हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी सिरियस, मग वर्मटेल. डंबलडोरानेही आधी त्यांचा सि. की. व्हायची तयारी दाखवलेली असते.

मेरोप तिच्या बाळाच्या जन्माच्या वेळी लंडनमधे असल्याचा पुरावा असणारी स्मृती कुणाची असते?

क वरुन आहे त्याचं नाव.. कॅक्क्ट्स किंवा तत्सम काहीतरी. गुगल करायचा मोह होतोय. Proud
हो लॉकेटच.. मी कसल्यातरी तंद्रीत अंगठी लिहीलं. Uhoh

अरे वा परत लोक जमले का.. छान छान Happy

जरा तुम्हाला हॅपॉ मधल्या न पटलेल्या गोष्टींबद्दल/एखाद्या मिसिंग क्ल्युबद्दलही लिहा इकडे. कदाचित त्याचे काही स्पष्टीकरण मिळुन जाइल.

उदा. डंबल्डोअरचे ते सिल्वर उपकरण.. आर्थर वीजलीवर झालेल्या हल्ल्यानंतर डंबलडोअर ते वापरतात पण त्याचे स्पष्टीकरण पुढे मलातरी कुठे सापडले नाही.

नंदिनी
त्या जिंक्स चे नाव महित नाही. पुस्तकात सुद्धा एव्हढेच दिले आहे कि त्या जिंक्स मुळे चेहरयावर आणि मानेवर पुट्कुळ्या येतील आणि त्याचा आकार SNAKE शब्दाप्रमाणे बनेल.
बरोबर आहे ना?
असेल तर नवीन प्रश्न विचारा.

Snake नव्हे, sneak..

तो जिन्क्स furnunculus आहे असा उल्लेख नाही आणि त्यात फक्त चेहर्‍यावरच पुटकुळ्या येऊन स्नीक असा शब्द बनतो. तो हर्मायनीचा डिझायनर जिन्क्स असावा.

विल्हेमिना.
यानिमित्त बाकीच्यांची पण आठवून पाहिली.
पॉपी (पॉम्फ्रे)
पोमोना (स्प्राउट)
मिनर्व्हा (मॅकगोनागल)
सिबिल (ट्रेलॉनी)
डोलोरेस जेन (अम्ब्रिज)

<<<<श्रद्धा its sneak and not snake. thanks for correction.
हॅरीवर कोर्टात केस चालु असताना त्याच्या बाजुने साक्ष देणारीचे नाव काय? आणि ती हॅरीला कधीपासुन ओळखत असते?

आराबेला फिग. ती हॅरी डर्स्लींच्या घरी रहायला आल्यापासून त्याला ओळखत असते.डंबलडोरनी तिला तिथे रहायला पाठवलेलं असतं

<<<बरोबर
मीच एकटी प्रश्न विचरते आहे. सगळी डो़की कुठे गेली?
ठिक आहे सध्या विचारते---
रॉनच्या भावांचे विच रेडिओ वरची टोपण नावे काय?

बेलाट्रिक्सच्या नवर्‍याचे नाव काय? (पूर्ण पुस्तकांत बेलाट्रिक्सला नवरा होता हे सांगून त्याला एकही उल्लेख न देता बाईंनी काय साध्य केलं कुणास ठाऊक? त्यापेक्षा ती सिंगल दाखवली अस्ती तर वोल्डी आणि तिचं एक गाणं तरी आलं असतं पिक्चरमधे .. सात समंदर पार मै तेरे पीछे पीछे आ गयी... हाहा

हे रोलिंगबाईंना दाखवायला पाहिजे हाहा हसून हसून गडबडा लोळण

<<अरे माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही अजुन आणि नवीन प्रश्न काय विचारताय? विच रेडिओ म्ह्णजे रॉन ७ व्या पुस्तकात वेगवेगळे पासवर्ड वापरुन सुरु करायचा जो प्रयत्न करत असतो आणि बाहेरच्या जगातल्या घडमोडि जाणुन घेत असतो.

Pages