'चांदवड'च्या मुलखात :अंतिम भाग: "रंगमहाल"

Submitted by Yo.Rocks on 20 February, 2013 - 13:48

'चांदवड'च्या मुलखात :भाग २: 'इंद्राई' ची नवलाई इथून पुढे:

इंद्राईच्या पायथ्याचे हे गाव म्हणजे राजधेरवाडीच्या अलिकडचे खेडं... इंद्राईला जायचे तर या गावातून जाणे सोयीस्कर.. अगदी ठळक वाट सरळ वरती नेते.. पण मातीची निसरडी वाट असल्यामुळे धाप लागणार याची १०० % खात्री ! असो.. आम्ही इंद्राईवर वेगळ्या वाटेने चढून गेलो नि उतरताना ही वाट पकडली.. एकंदर वाटेत वेगळेपण आल्याने तितकेच समाधान.. बाकी रविवार म्हणून की काय ह्या खेडयात अगदी कोंबडया, बकर्‍यांची फारच वर्दळ होती.. Wink पोराबाळांचा कल्लोळ सुरु होताच.. कोणी गुरांबरोबर दिसतोय.. तर कोणी बकर्‍यांबरोबर.. कोण डोक्यावरुन पाण्याचे हंडे आणतेय.. इथली सगळी घरं अगदी साधी, बैठकी नि कौलारुची... सगळीकडे पिवळी लाल धम्मक जमिन.. अगदी दुरपर्यंत एखादं मोठी छाया देइल असे मोठठाले वृक्ष सापडणे कठीणच..

- - -

-----

गेल्या पंधरा मिनीटांत एकही गाडी फिरकली नसल्याने आम्ही अगदी हायवेपर्यंत चालतच जाउ असा कठोर निर्णय घेतला..आमच्याभोवती जमलेल्या लहानग्यांना खाउ देउन आम्ही चालते झालो.. गाडी मिळाली तर लिफ्ट घेउच म्हणत मुकाटयान चालू लागलो.. पण कंटाळवाणे वाटत नव्हते.. अधुनमधून हवेची झुळूक होती.. शिवाय वातावरण तापदायक नव्हते... गावातल्यांनी सांगितले होते ६-७ किमीचे अंतर आहे.. पण अंदाजाप्रमाणे बरीच तंगडतोड असणार हे गृहीत धरले.. अरुंद अश्या डांबरी रस्त्यावरुन चालताना आजुबाजूचा रखरखाट धुरकट वातावरणामुळे फारसा जाणवत नव्हता.. रस्ता अगदी मोकळा.. एवढी चाल वाचवण्यासाठी रो.माने एखाद्या बाईकची सीट खाली असेल तर लिफ्ट घेउन एकेक करुन पुढे जाउ अस प्रस्ताव मांडला.. तो मंजुर होईस्तोवर एक बाईक आली पण.. नि पुढे हायवेच्या अलिकडे असलेल्या 'इच्छापूर्ती गणेशमंदीर' याठिकाणी भेटू म्हणत रो.मा बाईकवरून गेला पण... या घाईघाईत अजुन एक सॅक पुढे पाठवता आली असती हे विसरुनच गेलो..

आता गिरी व माझी ' हम दोनो दो ट्रेकर दुनिया छोड चले'च्या आवेशात त्या सुनसान डांबरी रस्त्याने तंगडतोड सुरु झाली.. दोन रिकाम्या बाईक एकत्र येवोत व एकाच वेळी दोघांना लिफ्ट मिळूंदेत अश्या सुप्त आशेच्या जोरावर आम्ही अगदी बिनदीक्तपणे चालत होतो.. पाठीमागे डावीकडे इंद्राई व राजधेर अगदीच अस्पष्ट दिसत होते.. पुढे हा गाडीरस्ता भलताच लांबून नजिकच्या डोंगराला अगदी बिलगून जात होता.. तेव्हा आम्ही या रस्त्याला टांग दिली आणि गावकर्‍यांची वाट धरली.. परिणामी वेळ व निरर्थक तंगडतोड वाचली.. उलट दोन- तीन खेडयांना भेदुन जाणारी ही वाट खूप सोयीस्कर नि बरी वाटली..

नशिबाने आम्हाला नाही म्हटले तरी जवळपास अर्धापाउणतासाच्या चालीनंतर लिफ्ट मिळाली.. अगदी इच्छेप्रमाणे दोन बाईक हजर झाल्या ! कळले तर आमच्या दोन्ही बाईक चांदवड दिशेनेच जात होत्या.. 'आता आपण चांदवडलाच उतरु, रो. मा येइल परत लिफ्टने' इति गिरीने युक्ती लढवली.. ठरल्याप्रमाणे त्या गणेशमंदीराजवळ रो. मा वाट बघतच होता.. पण आम्ही चालत्या बाईकवरूनच चांदवड एसटी स्थानकावर ये म्हणत टाटा केले ! झाले आता आम्ही पुढे नि रो.मा मागे राहीला.. मला उगीच रो.मा बद्दल काळजी वाटू लागली..

हायवेला लागताच अगदी चांदवड गावच्या वेशीवर माझा बाईकवाला थांबला.. नाईलाजास्तव उतरणे भाग होते.. पाठोपाठ मग गिरीला माझ्यामुळे उतरावे लागले.. म्हटले आता रो.माला इकडेच थांबवून तिघे एकत्र 'रंगमहाल' पहायला जाउ.. जवळपास पाउणतास झाला.. जाणार्‍या दुचाकी, चारचाकीवर नजर ठेवून होतो पण रो.मा काही येइना.. मोबाईल केला तर त्याचा फोन काही लागेना.. हायवेला लागला तर नेटवर्क सुरु होते पण ह्याचा मोबाईल लोबॅटरीमध्ये खल्लास झाला असणार असा दाट संशय येउ लागला.. वाट पाहून कंटाळलो शेवटी गिरीने बाजूच्या गॅरेजजवळ एकाची बाईक 'मित्र मागे राहिलाय.. लगेच घेउन येतो' म्हणत उसनी मागितली.. आणि त्या महाव्यक्तीने चक्क कसलीही कुरकुर न करता दिली. ! तरीदेखील गिरीने औपचारिक म्हणून गॅरंटीसाठी माझ्याकडे बोट दाखवले ! मी बसलो होतोच एकीकडे ट्रेकसंसार सांभाळत ! खरच देवासारखा भेटला ! पण इतके धाडस करुनपण रो.मा मात्र काही भेटला नाही.. गिरी एकटाच परत आला !

हा गेला असेल पुढे म्हणत आम्ही एकदाचे एसटी स्थानक गाठले.. दुपारची वेळ असली तर ढगाळ वातावरणामुळे गरमीचा त्रास नव्हता.. स्थानकात पोहेस्तोवर आमचे पण फोटो काढ म्हणणारी दोन दृश्यं सामोरी आली..

हायवेलाच खेटून असलेल्या टेकाडावरचे छोटे मंदीर (हे मंदीर इंद्राई किल्ल्यावरुन पण दिसते)

लुपाछूपी

एसटीस्थानकात पोहोचलो पण साहेबांचा पत्ता नव्हता.. आता मात्र चिंताग्रस्त झालो.. परिणामी मनसोक्त शिव्या घातल्या ! Proud गिरी तर 'हा रो.मा नक्कीच रंगमहाल बघायला गेला असणार, आपण तिथेच जाउ' म्हणू लागला.. पण मला तशी शक्यता कमीच वाटत होती.. आपण इथेच थांबू म्हणत इथे तिथे रेटाळत राहीलो.. शेवटचा पर्याय म्हणून रंगमहालाची वाट धरणार तोच मोबाईल वाजला.. नि काही क्षणातच रो.मा समोर !

'तुम्ही गेल्यानंतर पाच दहा मिनीटांतच बाईकची लिफ्ट मिळाली.. पण बाईकवाल्याने रेणुकामातेच्या मंदीराजवळचा शॉर्टकट पकडला.. नि थेट रंगमहालाच्या प्रवेशद्वारापाशी सोडले.. त्यामुळे आपली भेट चुकली असावी.. तुम्ही एसटी स्थानकात वाट पाहत असाल म्हणून मी त्या महालात न शिरता एसटी स्थानकाकडे वळालो.. वीसेक मिनीटांच्याचालीनंतर आलो तर तुम्ही गायब.. मग इथे तिथे चकरा मारू लागलो.. त्यात फोन लोबॅटरीमुळे बंद पडलेला.. पाठीवर मोठी सॅक, डोक्यावर हॅट आणि सॅकच्यावर मोठी मॅट असा माझा अवतार बघून आजुबाजूचे कुतुहलाने विचारु लागले.. कुठून आलास.. कुठे गेलेलास.. गडावर काय करता.. काय आहे तिथ.. शिवाय त्या मॅटला पण हात लावून विचारत होते.. आधीच टेंशन नि त्यात असले प्रश्ण... वैताग नुसता.. एक -दोन मोबाईल दुकानात चक्कर मारली तेव्हा कुठे एकाकडे योग्य चार्जर मिळाला.. 'मित्र हरवलेत.. फोन करायचाय.. बॅटरी लो आहे.. चार्ज करुन द्याल का' अशी विनंती केली तेव्हा कुठे हा फोन करु शकलो' इति इति रो.मा भराभर सांगू लागला ! Proud एकंदर काय रंगमहाल एकत्रीतपणे पाहणे हेच आम्हा तिघांच्या नशिबात होते.. Happy

रिक्षा करुन रंगमहालाच्या प्रवेशद्वारी आलो ! रिक्षावाल्यानेच सांगितले म्हणून सॅक तिथेच सोडून रंगमहालाच्या आवारात शिरलो !

हा रंगमहाल म्हणजेच होळकरांचा वाडा ! पहिल्याभागात म्हटल्याप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला.. अगदी प्रवेश केल्यापासून एक अपरिचित ऐतिहासिक ठेवा समोर उभा राहतो... सागाच्या लाकडावर कलाकृती घडवून वाडयाची सजावट मांडलेली दिसते.. अजुनही तशीच टिकून आहे.. या किल्लेसदृश वाडयामध्ये चौकोनी आंगण नि चारी बाजूंनी एकमजली वाडयाची इमारत अशी बांधणी आहे... बघताना वेगळ्याच दुनियेत घेउन जातो.. 'चांदवड' गावात असे काहीतरी पहायला मिळेल असे वाटले नव्हते.. इथे प्रवेश विनामूल्य आहे..

वाडयाचे प्रवेशद्वार

लाकडी खांब

- -

- -

- -

- - -

-----

-- ---


(प्रचिकार - गिरिविहार)

- - -


(प्रचिकार - गिरिविहार)

- - -


(प्रचिकार - गिरिविहार)

इतका सुंदर वाडा पाहून खुष झालोच होतो.. त्यात रिक्षावाल्याने अतिरिक्त माहिती दिली.. या वाडयाच्या मागच्या बाजूस एक भली मोठी विहीर आहे.. पण आता प्रवेशबंद होती.. तरीदेखील त्या रिक्षावाल्याने आम्हाला बाजूच्या एका उर्दु शाळेच्या आवारात नेले.. तिथून शाळेच्या मागच्याबाजून अगदी अडगळी जागेत शाळेच्या खिडकीवर चढायला सांगितले.. नि वाकून शाळेच्या भिंतीपलिकडे पाहिले तर ती अबब विहीर नजरेस पडली.. ही विहीर बघण्यासाठी त्या रिक्षावाल्याने जो मार्ग दाखवला ते पाहून अगदी शाळकरी मुलगा झाल्यासारखे वाटले..! ह्या विहीरीचे बांधकाम एकदम भक्कम वाटत होते.. फोटो काही फारसा खास येणार नव्हता पण आठवण म्हणून एक काढलाच.. ह्याच विहीरीमार्फत म्हणे परिसरात पाणीपुरवठा होतो..

आमच्या सफरीचा शेवट अश्या देखणीय वास्तूमुळे झाला यातच समाधान होते.. दिड दिवसाच्या अथक भटकंतीनंतर आम्ही अखेरीस नाशिकचा रस्ता धरला.. ! या प्रवासातही तो बघ धोडप.. तो बघ अंकाई इति इति बाण मारणे चालूच होते.. !

नाशिक गाठले आणि मग तिथेच एका उपहारगृहात गिरीच्या वाढदिवसानिमित्त भोजन पार पाडले.. मायबोलीकर हेम जमल्यास स्टँडवर भेटणार होता पण तो येण्याआधीच आम्हाला एका प्रायवेट टव्हेराने आमंत्रण दिले नि आम्ही मुंबईच्या दिशेने कूच केले...!

सातमाळा डोंगररांगेचा डिसेंबरमधला प्लॅन फिस्कटला होता त्याची सारी कसर या चांदवड मुलखातल्या आडवाटेच्या मुशाफिरीमुळे बर्‍यापैंकी भरुन काढली गेली.. या नाशिक प्रांतातील मुशाफिरीने तर मला कधीच निराश केले नाही.. दरवेळची भटकंती काही ना काही अविस्मरणीय आठवणी देउन जाते.. मग अशाच आठवणी नेहमीच्या दैनंदिन जीवनातसुद्धा सदैव धगधगत राहतात.. नि जेव्हा उद्रेक होतो तेव्हा पुन्हा एका नव्या ट्रेकचा आरंभ झालेला असतो. !

समाप्त नि धन्यवाद Happy
***************

'चांदवड'च्या मुलखात :भाग १: किल्ले राजधेर

'चांदवड'च्या मुलखात :भाग २: 'इंद्राई' ची नवलाई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राष्ट्रीय महामार्गावरून नाशिक -धुळे दोन-तीनदा गेलो व चांदवड लागलं कीं अहिल्याबाईंचा वाडा पहावा असं तीव्रतेने वाटायचं. आज खूप वर्षानी ती इच्छा पूर्ण झाली. धन्यवाद. अर्थात तुमच्यासारखं जाणं कल्पनेतही नव्हतं. हेवा वाटला वरचं वाचून व पाहून !

रंगमहाल खरंच सुरेख. मला भोरच्या वाड्याची आठवण आली. Happy

प्रचि आणि लेख नेहमीप्रमाणे मस्तच Happy

दरवेळची भटकंती काही ना काही अविस्मरणीय आठवणी देउन जाते.. मग अशाच आठवणी नेहमीच्या दैनंदिन जीवनातसुद्धा सदैव धगधगत राहतात.. नि जेव्हा उद्रेक होतो तेव्हा पुन्हा एका नव्या ट्रेकचा आरंभ झालेला असतो. >>>क्या बात है यो मस्तच __/\__ Happy जबरदस्त लेख सुंदर प्रचि

पुढच्या वेळेस सटाण्याला गेल्यावर मुद्दाम चांदवड पर्यंत जाऊन रंगमहाल बघून यायला पाहिजे..

छान झाली ही मालिका. तो रंगमहाल कित्ती देखणा आहे. काय ती कलाकुसर आणि तरीही मजबूत बांधणी. अगदी वैशिष्ठ्यपूर्ण. कोणी रहात नाही का त्यात?

छान. हा ही भाग मस्त झालाय.
एकंदरीत ...अविस्मरणिय ट्रेक झाला तर Happy

दरवेळची भटकंती काही ना काही अविस्मरणीय आठवणी देउन जाते.. मग अशाच आठवणी नेहमीच्या दैनंदिन जीवनातसुद्धा सदैव धगधगत राहतात.. नि जेव्हा उद्रेक होतो तेव्हा पुन्हा एका नव्या ट्रेकचा आरंभ झालेला असतो. + १००००००

यो कसला भारी वाडा आहे हा...तुमच्या ट्रेकची सांगता अगदी जोरदार झाली की...
श्या राव...कधी योग येणार आहे देव जाणे तुमच्याबरोबर ट्रेक करण्याचा

धन्यवाद ! Happy
चांदवडला गेलात तर रेणुकामातेचे मंदीर व हा रंगमहाल न चुकवण्यासारखे ! रंगमहाल पाहण्यास पंधरा -वीस मिनीटं पुरेशी आहेत.. वाडयात तळमजल्यावर दोनेक कुटूंबाचे वास्तव्य आहे..

कधी योग येणार आहे देव जाणे तुमच्याबरोबर ट्रेक करण्याचा >> चँप.. मी पण वाट बघतोय Happy कान्हेरी करुन बराच काळ लोटला रे..

वॉव.. सुंदर.. अकल्पितपणे असंकाही पाहायला मिळालं कि त्याचं केव्हढं अप्रूप वाटतं ना..
आमच्यापर्यन्त पोचवल्याबद्दल धन्स!!! Happy

तो हायवे ला खेटून मंदिर असलेला डोंगर 'रासलिंग' नांवाने ओळखला जातो. पावसाळ्यात तर हा भाग अत्यंत देखणा असतो. या पावसाळ्यात या सगळ्यांनी..!! Happy
अप्रतिम लेख, माहिती व प्रचि.. योग्याबरोबर ट्रेक करायचा योग कधी येणार आहे कोण जाणे!
.. मी स्टँडावर पोहोचल्यावर तुझा मेसेज वाचला. अक्षरशः काही मिनिटांनी तुमचे दर्शन हुकले... Sad