पुण्यातली खाऊगल्ली !

Submitted by आशूडी on 22 May, 2009 - 04:17

आपल्या पुण्यात कुठे काय चांगलं खायला मिळतं , कुठल्या हॉटेलची काय खासीयत आहे याची चर्चा कितीतरी वेळा पुणेकर बाफ वर होत आली आहे. मग विचार केला की अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती प्रत्येक शहरात, गावात असेल. आपण प्रवासाला गेलो असतानाही अचानक तिथल्या एखाद्या उत्कृष्ट खाऊगल्लीचा आपल्याला शोध लागतो. तेव्हा ही माहिती आपण जर एक स्वतंत्र धाग्यावर साठवली तर ती सर्वांनाच उपयोगी पडेल. नाहीतर वैशाली- वाडेश्वर मध्ये जाऊन, रांगेत वाट पाहूनही जर कुणी पावभाजी खाल्ली तर काय फायदा! तर या धाग्यावर आपण लिहूया, माझ्या पुण्यातल्या खाऊगल्ल्या! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पानावर पहिला मान मिसळीला! Happy
पुण्यात मिसळ खावी ती खालील ठिकाणी :
१. श्रीकृष्ण मिसळ (तुळशीबाग)
२. बेडेकर मिसळ (पत्र्या मारुती जवळ)
३. श्री मिसळ (शनिपाराजवळ)
४. रामनाथ (टिळक रोड)

आशु...

हाच प्रोजेक्ट होता माझा....
म्हणून डोक्यात येऊनही हा बाफ मी चालू करत नव्हतो...
पण आता प्रोजेक्ट सबमिट झालाय...
त्यामुळे आता बिनधास्त चर्चा करू...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

छान, उत्तम............
----------------------------------------------------------------------
तदबीर से बिगडी हुयी, तकदीर बना ले !
अपने पे भरोसा है तो, एक दांव लगा ले !!

अगदि मस्त बाफ सुरु केलाय , छान!

************************

नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती

दुसरा मान बिर्याणी ला-
तिरंगा (बुधवार पेठ, पौड रोड, सातारा रोड... संकष्टी ला बंद असतं)
ब्लू नाईल (कँप, म्यूझिक वर्ल्ड जवळ)
जॉर्ज (कँप, नाझ बेकरी जवळ... टिक्का बिर्याणी अप्रतिम)
पुरेपूर कोल्हापूर (सदाशिव पेठ, नळ स्टॉप... कोल्हापुरी बरोबरच यांची बिर्याणी ही जबरदस्त आहे)
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

अर्थातच थंड पदार्थात पहिला मान मस्तानीचा!
एकच ठिकाण - सुजाता मस्तानी - निंबाळकर तालीम
======================================
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

हे मस्तानी प्रकरण मुंबईत कुठे दिसत नाही Sad
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

मस्तानि म्हणजे ?????????/ Sad

************************

नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती

मस्तानी प्रकरण मुंबईत कुठे दिसत नाही >>>>

अहो ते बाजीरावाचे प्रकरण! पुणे सोडून मुंबईत कसे येणार? Proud

-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको

मिसळ ठाण्यातली -
१. नुसताच जाळ - ममलेदार कचेरी जवळ - बाजारात
२. थोडी सौम्य, पण चव असलेली - बाजारातच जरा पुढे - आमंत्रण

अश्विनी, थंड आणि कृष्णा,

ठाण्यात मिळते मस्तानी - टेम्प्टेशन, राम मारुती रोड!

ठाण्यात दोशा -
१. ओपन हाऊस - पाचपखाडी
२. शिवसागर - पोखरण रोड१, रेमण्ड्सच्या समोर

आशु मस्तानी डोंबिवलीत पण मिळत. १ सोडून २ ठिकाणी. १. डोंबिवली वेस्ट ला माझ्या घरा जवळ२. डोंबिवली पुर्व - चार रस्ता, रंगोली हॉटेलच्या समोर(माझ्याकडे ये मी घेऊन जाईन)

मिसळ- डोंबिवली (प) एव्हरेस्ट शॉपिंग कॉम्प्लेक्स, मुनमुनची मिसळ (मिसळ मस्तच त्याही पेक्षा त्या दुकानाच्या मालकीण बाई नी त्यांचा मुलगा ह्यांची कॉमेंटरी/ ऑर्डर घ्यायची/लोकांना बसवायची पद्धत एकदम भारी)

कालच ऑफिसमधला कलिग सांगत होता की टिळक रोड पोस्ट ऑफिसला लागून असलेल्या बोळात एक हातगाडीवाला फार फेमस आहे म्हणे. इतके वर्ष स. पे मधे राहून स. प. मधे शिकूनही मला माहितच नाही. आता जाऊन पहायला हवं.

टिळक रोडवर काका हलवाईसमोर 'संजीवनी' नावाचं घरगुती हॉटेल आहे. तिथे बटाटेवडा मस्त होता

भेळ खायची असेल तर पुष्करणी ला पर्याय नाही. पुष्करणी विश्रामबाग वाड्यासमोर आहे. चितळे दही चक्का दुकान आहे त्याच्या जवळ.

आशु तू असं कर.. वरचं तुझं पोस्ट एडीट करुन गाव आणि त्याखाली पदार्थाप्रमाणे ठीकाणं असं एकत्र करत रहा. म्हणजे चटकन एखाद्याला पुण्यात यायचं असेल तर तयार यादी मिळेल. तसंच इतर जागांबद्दलही.

साबुदानावडा: SNDT समोरील बोळात एक हातगाडीवाला गरम गरम तळत असतो एकदम झकास!! Happy
-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको

मागे आम्ही दिल्लीतल्या खाण्याच्या ठिकाणांबद्दल बोलत होतो.. ते वाहुन जावु नये म्हणुन अ‍ॅडमिननी दिल्लीतल्या खाण्याच्या जागा असं एक नवं पान तयार करुन दिलं... अश्याच पध्दतीची पानं वेगवेगळ्या गावासाठी करता आली तर जास्त सोयीचं होईल.. सगळ्या गावांचं एकत्र लिहिलं तर पुढे शोधायला खुप अवघड होईल.
<<आशु तू असं कर.. वरचं तुझं पोस्ट एडीट करुन गाव आणि त्याखाली पदार्थाप्रमाणे ठीकाणं असं एकत्र करत रहा. म्हणजे चटकन एखाद्याला पुण्यात यायचं असेल तर तयार यादी मिळेल. तसंच इतर जागांबद्दलही.>>.. यामुळे आपल्याला सोप्प होईल कळायला पण तिला किती काम.. सारखं सारखं एडिट करत बसावं लागेल.. खाण्याच्या बद्दल बोलायला सगळ्यांनाच आवडत ना... Happy

बाकी हा धागा मस्तच... अगदी याच पानावर लिहिलं सगळ्या गावांमधल्या खादाडीबद्दल तरी माझ्यासारखे नक्कीच वाचतिल अन लिहितिलही.. Happy

जाईजुई, तू ठाणेकर आहेस? बरीच माहिती आहे गं तुला Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

आणि ती तिखटांच्या शौकिनांसाठी राहिलीना 'काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रSSSSSSSSSSSss' कर्वे रोड अबासाहेब गरवारे समोर.

-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको

मस्तानी : मुंबईत कुठे बर मिळेल ?????
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

पुण्यात उत्कृष्ठ जेवण फक्त पुरेपुर कोल्हापुर आणी बाणेररोड च्या कॅप्सीकम मध्येच.. Wink Lol

साबुदाणा वडा --प्रकाश .. शिवाजी पार्क
आस्वाद फेमस आहे ..पण मला प्रकाश चा जास्त आवडला

होय ग अश्विनी गेली ६.५ वर्षे येऊन जाऊन ठाणेकर आहे मी.. आणि खाणे हा कमकुवत बिन्दु आहे न! Happy

केदार, मला मुम्बैत कधी मिळाल्याचे आठवत नाही.. तुमच्या पार्ल्यात असण्याचा स्कोप आहे.

बिर्याणी -

१. करीम'स - कुठच्याही हिरानंदानीत असते - टिक्का बिर्यानी उत्तम
२. गोरेगावला एक प्रसाद म्हणून माणूस आहे तो ऑर्डरवर बनवून देतो.. थोडी हॉटेल टाईप नसलेली पण झणझणीत!

पुण्यात उत्कृष्ठ जेवण फक्त पुरेपुर कोल्हापुर आणी बाणेररोड च्या कॅप्सीकम मध्येच.. >>> राम्या,क्वांटिटी वाढव तिथली... नुसती चव असुन उपयोग नाही.. पोटभर खायचा आनंद पण मिळायला हवा Happy

पुण्यात
वडापाव - अजंठा (नवी पेठ, काका हलवाई समोर)
सामोसे - अनारसे (जीवाला खा सामोसे, ज्ञान प्रबोधिनी समोर)
अंडा भुर्जी - जवळ जवगाड्यांवर्भुर्जीवाल्या गाड्यांवर (असं ऐकून आहे.)
सी फूड - निसर्ग (कर्वे रोड), सृष्टी (टि, स्मा. समोरच्या बोळात)

अजून आठवेल तसं लिहेन.

~साक्षी

चायनीज आवडत असेल तर प्रभादेवीला एक टिपीकल चायनीज रेस्टॉरंट आहे "चायना व्हॅली" म्हणुन. छान आहे अगदी. आणि अगदी मराठमोळ्या जेवणासाठी दादरच "आस्वाद". तिथलं थालीपीठ तर अगदी ऑस्स्स्स्समच...
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

खाऊगल्ली असे शिर्षक बघीतल्यावर मला तांबडी जोगेश्वरीचा बोळ आठवतो आहे. Proud

राम्या,क्वांटिटी वाढव >>>
तिथे मिळत असलेल्या हाडकांची क्वांटीटी वाढवेल हं तो. Proud

केप्या , मया...आलात का लगेच टोमणे मारायला... :राग:... पुढच्यावेळी तुम्ही आलात की बघ कसा बदला घेतो ते... Wink

>>पुण्यात मिसळ खावी ती
Rofl

पुण्यात आणि मिसळ Rofl

कोल्हापुरातील खादाडी साठी इथे पहा

>>SNDT समोरील बोळात एक हातगाडीवाला गरम
हं मस्त असतो, शनिवारवाड्याच्या समोर, लालमहाल च्या अलिकडच्या गल्लीत पण सोम्,गुरु, शनिवारी झक्कास शाबुदाणावडा मिळतो

समोसा: जंगली महाराज रोड ला भोसले भुयारी मार्गाजवळ ममता मधे, ज्ञानप्रबोधिनीजवळ अनारसेसमोसे वाले

>>अश्याच पध्दतीची पानं वेगवेगळ्या गावासाठी करता आली तर जास्त सोयीचं होईल.. सगळ्या गावांचं एकत्र लिहिलं तर पुढे शोधायला खुप अवघड होईल>>>>
अनुमोदन, काही ठिकाणी आधीच चालू झालीत असे धागे

बिर्याणि करता पुणे मधे अजुन एक मस्त ठिकाण म्हणजे - बागबान camp मधे. दम बिर्यणि एकदम मस्त्.जरुर try kara.

अशू, १ नम्र सुचना,
सगळ्या गावांच्या झक्कास पदार्थांची एकाच धाग्यावर यादी करण्यापेक्षा प्रत्येकाची स्वतंत्र केली तर वाचायला, शोधायला [नी त्यामुळे तिथे गेल्यावर जाऊन शोधून खायला] सोपे जाईल.

पुण्याची अशी यादी नाहीच आहे ना माबो वर?

Pages