Submitted by -शाम on 31 January, 2013 - 08:13
हात जोडूनी नभाला घालतो मी साकडे
चंद्र दे आणून माझा खिन्न माझे झोपडे ||
अंगणी येऊन माझ्या मेघ कोणी थांबतो
ओळखीचा ना तरीही जीव हा भांबावतो
पापण्यांच्या उंबर्याशी आठवांची सर झडे ||
धीर देतो रोज वारा भोवती रेंगाळुनी
शब्द काही सांत्वनाचे बोलुनी जाते कुणी
कोण बघतो झाकलेल्या काळजावरचे तडे ||
का उगा लावू दिव्याची झुंज अंधारासवे
तेज माझ्या संचिताचे तेवढे मजला हवे
हे अभासी चांदण्याचे काय कामाचे सडे ||
..................................................शाम
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आह.... सिंपली ऑसम.. हिअर यू
आह....
सिंपली ऑसम.. हिअर यू आर शाम...!!
अतिप्रचंड आवडली... पहिल्या दोन ओळींतच वातावरणनिर्मिती केलीस.. ती कविताभर व्यापून राहिली.. जियो दोस्त!!
खूप तरल कविता शाम. फक्त
खूप तरल कविता शाम.
फक्त शेवटची ओळ थोडी confusing वाटली. ( sorry स्पष्ट सांगितल्याबद्दल )
मस्तच रे तुझ्या परवाणगी
मस्तच रे
तुझ्या परवाणगी शिवाय केलेय.. माफ करशीलच
http://www.maayboli.com/node/40673
छान लिहिलंय शाम......
छान लिहिलंय शाम...... मस्तच.
---------------------------------------------------------------------------------
कवितेतला चंद्र सुख/जीवनावश्यक गोष्टी/पाऊस इ.इ. चं प्रतीक वाटला.
मी भाकरीचा चंद्र अशी कल्पना करूनही वाचून पाहिली १-२ वेळा.
मस्त वाटली.
"देवूस उसणे" इथे "देऊस उसने" असं असायला हवं का ? वैम. कृगैन.
वाह! लयीत असलेली सुरेख
वाह! लयीत असलेली सुरेख रचना..
चांदण्यांचे खडे>> हे नाही समजले..?
वाह! क्या बात है!!
वाह! क्या बात है!!
तरल प्रेमकाव्य. आवडलीच!
तरल प्रेमकाव्य.
आवडलीच!
खुप सुन्दर.......
खुप सुन्दर.......
धन्यवाद दोस्तांनो! आपल्या
धन्यवाद दोस्तांनो!
आपल्या सुचनांचा आदर करीत थोडा बदल केला आहे.... धन्यवाद!
वाह ! अप्रतिम काव्य ! प्रिय
वाह ! अप्रतिम काव्य !
प्रिय व्यक्तिच्या वियोगातून अवतरलेलं हे विरह(शोक)गीत हृदयस्पर्शीच !
शब्दाशब्दांतून व्यक्त होणारी आर्तता व्याकूळ बनवते वाचकालाही .
चांदण्याचे खडे
हे
चांदण्यांचे म्हणजे इतर खगोलांचे (चंद्रप्रभेचे नव्हे) खडे या शब्दशः अर्थाने वापरले असावे . माझा चंद्र (प्रेयसी) सोडून तू देऊ केलेली इतर कोणतीही प्रलोभनं मला नकोत, असा व्यंगार्थ आहे असं मला वाटतं .
अप्रतिम!!
अप्रतिम!!
कविता आवडली.
कविता आवडली.
वा शेवटच्या ओळी आवडल्या
वा
शेवटच्या ओळी आवडल्या
गीत आवडले.
गीत आवडले.
आवडली आणि वेगळेपणही जाणवलं
आवडली आणि वेगळेपणही जाणवलं
क्या बात है..... जियो, जियो
क्या बात है.....
जियो, जियो .....दोस्त .....
प्रचंड सुंदर ! यात 'चंद्र'
प्रचंड सुंदर ! यात 'चंद्र' असल्यामुळे हिला 'गुलजार' कविता म्हणावयास हरकत नसावी.
सहीच......
सहीच......
वा ! सुरेख!
वा ! सुरेख!
वाह! जियो बागेश्री
वाह!
जियो
बागेश्री +१
माझ्याकडे तर तुझ्या कवितांचं कौतुक करायला पण शब्द नाहीयेत
का उगा लावू दिव्याची झुंज
का उगा लावू दिव्याची झुंज अंधारासवे
तेज माझ्या संचिताचे तेवढे मजला हवे
हे अभासी चांदण्याचे काय कामाचे सडे ||<<<
उत्कृष्ट
खुप खुप सुंदर! फार तरल!
खुप खुप सुंदर! फार तरल! शब्दांच्या पलिकडले...
कोण बघतो झाकलेल्या काळजावरचे
कोण बघतो झाकलेल्या काळजावरचे तडे || >>>> वाह!!! अप्रतिम!
चांदण्याचे खडे अधिक सुंदर
चांदण्याचे खडे अधिक सुंदर होते शाम, अर्थात संपूर्णपणे वैम... आकाश, चंद्र, चांदण्या- आणि चांदण्याचे खडे थेट जात होतं!
हा बदलही छानच आहे. इथे थाडकन वास्तव येतयं... आधीच्या समारोपामुळे काव्य तरल स्वप्नवत वाटत राहिलं होतं!
फक्त एक ओळ- पण किती कमाल करू शकते ना
अप्रतिम.. केवळ अप्रतिम, शाम.
अप्रतिम.. केवळ अप्रतिम, शाम.
अप्रतिम सुंदर!
अप्रतिम सुंदर!
अप्रतिम !
अप्रतिम !
व्वा! फ़ार सुंदर!
व्वा! फ़ार सुंदर!
अंगणी येऊन माझ्या मेघ कोणी
अंगणी येऊन माझ्या मेघ कोणी थांबतो
ओळखीचा ना तरीही जीव हा भांबावतो
पापण्यांच्या उंबर्याशी आठवांची सर झडे ||
व्वा..!
आर्तसुंदर शब्द.
आर्तसुंदर शब्द.
Pages