हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅरी हॉगवर्ट्सला जायला लागल्यापासूनच्या डिफेन्स अगेन्स्ट डार्क आर्ट्स टीचर्सची नावे आणि वर्षाअखेरीस त्यांचे काय काय झाले ते सांगा.

प्रयत्न करते

पहिल वर्षः क्विरेल : मरतो
दुसर वर्षः. लॉकहार्टः. सेन्ट मन्गो मध्ये पाठवतात( मेमरी लॉस)
तिसर वर्षः ल्युपिनः शाळा सोड्तो (सोडावी लागते)
चौथ वर्ष : मुडी (च्या रुपातील बार्टी): अझकाबान मध्ये टाकतात(?)
पाचव वर्षः उम्ब्रीजः मिनीस्टर परत बोलावतात(?)
सहाव वर्षः स्नेपः बॅक टू वॉल्डी
सातव वर्षः. अ‍ॅमीकस ( असच ना?) : मॅकगोनगॉल पकड्तात ना?

पाचव वर्षः उम्ब्रीजः मिनीस्टर परत बोलावतात(?)

सेंटॉर्स पकडून नेतात तिला. मग समहाऊ सुटून येते परत नेक्स्ट पार्ट मधे.

वा वा!
पचवे वर्ष : हवे होते त्यातले अर्धे उत्तर इब्लिस यांच्याकडून मिळाले. डंबलडोर सोडवून आणतो तिला. हास्पिटल विंगमध्ये भरती होते. तिथून गुपचूप निघून जाते.

पी पे कोण? वॉर्मटेल का?

त्याच्या मरण्याचं पुस्तकातलं एक्स्प्ल्नेशन पण जबरी आहे.. विझार्ड फेवर, मेटलचा हात, वॉर्मटेलचं हॅरीला मारण्याची संधी आल्यावर एका क्षणासाठी कच खाणे आणि व्होल्डीने दिलेल्या हाताकडुन त्याचाच बळी! मस्त! Happy

इल्फ विझार्डस ना मारु शकत नसतात ना.. फक्त जखमी करु शकतात असे काहीतरी आहे ना.
सिनेमाचा शेवटचा भाग मला अजिबात आवडला नव्हता. पुस्तकातल्या इम्पॅक्टची सर नाही त्यात. हॅरीचा शेवटचा डायलॉग सिनेमात नाहीच्चे जो मला प्रचंड आवडतो. Sad

हॅरीचा शेवटचा डायलॉग सिनेमात नाहीच्चे जो मला प्रचंड आवडतो.<< हो. आनी ते एल्डर वाँड तोडून फेकतो ते तर खूप कॉमेडी वाटलेलं मला Happy

प्रश्न विचारत आहे: सीरीयस हॅरीला त्याच्या पहिल्या वाढदिवसाची काय गिफ्ट देतो?

सीरीयस हॅरीला त्याच्या पहिल्या वाढदिवसाची काय गिफ्ट देतो? >> टॉय ब्रूमस्टीक
बाय द वे , शेवटचा चित्रपट पाहून आल्यावर मी टाकलेल फेसबुक स्टेटस :
Harry potter movies are like T20 cricket . It's entertaining , appealing and hugely popular . But whatever it is , it's not Cricket Happy

१) ट्रायविजार्ड टुर्नामेंत मध्ये वॉल्डमॉर्टशी लढाई झाल्यावर जेव्हा हॅरी सांगतो की वॉल्डमॉर्टला मी पाहिलं, त्यानंतर अफवा पसरवल्याबद्दल त्याला शाळेतून काढुन टाकण्यात येत आहे अशी शाळेकडून नोटिस येते तेव्हा.
२)लिटिल व्हिंगलिंग मध्ये डडलीला डेथ इटर्स ची पप्पी मिळता मिळता राहते त्यानंतर (अमब्रिजच्या सांगण्यावरुन) उलट हॅरीलाच मिनिस्ट्रीकडून समन्स येतो तेव्हा.

१. अगदी सॉर्टिंगच्या वेळेलाही त्याच्या मनाला शंका चाटून जाते की, हॅटने त्याला सॉर्ट केलंच नाही तर लोक म्हणतील, काहीतरी चूक झाली. तू निघ. Proud
२. नेव्हिलचा रिमेम्ब्राल ब्रूमस्टिक वापरून पकडतो तेव्हा.
३. डॉबी पुडिंग पाडतो तेव्हा त्याला वॉर्निंग मिळते तेव्हाही का? (हे आठवत नाही.)
४. आंट मार्जवर चिडून तिला फुगा बनवतो तेव्हा.
५. डडली मीट्स डिमेंटर्स प्रसंगात.

तेही बहुतेक गजाभाऊ. त्या दोघांना वाटतं की आता शाळेतून काढतील पण शाळेत कोणाला कळतच नाही बहुतेक ते त्या कार नी आलेले. कार हवेत थांबते आणि पुढे व्हॉम्पिंग विलो त्या तडाखा बसतो अन कार रिवर्स गेयर मदी फॉर्बिडन फॉरेस्टात निघून जाते. Proud

कार हवेत थांबते आणि पुढे व्हॉम्पिंग विलो त्या तडाखा बसतो >>>>
नॉय. कार नेमकी व्हॉम्पिंग विलोवर क्रॅश लँडिंग करते बहुधा. आर्थरने केलेले बदल काम करेनासे होतात.

नंतर ती कार एकदा परत येते. आठवतंय का केव्हा? Happy

टाईम टर्नरचा वापर बाईनी कधी कधी केलाय ?
खर सांगायच तर माझ्या मते खटकलेल्या गोष्टीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे Time Travel .
एकदा Time Travel म्हटल की parralel universe / timeline अनेक गोष्टी येतात . त्या नीट हाताळता नाही आल्या माझ्या मते .

टाईम टर्नर बद्दल एक लेख लिहिला होता कोणीतरी तो तुम्हीच का जाधव? >> नाही हो वैद्यबुवा Happy मला तर असा लेख होता हेही माहित नाही Happy

बरं. Happy

टाइम टर्नरचा उपयोग हर्मायनी हॉगवर्ट्समधल्या तिसर्‍या वर्षात एकावेळी दोन वर्गात बसण्यासाठी करते.
याच वर्षीच्या शेवटी हॅरी आणि हर्मायनी बकबीक आणि सिरियस ब्लॅकचे प्राण वाचवण्यासाठी टाइम टर्नर वापरतात.

१. हॅरीचे कुटुंब अज्ञातवासात जातं तेव्हा.
२. ऑऑफीचे हेडक्वार्टर्स (आधी डंबलडोर सि. की. असतो. त्याच्या मृत्यूनंतर ऑर्डरचे सगळे लोक सि. की. होतात.)
३. वीझ्ली कुटुंब अज्ञातवासात जातात तेव्हा. (आंट म्युरिएलचं घर - आर्थर वीझ्ली सि. की., शेल कॉटेज - बिल सि. की.)

Pages