मी गुलाब आणले होते..

Submitted by रोहितगद्रे१ on 12 March, 2013 - 10:57

मी गुलाब आणले होते
काटे काटे ते काढून
नव्हते माहीत तेव्हा
काय ठेवलाय वाढून...!!
मी गुलाब आणले होते
तुला तुलाच द्यायला
तुझ्या नजरेचे बोल
सारे टिपून घ्यायला...!!
मी गुलाब आणले होते
लाल लाल मखमली
आत खोल काळजात
होती दसरा दिवाळी
मी गुलाब आणले होते
तू दिसता दिसना
इथे तिथेही पाहिले
कुठे कुठेच भेटेना...!!
दिस ढळत निघाला
चालले गुलाब कोमेजून
माझे मीच ते तेव्हा
गेलो होतो समजून
बसलो दूर पारावर
लागेना कशाचाच थांग
कापर शिरशिरी भरे
सुन्न झालं होत अंग
तुला दिलेच नाहीत
देऊ आता त्या नदीला
गेला हात बाजूला ते
गुलाब घ्यायला
नव्हते तिथे ते गुलाब
पण मखमल होती
नाजूक मनगटी तुझ्या
मोतीमाळ पण होती
पाहिले मी न तुला
न गुलाब ते दिले
पण दिसले ते मला
नेत्र दोन पाणावलेले ...!!
मी गुलाब आणले होते....!!
----------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
Happy

छान !
Happy

छान प्रयत्न आहे. हळू हळू शिकशील

(अवांतर : अभिप्राय कळवा असं इथं म्हणणं म्हणजे बॉटनीच्या प्रोफेसरांना धरून आणतील प्रतिसाद द्यायला. सांभाळून Lol हलकेच घ्यावे Happy )