फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे".."निकाल"

Submitted by उदयन.. on 3 February, 2013 - 23:15

प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील

जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

फेब्रुवारी महिन्याची थीम आहे......."रंग प्रेमाचे...!!!!"

प्रथम क्रमांक :- आशुचँप - हार्मोनियम वाजवणारे आजोबा आणि आज्जी
थीम ला साजेसा फोटो. टळटळीत उन्हात काढलेला फोटो असला तरी तो टळटळीत पणा कमी करुन शितलता यावी व प्रेमाचा रंग उठुन दिसावा म्हणुन फोटो ब्लॅक अँड व्हाईट केला आहे (असावा).

1 ajoba.jpgद्वितीय क्रमांक :- विभागुन दिलेला आहे
अ) गिरीश सावंत - आई , तु पण जरा खा ना..
थीम ला साजेसा फोटो. लाल-गुलाबी गुलाब हे धनदांडग्यांसाठी प्रेम व्यक्त करायची साधने असतिल पण त्या चिमुकलीने आपल्या मातेला देऊ केलेला पावाचा तुकडा त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगुन जातो.

2.1 girish savant.JPG

ब) कंसराज - रंग पक्ष्यांच्या प्रेमाचा
यात प्रेमाचे रंग, क्षण परफेक्ट कॅप्चर केले आहेत.

2.2 kansaraj.JPGतृतीय क्रमांक :- स्वस्ति - आज तु डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा...
कॅप्चर केलेला मोमेंट आणि शिर्षक आवडलं.

3 swasti.jpgउत्तेजनार्थ :-
१) मयी - मतिमंद मुलांची शाळा
"प्यार दिमाग से नही दिल से किया जाता है" हे अगदी सार्थ ठरवणारा फोटो.
mayi..ullekhaniya.jpg

२)इंद्रधनुष्य - 'प्यार कोई खेल नही'... आमच खेळा वरील प्रेम

indra uttejanarth.jpg
नियमः-

१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

एक वेंट्री आमचीपण...
हे तुरे अगदी टोकावर असल्यामुळे अजून स्पष्ट येवू शकले नाहीत. माझ्या कॅमेर्‍याच्या झुम करण्याच्या क्षमतेच्याही पलीकडचे होते ते... Wink

प्रचि १: 'प्यार कोई खेल नही'... आमच खेळा वरिल प्रेम Happy

प्रचि २: झाडावर प्रेम करा, झाडा खाली नको Wink

Love is…
DSCN1590

हे आजोबा त्यांच्या हार्मोनियमवर अतिशय सुरेल शास्त्रीय संगीतावर आधारीत जुनी हिंदी गाणी वाजवतात...आणि या आज्जी त्यांची काळजी घेतात...टळटळीत उन्हाचे घरासमोर आल्यानंतर त्यांना घरी बोलावून पाणी दिले आणि खायला घातले...आजोबांना आता वयोपरत्वे अंधुक अंधुक दिसते पण पहिला घास घेण्यापूर्वी बायकोला मिळाले आहे का नाही याची खात्री केली मगच खायला सुरुवात केली...याला म्हणतात प्रेम....

Pages