Submitted by UlhasBhide on 30 January, 2013 - 03:34
वेदना
एक होता काळ जेव्हा वेदना कुरवाळली
चोचले मी पुरवले अन् वेदना सोकावली
मुक्त करण्या वेदनेला सजवले काव्यातुनी
मुक्त ना आसक्त झाली मन्मनाला ग्रासुनी
वेदना-मुक्ती कधीही शक्य नाही ताडले
जू तिच्या मानेवरी मी जीवनाचे लादले
इष्ट आपत्तीप्रमाणे वेदनेला मानले
की म्हणू मी वेदनेला दावणीला बांधले
आज माझ्या वेदनेला मीच देतो वेदना
मी तिला बधतोच ना अन् ती मला बाधेच ना
.... उल्हास भिडे (३०-१-२०१३)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह ! विचार करण्यासारखा आशय
वाह ! विचार करण्यासारखा आशय आहे.
वेदना-मुक्ती कधीही शक्य नाही
वेदना-मुक्ती कधीही शक्य नाही ताडले
जू तिच्या मानेवरी मी जीवनाचे लादले<<<
आवडली द्विपदी
ठिकठाक वाटली.
ठिकठाक वाटली.
आज माझ्या वेदनेला मीच देतो
आज माझ्या वेदनेला मीच देतो वेदना
मी तिला बधतोच ना अन् ती मला बाधेच ना
>>> सह्ही ये !!
जू ही द्विपदी उत्तम आहे.
जू ही द्विपदी उत्तम आहे.
वा काका, जोरदार पुनरागमन
वा काका, जोरदार पुनरागमन .....
सुंदरच आहे ही रचना ..
जोरदार पुनरागमन ..... >>
जोरदार पुनरागमन .....
>> अगदीच सहमत!!
काका, वेदनेचा शेवट दमदार केलात!!
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
आवडली बागेश्री +१
आवडली
बागेश्री +१
आज माझ्या वेदनेला मीच देतो
आज माझ्या वेदनेला मीच देतो वेदना
मी तिला बधतोच ना अन् ती मला बाधेच ना
>>>> अप्रतिम
UlhasBhide, रचना आशयघन आहे.
UlhasBhide,
रचना आशयघन आहे. 'वेदना'च्या जागी 'जाणीव' ठेवून परत वाचली. वेगळीच मिती उघडल्यासारखं वाटलं.
आ.न.,
-गा.पै.
छान, एक छान कल्पना सहज समोर
छान, एक छान कल्पना सहज समोर येते, मस्त!
अप्रतिम आशयघन काव्य! फार
अप्रतिम आशयघन काव्य! फार आवडलं.
आवडली
आवडली
वा ! मस्त !
वा ! मस्त !
छान!
छान!
आवडली !
आवडली !
वेदना-मुक्ती कधीही शक्य नाही
वेदना-मुक्ती कधीही शक्य नाही ताडले
जू तिच्या मानेवरी मी जीवनाचे लादले
शेर आवडला.
आज माझ्या वेदनेला मीच देतो
आज माझ्या वेदनेला मीच देतो वेदना
मी तिला बधतोच ना अन् ती मला बाधेच ना
जू छान आहे
मी तिला बधतोच ना अन् ती मला
मी तिला बधतोच ना अन् ती मला बाधेच ना
>>
वाह! वाह!
छान कविता.......
छान कविता.......
आवडली कविता. पण तितकी प्रभावी
आवडली कविता.
पण तितकी प्रभावी वाटली नाही.
आवडली....फार छान
आवडली....फार छान
आवडेश
आवडेश
छान आहे. आशय आवडला
छान आहे. आशय आवडला
छानच आहे कविता आज ...इतक्या
छानच आहे कविता
आज ...इतक्या उशीराने वाचली त्यामुळे प्रतिसादास विलंब झाला क्षमस्व
एक होता काळ जेव्हा वेदना
एक होता काळ जेव्हा वेदना कुरवाळली
चोचले मी पुरवले अन् वेदना सोकावली>>वा !!माझा एक शेर आठवला उकाका..............
मी कडेवर घेतल्यावर कारटी सोकावते
विठ्ठलाच्या कंबरेचा हट्ट धरते काळजी
पुनःप्रत्ययाबद्दल धन्स काका
छान.
छान.
छानच..
छानच..