पुण्यातली खाऊगल्ली !

Submitted by आशूडी on 22 May, 2009 - 04:17

आपल्या पुण्यात कुठे काय चांगलं खायला मिळतं , कुठल्या हॉटेलची काय खासीयत आहे याची चर्चा कितीतरी वेळा पुणेकर बाफ वर होत आली आहे. मग विचार केला की अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती प्रत्येक शहरात, गावात असेल. आपण प्रवासाला गेलो असतानाही अचानक तिथल्या एखाद्या उत्कृष्ट खाऊगल्लीचा आपल्याला शोध लागतो. तेव्हा ही माहिती आपण जर एक स्वतंत्र धाग्यावर साठवली तर ती सर्वांनाच उपयोगी पडेल. नाहीतर वैशाली- वाडेश्वर मध्ये जाऊन, रांगेत वाट पाहूनही जर कुणी पावभाजी खाल्ली तर काय फायदा! तर या धाग्यावर आपण लिहूया, माझ्या पुण्यातल्या खाऊगल्ल्या! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहा साठी....तिलक

चहासाठी अजून काही
तुलसी - जेएम, एफसी च्या मध्ये
नागनाथ आणि बाजीराव रोड वर शनिपार च्या अलिकडे एका गल्लीतले अमृततुल्य Happy

डेक्कनवरच्या लकीच्यावर एक जनसेवा भोजनालय असायचं ना ? तिथली थाळी छान असायची.

आणि त्या लकी का गुडलक मध्ये भेजा फ्राय वगैरे नावाचे पदार्थ असायचे. . चवबीव माहित नाही.

>>जनसेवा भोजनालय असायचं ना ? तिथली थाळी छान असायची.
अजूनही आहे... एकदम झक्कास महाराष्ट्रीयन थाळी असते... इतक्या वेळा गेलोय की तिथला मालक पण आता ओळखीचा झालाय

प्रभाचे वडे विसरलात का मंडळी ?

अरे झक्कास आहे हा धागा...आणि पुण्यातली खादाडी तर जिव्हाळ्याचा विषय..
पुण्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे...तिथले डायनिंग हॉल्स...

त्यातले काही...

१. श्रेयस - आपटे रोड
२. जनसेवा भोजनालय - डेक्कन
३. दुर्वांकुर - या मधे पानात इतके पदार्थ वाढतात कि काय खाउ काय नको...असा संभ्रम होतो..पण गर्दी आणि कलकलाट पण खूप असतो. Sad
४. सुकांता - झेड ब्रिज जवळ - इथली रबडी एकदम झक्कास असते...
५. सुरस - पाटील प्लाझा सारसबागेच्या समोर..
६. बादशाही - टिळक रोड
७. कृष्णा डायनिंग - लॉ कॉलेज रोड
८. अल्का टोकिज समोर पण एक चांगला डायनिंग हॉल आहे.

अजुन टाकतोच जसे आठवतील तसे...

केद्या, दुर्वांकुर हल्ली लय वाईट झालय रे... रेटींग -ve करून टाकलय मी त्याचे...
सुकांता झक्कास..
पंचवटी गौरव - भंडारकर रोड, राहून गेले या लिस्ट मध्ये

>>अल्का टोकिज समोर पण एक चांगला डायनिंग हॉल आहे.
मधुरा म्हणून होता, आता बंद झाला रे

अजून काही नावे:
पुना बोर्डींग हाऊस
पुना गेस्ट हाऊस
आतिथी - जंगली महाराज रोड
आशा - आपटे रोड
सात्विक - बादशाही च्या समोरच्या गल्लीत
राजधानी - अ‍ॅड्लॅब्ज, कल्याणीनगर मध्ये- मला आवडले नाही पण हे Sad
मयुर
मथुरा [जंगली महाराज रोड] च नाव कसं बरं विसरलो मी....

दुर्वांकुर हल्ली लय वाईट झालय रे... >>>
एकदम बरोब्बर्...मी एकदा-दोनदाच गेल्लोय...पण आता जायचे टाळतो.
अरेरे मधुरा बंद झाले ?

बाकी, आतिथी, मथुरा, आशा.. हे खुप छान आहेत्...मी कामत, सुभद्रा पेक्षा इकडे जाणे पसंत करतो
अजुन एक, प्रभात रोड वरच, जरा आतल्या बाजुला एक डायनिंग हॉल आहे...तोही छान आहे..

कोथरुड स्टँड जवळ श्रुती डायनिंग हॉल पण चांगला होता..आता माहित नाही.

>>...मी कामत, सुभद्रा पेक्षा इकडे जाणे पसंत करतो
मी पण Happy महाराष्ट्रीयन जेवणाचा त्रास होत नाही म्हणून Wink

>>, प्रभात रोड वरच, जरा आतल्या बाजुला एक डायनिंग
सुवर्णरेखा म्हणतोस का? लय भंगार पोळ्या असतात Sad

>>श्रुती डायनिंग हॉल
आहे रे अजून.. हं चांगले असते जेवण

डेक्कन ला, जुन्या मॅकडोनाल्ड च्या समोरच्या बाजूस, सोSहम् म्हणून आहे, भाकरी, पिठ्ल, पालेभाजी, शेवभाजी इ.इ साठी फेमस....
"खानदेश कॉर्नर" - SB रोड, E-Sqr च्या बाजूचा चौक - हे पण असेच
पण २ ही hygienic नाही असे वाटते

केळ्कर संग्रहालयाजवळच्या बापट मधे कढी खिचडी, थालीपीठ चांगले मिळतात.
आणि खजिना विहिरिजवळ एक चायनीज हॉटेल आहे. एका building मधे. तिथले चायनीज स्वस्तात मस्त!
भरत नाट्य जवळचे मुरलीधर चे चाट! मस्त असते. कधी कधी चुकून चव बिघडते पण एरवी एकदम मस्त.

जुन्या मॅकडोनाल्ड च्या >>> असा पत्ता पुण्याच्या एखाद्या ठिकाणाबद्दल वाचेन असे कधी वाटले नव्हते Happy

>>असा पत्ता पुण्याच्या एखाद्या ठिकाणाबद्दल वाचेन असे कधी वाटले नव्हते
Lol
आता तिथे नाहिये मॅकडी, सध्या तिथे United Colors of Benetton आहे, आणि नक्की दुसरा काय दुवा द्यावा हे सुचलेच नाही Happy

रविवार पेठेत पुरोहित स्वीट्स मध्ये सामोसा अप्रतिम असतो.
त्याच्या समोरच गाडीवर साबुदाणा वडा आणि सोबत काकडीची कोशिम्बीर.

The Place Touche the Sizzler - अप्रतिम सिझलर्स मिळतात, कॅम्पात वेस्टन टॉकिज शेजारी.

मनकवडा आणि केदार- डायनिंग हॉल्सची लिस्ट जबरी. Happy

चला आता माझी लिस्टः-

१.उपीट- हॉटेल वैशाली (इथले बाकीही बरेच चांगले पदार्थ मिळतात पण मला विशेष करून इथलं उपीट
आवडतं)

२.भेळ,शेवपुरी - कृष्णा डायनिंग हॉलच्या अलिकडे असलेला भेळवाला,लॉ कॉलेज रोड
३. ऑमलेट आणि बन मस्का - गुडलक रेस्टॉरंट
४. सामोसे- ममता स्वीट्स, जे एम रोड
५. म्हैसूर मसाला डोसा- हॉटेल `सुभद्रा' डेक्कन
६. चायनीज :- मॅक्डी (डेक्कन) समोरील चायनिज स्टॉल्स
७. मटका कुल्फी - झेड ब्रीज, डेक्कन
८. उसाचा रस :- शैलेश रसवंती गृह,स.पे.
९. आलु पराठा:- सेनापती बापट रोडवर आयसीसीच्या समोर एक टपरीवजा छोटं हॉटेल आहे तिथे.
१०.मिक्स फ्रुट ज्यूस :- अतुल, सारसबागेजवळ
११. चहा:- अमृततुल्य
१२. पॅटिसः- संतोष बेकरी (आपटे रोड आणि आनंदनगर्,सिंहगड रोड)
१३.कांदाभजी आणि पिठलं भाकरी:- सिंहगड
१४. कोन आईसस्क्रीम :- बालाजी आईसक्रीम,कर्वेनगर
१५.पानः- हॉटेल पोर्टिगो(डेक्कन) जवळचा पानवाला,शौकीन

प्रभात रोडवर एक डायनिंग हॉल आहे मस्त गरम पोळ्या वाढतात आणुन हव्या तेवढ्या आणि दुसर्‍या मजल्यावर आहे ते. आणि तिथे एक काका पुस्तके विकत असतात. त्यांच्याकडे बरिच मराठी पुस्तके पहिली होती मी.

हा धागा 'पुणे' ग्रूपमध्ये(ही) असायला हवा. ज्या गावची खाऊगल्ली त्या गावचा ग्रूप.

('आहारशास्त्र आणि पाककृती' मध्ये का? 'पाककृती' करायला नको म्हणून तर ही यादी, आणि खाऊगल्लीचे आहारशास्त्राशी वाकडे असते. :दिवा:)

मिनोती,

तू म्हणते आहेस ते आशा डायनिंग हॉल. आपटे रोडला आहे.

जंगली मजाराज रस्त्यावर शरणम् डायनिंग हॉल आहे. मयूर थालीच्या शेजारी, मागच्या बाजूला. एक गुजराती आजी हा डायनिंग हॉल चालवायच्या. तिथे अप्रतिम थाळी मिळते. मागच्या बाजूला असल्याने अजिबातच गर्दी नसते.

हे पान लोकप्रिय होत चालले आहे. पण आताच पहा सगळेच एका पानावर असल्यामुळे कुठे काय आहे हे शोधणे हळूहळू अवघड होत चालले आहे. तेंव्हा हा धागा स्वतंत्र ग्रूपमधे हलवला आहे.

Pages