रचि फेसबुकवर 'आयुष्यावर बोलु काही' यांच्या वॉलवरुन त्यांच्या ना हरकत परवानगीने घेतले आहे.)

विषय: 
प्रकार: 

अनुमोदन एमजी , पाण्याची बचत करनं खुपच गरजेचं आहे. आप़ण केलेली बचत एका तहानलेल्या जीवाची तहान भागवु शकतं.

त्याच्यापेक्षा साखर कारखान्यावर बहिष्कार घाला... ऊसाच पिक घेण्यासाठी लाखो कोट्यावधी लिटर पाणी वापरल जात. तुम्ही साखरच घेतली नाहीत तर साखर कारखाने बन्द पडतील मग शेतकरी ऊसाच पिक घेणार नाहीत मग इतक पाणी वाया जाणार नाही.

रन्गपन्चमी न खेळल्यामुळे किती पाणी तुम्ही वाचवणार? ५०-६० लिटर? त्या पेक्षा साखर खाण थाम्बवा, गुळ पण खाउ नका... उसाचा रस पण बहिष्क्रुत करा. मग पाण्याचा प्रश्न सम्पलाच.

बादवे... हे लेख लिहिणारे आणि त्याला अनुमोदन देणारे महाभाग bottled water ज्याला प्रेमाने bisleri म्हणतात ते पित नसतीलच अशी अपेक्षा... १ लिटर पाणी बाटलीत भरायला ३ लिटर पाणी वापरल जात.

नाही तर तुमच्या मध्ये आणि मेणबत्ती सम्प्रदायिक लोकानमध्ये तसा फार फरक नाही असच म्हणाव लागेल... मग त्यात इतर पण गोष्टी आल्याच, cold drinks, मद्यार्क, सोडा वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टीन्पासून तुम्ही अनेक योजन दूर असाल अशी अपेक्षा.

आता तुम्ही वयाच्या चाळीशी मध्ये teenagers ना उपदेशाचे डोस पाजण्याच महान क्रुत्य करत असलात... की त्यान्नी समाजा प्रती आपली सन्वेदना रन्गपन्चमी न खेळून कशी दाखवावी वगैरे वगैरे तर गोष्ट वेगळी... मग माझ पण तुम्हाला अनुमोदन. तस ही आता मला पण रन्गपन्चमी खेळण्याचा उत्साह राहिला नाही. पण होळीला जो हिरवा पाला दुधात मिसळतात तो मिळाला तर नक्किच आवडेल. कोणाला माहित्ये का पुण्यात कुठे मिळतो ते? Happy

तरी वाटलच अजून असाराम बापून्च नाव कोणी का घेतल नाही ते...साप साप म्हणून जमीन धोपटत बसायची.. जो जितका जास्ती धोपटेल तो तितका जास्ती पुरोगामी.

पुणे मुम्बै मध्ये ३०-४०% पाणी गळती पण त्या बद्दल कोणी काही बोलणार नाही. दुश्काळी दौर्यावर गेलेल्या राजकारण्यान्नी मटण बिर्याणीवर ताव मारला, त्या बद्दल पण अळीमिळी गुपचिळी. दुश्काळातला चाराघोटाळा... अजिबातच त्याबद्दल बोलायच नाही... सान्ड्पाणी प्रक्रियेचा अभाव्..छे छे... तो तर विषय पुण्यातल्या कारभार्यान्च्या परवानगीशिवाय त्याला स्पर्श पण करायचा नाही... या सगळ्या बद्दल बोललो तर आपल्याला मेणबत्त्यान्साठी पैसे कोण देणार नाही का? त्यापेक्षा असाराम बापू ठिक आहेत soft target.

Dr. राजेन्द्रसिन्ह यान्नी सान्गितलेले जलस्रोताविशयीचे विचार, गन्गेच किन्वा यमुनेच तिथल्या कारखान्यन्च्यामुळे होणार प्रदूषण त्या मुळे होणार अब्जावधी लिटर पाण्याचा ह्रास, त्या पेक्षा आपले २-४ हजार लिटर पाणी वापरणारे असाराम बापू ठिक आहेत...

मग? या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या पाल्याला पोहायच्या class ला घालणार की नाही? Happy

असाराम बापूनी काही हजार लिटर पाणी वाया घालवल असा शन्ख नाद करणार्या मण्डळीन्नी या सन्दर्भात थोडी पिपाणी पण वाजवावी ही नम्र प्रार्थना..http://www.loksatta.com/mumbai-news/huge-water-usage-for-alcohol-in-drou...

जमल्यास हे पण वाचा...
http://lokprabha.loksatta.com/96567/Lokprabha/22-03-2013#page/8/2

अनुमोदन महागुरु,
रच्याकने सकाळ दैनिकाने रिलीफ फंड जमवायला सुरुवात केली आहे ''सकाळ रिलीफ फंड '' या नावाने.
नेमेचि येतात..दुष्काळ किंवा अतिवृष्टी या देशात Sad

झोटिंग, अनुमोदन.
परवाच बातमी वाचली/ऐकली होती बिअर करता वळविलेल्या/वापरात असलेल्या पाण्याची. तेव्हा सरकारि मन्त्र्यान्चे/कॉन्ग्रेसी प्रवक्त्यान्चे टीव्हीवर उत्तर असे होते की जिथे पाणी मिळतय, तिथे बिअर बनवताहेत, तर जिथे मिळत नाही त्याचा संबंध जोडून काय होणारे? हे बरोबर आहे, व असेल, तर "तिकडे जन्ता होरपळते" वगैरे जडजड रक्तबम्बाळ शब्द वापरुन भावना चिथवायच्या अन इकडे केवळ अन केवळ "हिन्दून्च्या" सणान्वर या ना त्या निमित्ताने लोकान्चा बुद्धिभेद करण्यास सल्ले द्यायचे, हे नेहेमीचे आहे. अजुन दोन्चार महिन्यान्नी गणपती आले, की यान्ची वैखरी गणपती विसर्जनामुळे प्रदुषण कसे होते याच्या जाहिरातबाजी करण्यात खर्ची पडतील.
अन यास विरोध केला तर अहो तुम्हाला कै माणूसकी बिणुस्की हाये की नै म्हणून राळ उडवतील, रान उठवतील.
भले जसे कै या जगात, याच देशात भूकबळी जाताहेत म्हणून यान्नी पण आपले एकवेळचे खाणे कायमचे तोडलय असे कधीच होत नसताना, उगा उठायचे अन या ना त्या निमित्ताने हिन्दू रिवाजान्वरती टपल्ली मारून जायचे.

गेली २८ वर्ष मी माझ्या मित्रांना हेच कळकळीचे निवेदन करत आहे ...पण साले सकाळी सकाळी घरी येवुन बादलीभर पाणी अंगावर ओततात अन मग तोडाला काळा निळा हिरवा पिवळा रंग फासतात ...आणि लालही Angry

>>>> जिथे पाणी मिळतय, तिथे बिअर बनवताहेत, तर जिथे मिळत नाही त्याचा संबंध जोडून काय होणारे?

चला की मग... या वेळी होळी आणि रन्गपन्चमी दोन्ही जोरात. मी १००००० लिटर चा टॅन्क भरून ठेवतो. सगळ्या माबो करान्ना आमन्त्रण. ज्यान्ना रन्ग खेळायचा असेल त्यान्नी रन्ग खेळावा ज्यान्ना पाणी वाया जातय म्हणून विव्हळायच असेल त्यान्नी विव्हळाव. त्यान्च्यासाठी मेणबत्त्या पण आणून ठेऊ आपण :). आणि पाणी कमी पडल तर खडकवासल्यात तशीही लोक डुम्बत असतातच, आपण पण जाउन डुम्बू. खडकवासल्यात तर भरपूर पाणी मिळतय.

काल sollid धमाल केली. society मध्ये boring च पाणी आहे. आणि ते चान्गल्या दाबानी पण येत. रासायनिक रन्गान्ना फाटा देउन शुद्ध पाण्याची होळी खेळलो. खूप चिखल झाला खरा पण कोणाच्या गाड्या आडकल्या नाहीत. आता रन्ग पन्चमीची वाट बघत आहे

झोटिंग, अनुमोदन. असाच राग मला "safe" Holi / Diwali wishes करणार्‍यांचा येतो..... एकदा ख्रिश्चनाने सांगितले कि (bloody) colours / bursting crackers not safe for you कि झाले सगळे मिंधे भारतीय सारासार विचार न करता एकमेकांना "festival safeties" wish करतात.

तोंडी लावायला आहेतच .... एक अब्जांहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात होणारे शे-पन्नास अपघात; रंगानी किंवा फटाक्यांनी .... शिवकाशीतील बालमजूरी वै.

आमच्या सोसायटीतले लोक, शेजारपाजारच्या सोसायट्यांमधील लोक या वेळी पाण्याच्या प्रश्नाचा विचार करून होळी - रंगपंचमी फारशी खेळले नाहीत. एरवी प्रचंड कल्ला असतो. या वेळी शांत शांत होते. आमच्याकडे बोअरचे पाणी असते नळाला, पण तरी लोकांनी संयम दाखवला याचे कौतुक वाटले. परंतु त्याच वेळी दुकानदार, त्यांच्याकडे काम करणारी माणसे मनसोक्त पाणी - रंग वापरून सर्व रस्त्यात पाणी - रंगाचा चिखल करत हिंडत होते - पाणीविषयक आवाहने गेली उडत - त्याचा खेदही वाटला.

नेमके हिंदू सण आले की काटकसर वगैरे सुचते मिडिया आणि सरकारला. हिंमत असेल तर आयपीएल रद्ध करा. त्यात केवढं इंधन खर्च होतं, वीज, वगैरे.....

IPL.jpg

>>>> अरुन्धती... एरवी प्रचंड कल्ला असतो. या वेळी शांत शांत होते.

अरेरे.. फार वाइट

>>>>> पाणीविषयक आवाहने गेली उडत

आवहने कोणी केली? ज्यान्च्या घोटाळ्या मुळे दुश्काळ पडला त्यानीच ना? मग जाणारच उडत

>>>> राजश्री..
धन्यवाद... म्हणे १८ लाख लिटर पाणी कत्तलखान्यात लागत प्रत्येक दिवशी... या लोकान्नी कत्तल खाने बन्द केले तरी ६५ कोटी लिटर पाणी वर्षाला वाचेल. पण यान्ना तथाकथित वाया जाणार १००-२०० लिटर पाणी दअसा...

>>>>असा... हिंमत असेल तर आयपीएल रद्ध करा
ते रद्द केल तर यान्ना पैसे कोथून मिळणार?

रंगपंचमीला रंग खेळू नका असे आवाहन करणारे सगळेच अन्य प्रत्येक ठिकाणी पाणी वायाच घालवतात असंच समजून शिमगा का चाललाय इथे?
मी रंगपंचमीवर बहिष्कार टाकला होता यंदा..पण मी प्रामाणिकपणे सांगू शकते की अन्यही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पाणी वाया जाताना दिसतं तिथे ते थांबवण्याचा मी प्रयत्न करते.
रंगपंचमी बिन-पाण्याची साजरी करा म्हटल्यावर ज्यांना धर्मावर घाला आल्यासारखं वाटतंय ते धर्मासाठी अन्य काय करतात तेही जाणून घ्यायला आवडेल.
होळी म्हणजे दुष्ट,वाईट त्याचा नाश. त्यानिमित्ताने तरी मान्य करा दुष्काळाचं संकट आणि स्वतः प्रयत्न करा काहितरी.
एकनाथांनी गंगेचे पाणी तहानलेल्या गाढवाच्या तोंडात घातले होते..आपले रोजचे वाचवलेले पाणी माणसांच्या तोंडात जाईल याचातरी विचार करा.. प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर द्यायचे म्हणून द्यायचे का?

रंगपंचमी बिन-पाण्याची साजरी करा म्हटल्यावर ज्यांना धर्मावर घाला आल्यासारखं वाटतंय ते धर्मासाठी अन्य काय करतात तेही जाणून घ्यायला आवडेल.>>

तुम्ही काय करता? हा फारच नेहमीचा आणि इयत्ता बालवाडीतला प्रश्न आहे. आम्ही धर्मासाठी काय काय करतो त्याची जाहीरात करण्याची गरज वाटत नाही. आम्ही रोज पाणी वाया घालवत नाही इतके पुरेसे आहे. एकच उदाहरण देतो. माझी गाडी गेले एक वर्षभर मी दोन आठवड्यातून एकदा धुतो. रोज धुवत नाही. माझ्या मित्रांना तेच करायला सांगतो. पण इथे बोललात म्हणून सांगितले, अन्यथा त्याची जाहीरात करत नाही कोठेही. पण जर कोणी आमच्या धर्मातले सण घेऊन अमुक करु नका आणि तमुक करु नका असे फुकट शिकवत असेल तर त्यालाही उत्तर देणे भाग आहे.

पण मी प्रामाणिकपणे सांगू शकते की अन्यही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पाणी वाया जाताना दिसतं तिथे ते थांबवण्याचा मी प्रयत्न करते.>>

अरे वा छान छान. उत्तम. ते आम्हीही करतोच. Proud

मला स्वतःला होळी खेळायला आवडत नाही. पण त्याचे कारण पाणी वाचवणे हे नाही. इतर वैयक्तिक असेल.
पण मी इतरांना शिकवायला जात नाही की अमुक करा तमुक करु नका. तेव्हा सडेतोडपणे उत्तर दिलेच आहे वर. हवे तर आणखी उदाहरणे देतो.

<<<तुम्ही काय करता? हा फारच नेहमीचा आणि इयत्ता बालवाडीतला प्रश्न आहे.>>>
ठीक आहे, फार पटलं. पण वर अगदी अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आहेत..तेव्हा हा मुद्दा काढ्ला असतात तरी बरं झालं असतं.
जाहिरातबाजी करायला कुठच्याही सुशिक्षिताला आवडत नाही. पण झोटिंग यांच्या
'नाही तर तुमच्या मध्ये आणि मेणबत्ती सम्प्रदायिक लोकानमध्ये तसा फार फरक नाही असच म्हणाव लागेल... मग त्यात इतर पण गोष्टी आल्याच, cold drinks, मद्यार्क, सोडा वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टीन्पासून तुम्ही अनेक योजन दूर असाल अशी अपेक्षा.'
वगैरे वगैरे प्रतिसादांना दिलेले हे उत्तर आहे.
'सण कसे साजरे करा' वगैरे असं कुणी सांगू नये अशी तुमची अपेक्षा असेल तर या इतर गोष्टी करणार्‍यांनाही तुम्ही-आम्ही कोणीच काही सांगू नये.. 'पण मी इतरांना शिकवायला जात नाही की अमुक करा तमुक करु नका. ' असं तुमचंच म्हणणं आहे ना? मग कृपया तेच या लोकांसाठीही बोला एकदा..

आणि धर्माचा आम्हालाही अभिमान आहे,पण तो फुकटचा नाही. सार्थ आहे.

Pages