सांजवेड

Submitted by मुग्धमानसी on 7 February, 2013 - 02:24

सांज ढळून गेली सखे गं सर्व परतले
इथे मी एकटी उरले...

खळाळणारे यमुनेचे जळ शांत शांत झाले
दूरवर त्या वृंदावनीचे दिवे मंद झाले
सावलीच्या मागावर मन हे वेडे धाऊन दमले
इथे मी एकटी उरले...

बघ तिथे त्या पानामागे हळूच हलले काही
इथे-तिथे सर्वत्र जरी तो... तरिही कुठेच नाही
त्याला शोधत फिरताना मी स्वतःस हरवून बसले
इथे मी एकटी उरले...

कुठे वाजले पाऊल मजला वाटे आला तोच
त्या तिथे त्या नभात तिथवर माझी कुठली पोच?
तरिही इथे या यमुनेकाठी पाऊल माझे थिजले
इथे मी एकटी उरले...

कशी मी एकटी उरले? तो माझ्या आत बाहेर
हे त्याचे पसरले अंश पुसोनी माझी चाकोर
असा माझ्याच कानी शब्द त्याचा कुजबुजत पडता
म्हणे तो -’मी तुझा प्रारंभ होतो मीच आहे सांगता’
सावळ्या सांजेत मग मी वितळूनी गेले
सखे नाहीच मी उरले....!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोर भयी और सांज ढली रे, समयने ली अंगडाई
ये जग सारा नींदसे हारा, मोहे नींद न आयी

या ओळींची आठवण या खालील ओळींवरून झाली.

>>>सांज ढळून गेली सारी अता रात्र झाली
जग सारे झोपेशी हरले... मला झोप ना आली<<<

>>>दिस ढळला अन् सांज उगवली ऋतू बदलतो कूस
अशा अवेळी माझ्यापासून दूर नको राहूस...
मी घाबरले, मनात मिटले.. त्याच्या पायी फसले<<<

या खालील ओळी आवडल्या:

बघ तिथे त्या पानामागे हळूच हलले काही
इथे-तिथे सर्वत्र जरी तो... तरिही कुठेच नाही<<<

कविता छान आहे.

तुम्ही जाणून बुजून तर 'का करू सजनी' चा अनुवाद करत नव्हतात ना? Happy

कृ गै न

बेफिकीरजी.... या ओळी होत्या खर्‍या माझ्या मनात! माझं खुप आवडतं गाणं आहे हे. त्याच भावना व्यक्त करायच्या होत्या, अनुवादच खरंतर.

बेफिकीरजी.... या ओळी होत्या खर्‍या माझ्या मनात! माझं खुप आवडतं गाणं आहे हे. त्याच भावना व्यक्त करायच्या होत्या, अनुवादच खरंतर.<<<

तसे असलेच तर 'मुक्त भावानुवाद' अशी एक नोंद खाली दिलीत तर तुमच्या आंतरजालीय कवयित्री या प्रतिमेवर कल्पनाचौर्याचा शिक्का बसण्याचा धोका टळू शकेल, असे आपले मला वाटते. निर्णय तुमचाच.