आमची शाळा

Submitted by चंपक on 23 February, 2013 - 05:57

Copy of Pamplet_F1.jpg

पी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली! पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला Happy
लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे!

अहमदनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी नागापुर औद्योगिक वसाहतीमधील शिक्षणाच्या सुविधांची वानवा लक्षात घेता, एक इंग्रजी माध्यमाची शाळा इथे सुरु करित आहोत. ५००० + ५००० (क्रिडांगण) स्केअर फुटाच्या जागेमध्ये, प्ले ग्रुप ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरु करणार आहोत. अल्प उत्पन्न गटाचे पालक असल्याने फी देखील कमीच असेल. आमच्या प्रयत्नांना काही दानशुर व्यक्तींचा हातभार लागला तर उत्तम सोयी देउ अशी आशा आहे.

शाळेचे सहा खोल्यांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. अजुन सहा खोल्यांचे बांधकाम चालु आहे. रंगकाम झाले कि फोटो टाकेलच. मार्च च्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. निमंत्रण पत्रिका पाठवली जाईलच Happy

Copy of PampletF2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, सुंदर उपक्रम.... पण तुमच्या या शाळेत वेगळे काही असल्यास (इतर शाळांपेक्षा) ते इथे कृपया द्याल का ??

या उपक्रमाकरता मनापासून अभिनंदन व अनेक शुभेच्छा..

जोशीमॅडम मराठी शाळेला विद्यार्थी तर मिळायला हवेत. हल्ली ऐपत नसतानाही पालक मुलांना इन्ग्लिस शाळेतच शिकवण्याचा अट्टाहस करताना दिसतात.
ह्यावरुन एक जोक आठवला पन इथल्या सोवळ्या वातावर्नात नकोच्ज......

छानच. अभिनंदन!

विद्यार्थ्यांकडून डोनेशन न घेता माफक फीमध्ये शाळा काढताय हे खरच कौतुकास्पद आहे.

Pages