Submitted by समीर चव्हाण on 26 February, 2013 - 04:06
काळ मोठा तीमारदार आहे
प्रत्येक नाइलाजाचा इलाज
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
आजवर बरच हसं झालं
गम्मत उडवली गेली
कधी वाईट वाटलं नाही असं नाही
पण सोपी पळवाटही नव्हती
काही होते जिवाभावाचे
बोट धरून शिकवणारे
बाळा, तात्या आला नाही, तात्या आले
वर्षे म्हणता-म्हणता गेली
घाटीपणा जात-जात गेला
की कुणास ठाऊक अजूनही आहे
पाळामुळात जाऊन बसलाय की जायचं नावच घेत नाही
पण शिकलो-सवरलो
चार-चौघांत उठा-बसायला लागलो
जिभेपल्याडच्या चवी कळायला लागल्या
तेव्हा एका मित्राकडून समजलं की आम्ही खानदानी आहोत
मला माहीतच नव्हतं
समीर चव्हाण
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेव्हा एका मित्राकडून समजलं
तेव्हा एका मित्राकडून समजलं की आम्ही खानदानी आहोत
मला माहीतच नव्हतं....
व्वा... क्या बात है!!!
अतिशय आवडली कविता.
अतिशय आवडली कविता.
आवडली,छान . तीमारदार हा नवीन?
आवडली,छान . तीमारदार हा नवीन? शब्द कळला नाही .
धन्यवाद. तीमारदार म्हणजे
धन्यवाद.
तीमारदार म्हणजे परिचारक.
छानच बाज.
छानच बाज.
वेगळेपण आवडलं. साध्याच
वेगळेपण आवडलं.
साध्याच शब्दांतली पण मनाचा ठाव घेणारी कविता .
मनःपूर्वक धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद.
आवडलीच
आवडलीच
काळ मोठा तीमारदार आहे
काळ मोठा तीमारदार आहे
प्रत्येक नाइलाजाचा इलाज
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
आवडलीच कवितेतील भावना.साधी अन निरागस.तीमारदार नवा शब्द कळला.
आम्ही खानदानी आहोत ... kyaa
आम्ही खानदानी आहोत
... kyaa baat hai
<<<<तीमारदार म्हणजे
<<<<तीमारदार म्हणजे परिचारक.>>>
छान ,पण तीमारदार कुठून काढला .बोलभाषेतील शब्द आहे का?