काळ

Submitted by समीर चव्हाण on 26 February, 2013 - 04:06

काळ मोठा तीमारदार आहे
प्रत्येक नाइलाजाचा इलाज
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

आजवर बरच हसं झालं
गम्मत उडवली गेली
कधी वाईट वाटलं नाही असं नाही
पण सोपी पळवाटही नव्हती

काही होते जिवाभावाचे
बोट धरून शिकवणारे
बाळा, तात्या आला नाही, तात्या आले

वर्षे म्हणता-म्हणता गेली
घाटीपणा जात-जात गेला
की कुणास ठाऊक अजूनही आहे
पाळामुळात जाऊन बसलाय की जायचं नावच घेत नाही
पण शिकलो-सवरलो
चार-चौघांत उठा-बसायला लागलो
जिभेपल्याडच्या चवी कळायला लागल्या
तेव्हा एका मित्राकडून समजलं की आम्ही खानदानी आहोत
मला माहीतच नव्हतं

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळ मोठा तीमारदार आहे
प्रत्येक नाइलाजाचा इलाज
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

आवडलीच कवितेतील भावना.साधी अन निरागस.तीमारदार नवा शब्द कळला.

<<<<तीमारदार म्हणजे परिचारक.>>>
छान ,पण तीमारदार कुठून काढला .बोलभाषेतील शब्द आहे का?