क्रोशाने विणलेला शिंपल्यांचा फ्रॉक

Submitted by अवल on 4 February, 2013 - 23:24

shimplyacha frock.jpg

साधारण २ - ५ वर्षाच्या मुलीसाठी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मला खूप आनंद झालाय. कित्ती दिवसांनी मला असे समाधान मिळाले. टिमवितली प्राध्यापकी सोडल्या नंतर आणि लेक दहावी झाल्यानंतर हे असे शिकवण्याचे चीज झाल्याचे समाधान, पिंकस्वान तू मला दिलास Happy मनापासून धन्यवाद !

एव्हढे मोठे विणकाम नेटाने पूर्ण केले तिने ! मुख्यत: तिच्या चिकाटीचे खूप कौतुक.
खरं तर मी विणला त्याही पेक्षा हा फ्रॉक मोठ्या मापाचा. पण तिने तो पूर्ण केला; अन तोही इतका सुबक आणि सफाईदार !
डिस्टन्स मोडने कला ही शिकवता- शिकता येतं हे आज मला अनुभवता आलं. धन्यवाद पिंकस्वान Happy आणि खूप खूप अभिनंदन.

हा पहा तिने विणलेला फ्रॉक :

DSC00361V copy.jpg

सही... खुपच छान. आता पिंकस्वानला प्रश्न Happy

किती वेळ ( अंदाजे टोटल ) लागला?
तुला आधी क्रोशाचे / लोकरीचे काही येत होते का?

वर्षा आता ती झोपली असेल. तिच्या वतीने सध्या मीच माहिती पुरवते Happy

किती वेळ ( अंदाजे टोटल ) लागला? = १ फेब्रुवारीला मी शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर तिने विणायला सुरुवात केली आणि आज पूर्णही Happy त्यात लोकर संपली म्हणुन काही दिवस वाया गेले. त्यामुळे फार तर १८-२० दिवसात पूर्ण केला तिने.
तुला आधी क्रोशाचे / लोकरीचे काही येत होते का? = " आपल्याला विणकाम आणि भरतकामाचा किती अनुभव आहे याची माहिती: १० वर्षापूर्वी(लग्नापूर्वी)मैत्रिणीच्या आईच्या शिकवण्यासाठी मागे लागून लागून लोकरीचे २-३ ताटावरचे रुमाल आणी १-२ तोरणे केली होती,पण आता विसरले आहे सगळे :)"

अवल, खुपच सुंदर झाला आहे फ्रॉक. तुझ्या शिष्येचाही मस्त झाला आहे. तु एक चांगली टिचर आहेस हे दिसुन येते.
क्रोशाचे घर तर खुप सुंदर दिसते.

Pages