इंदूरच्या छत्र्या. ( वेगळे शिल्प )

Submitted by दिनेश. on 30 January, 2013 - 03:25

इंदूरला ऑफिसच्या कामासाठी गेल्याने फारसे काही बघता आले नाही, पण भर गावात असलेल्या या छत्र्या
बघून राहवले नाही. छत्री याचा अर्थ आपण घेतो तो नसावा. तशी ही देवालयेच वाटतात. तिथल्या सावरकर
मंडईच्या समोरच आहेत या दोन छत्र्या.

दोन्ही छत्र्यातली गर्भगृहे बंद होती. पण त्यापैकी एक शिवालय असेल असे वाटते. नेहमीचा राबताही नव्हता,
कि पूजेचे सामान विकणारी दुकाने नव्हती. पण स्वच्छता मात्र होती. मी गेलो होतो त्यावेळी, चक्क पाण्याने
धुलाई चालली होती. ( तिथे जाण्यापूर्वी नेटवर शोधले होते त्यावेळी या दिसल्या नव्हत्या. पण इथे कुणीतरी
सांगेलच.)

हे बांधकाम फार जूने नसावे. पण खुप सुंदर आहे एवढे नक्की. मूर्तींच्या चेहर्‍यावरचे भाव नेमके आहेत.
आणि त्या सुबकही आहेत. बिर्ला टेम्पलमधे असतात तसे ठोकळे नाहीत. त्या मूर्तींवर खास इंदूरी ठसादेखील आहे. ( प्रल्हादाच्या आईचे नेसू, पदर आणि नथ बघा.)

बांधकामात गरम हवा बाहेर जाण्यासाठी ऊंचावर झरोखे दिसले. ते मी ईतर कुठे बघितले नव्हते. गोलाकार
कमानी आणि सज्जे पण खासच. पण सगळ्यात अनोखे होते ते अनेकरंगी दगडांचे बांधकाम.

मी स्वतः प्रत्यक्ष फारच कमी प्राचीन देवालये बघितली आहेत, पण आपल्या मार्को पोलोच्या कृपेने भारतभरातली जी देवालये बघता आली, त्यात कुठे असा अनेकरंगी दगडांचा वापर दिसला नाही.

या ज्या छत्र्या आहेत त्या भर रस्त्यात, भर बाजारात आहेत. आजूबाजूला मोकळी जागा नाही, त्यामूळे फार
लांबून फोटो घेता आलेच नाहीत.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा छत्री म्हणजे स्मृतीमंदिर. उदा: पुण्यात असलेली महादजी शिंदेंची छत्री

दिनेश,
खूप मोठा अपेक्षाभंग.. Sad
धाग्याचं शिर्षक वाचून मला वाटलं इंदोर ला चांगल्या रंगिबेरंगी छत्र्या मिळत असतील. त्याचे फोटो काढले असतील तुम्ही. मग म्हणलं पावसाळा तर दूर आहे. मग डोक्यात आलं उन्हासाठी विकत असतील.. कैच्याकैच... Sad
माफच करा या प्रतिसादासाठी..

वा, सुंदर प्र चि...
सर्व बांधकाम, कोरीव काम सुंदरच...
पण.....
.....त्या नरसिंहाच्या चेहर्‍यावरचे भाव फारच केविलवाणे आहेत Sad Sad .... अगदीच विसंगत .....

धाग्याचं शिर्षक वाचून मला वाटलं इंदोर ला चांगल्या रंगिबेरंगी छत्र्या मिळत असतील. >>>>> हा हा हा हा ...

दक्षे, नाव बदललं, आता.

शशांक, तो काय क्रूर होता का ? कर्तव्य भावनेने, सगळ्या शर्ती पाळून डिसेक्शन केल्यासारखे भाव आहेत का नाही ? शिवाय दोन्ही हातांनी आशिर्वादही द्यायचा आहे. कनफ्यूजन झालेले दिसतेय त्याचे Happy

सुंदरच. दिनेश मी इंदूरमध्ये राहिलो होतो दोन दिवस, पण ह्या छत्र्या पाहता आल्या नाहीत....दोनपैकी एक दिवस अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा महाल आणि तुकोजीरावांचा 'लालबाग पॅलेस' पाहाण्यातच गेला तर दुसरा दिवस बाजार आणि भटकंतीत.....

मला वाटते 'गाईड' महाशयांवरही बरेचसे अवलंबून असणार की तोच पठ्ठ्या ठरवितो आपल्याला कुठे कुठे घेऊन जायचे ते. त्याला ह्या छत्र्या माहीत असत्या तरी त्याने आम्हाला तिकडे नेलेच असते असे काही वाटत नाही.

पण असो. तुम्ही दिलेल्या वरील सुंदर प्रचित्रावरून आता असे मी जरूर म्हणू शकतो की आम्ही नक्कीच एका चांगल्या स्थळाची भेट चुकविली. फोटोवरून जाणवतेच की मंदिराची जडणघडण आजही जशीच्यातशी आहे, ही बाब समाधानकारक आहेच. खांबांवरील कोरीव काम विलक्षण सुंदर दिसत आहे.

"छत्री" नामक बांधकामे {मला वाटते वा दिसल्याप्रमाणे} राजस्थान, राजपुताना भागात फार प्रचलित होती....आजही असावीत. राजपूत घराण्यातील कित्येक राजेरजवाड्यांच्या मृत्युनंतर राजवाड्याच्या आवारात उभे केलेल्या स्मृतिमंदिराच्या बांधकामाला तिथे 'छत्री' असेच संबोधन असून त्या त्या घराण्यातर्फे त्यांची नित्यनेमाने देखभाल केली जाते.

अशोक पाटील

हो अशोक, या पानावर पण अगदीच त्रोटक माहिती आहे. पण निदान १००-१५० वर्षांपूर्वी बांधलेल्या दिसताहेत.

http://www.indorecity.net/tourist-attractions/chhatris.html

The Maratha Rulers were skilled in the field of architecture. An exquisite example of their architectural style comprise of the Chattris of Indore. These chhattris are the cenotaphs built in the memory of the Holkar rulers. The memorials are built in stone and have stood the test of time. They stand elegantly on the banks of the Khan River. The cenotaphs are tombs built on the cremation spot of the Holka rulers near Rajwada. The Chhatris have dome type structure with pyramidal spires on top.

According to historical records, the Holkars ruled over a large area of the state of Madhya Pradesh. They were great rulers and enjoyed support of their people. During the year 1858, British dominated the country and India came under the rule of the Queen. The Holkars were defeated by the British in the war and had to submit their kingdom in their hands. As their capital was also lost, they shifted to Indore. The city derives its name from the famous temples named Indreshwar and Indrapur.

As a result, they erected these Chhatris, a constant reminder of their rule and their glory. Facing west, there is the cenotaph built over the ashes of a woman ruler of Malwa, Maharani Krishnabai. There are two other Chhatris dedicated to Tukoji Rao II and Shivaji Rao, father and son respectively. These cenotaphs are linked by a common prayer hall, which has delicately carved arches and pillars. It also contains life size statues of these rulers on a high platform along the garbha grihas.

There is a place called Chhatri Baag here, which has two compounds. There is also a beautiful Chhatri in the memory of Bolia Sahib. It was constructed after his death near this Chhatri Baag. At night, these Chhatris provide a breathtaking sight, as they get illuminated. The Chhatris glow ethereally against the dark of the sky and pay tribute to the great souls of the Holkar rulers. An artificial lake has been created in this stretch of the otherwise dry Khan River. It has been further beautified with a fountain, well laid gardens on both banks and boating facility.

राजवाड्याजवळ पार्किंग नव्हते म्हणून या परीसरात गाडी पार्क केली होती. तिथे गेलो, म्हणूनच दिसल्या.

दिनेशदा
ह्या छत्र्या परदेशि लोकाना आराम करण्या करता देवि अहिल्याबाई होळकर आणि यशवन्तराव होळकर यानि बाधल्या आहेत, जवळुन जो नाला वाहताना दिसतो ति पुर्वि खान नदि होति, देवि अहिल्याबाई होळकर ह्या शिवभक्त होत्या म्हणुन तेथे शिवालय आहे.
इथे खुप वेळा रात्रि गाण्याच्या मैफिलि होतात, थोड्या जवळच बोलिया छत्रि पण आहे ति पण छान आहे.
ईन्दुर मधे एक छत्रिपुरा नावाचा एरिया आहे तिथे अजुन खुप छत्रि आहेत.

त.टि-दिनेशदा तुमच्या साऱख्यानि नविन शहरात जाताना मायबोलि वर लिहायला हवे म्हणजे आमच्या सारख्याना तुम्हाला भेटता आले असते,आणि रात्रि सराफा मध्ये खादाडि केलि का?

धन्यवाद समिर, कुणीतरी स्थानिक व्यक्ती लिहीलच अशी अपेक्षा होतीच.
बाकी सूचना अगदी मान्य. यावेळेस पुरता २४ तासही नव्हतो. त्यात ऑफिस मिटींग आणि मुलाखती होत्या. रात्री बाहेर पडताच आले नाही. पुढच्या वेळेस आलो तर नक्की भेटू.

दिनेशदा फक्त तुम्हिच नाहि तर सर्वा करिता हे मि लिहले आहे, नक्कि वेळ काढुन या जवळच महेश्वर,माण्डवगड आहे,एका बाजुनि उज्जैन तर दुसरया बाजुला ओन्कारेश्वर आहे

दिनेशजी पुढच्या वेळी इंदौरला भेट द्याल तेव्हा तिथले अन्नपुर्णा मंदीर जरुर बघा, छान आहे. अर्थात, मला बाकी इंदौर बघता आले नाही याचेच वाईट वाटते. पण फोटो छान आहेत.

दिनेशजी आणी वरदा माहितीबद्दल धन्यवाद. महादजींच्या छत्रीबद्दल नुसतेच ऐकले होते. आज दिनेशजींच्या फोटोंमुळे ते कळले.

समिर....

मांडवगड म्हणजेच 'मांडू' ना ? मग मी इथे गेलो आहे. माझी आठवण बरोबर असेल तर आम्ही ओंकारेश्वरमार्गे इंदूरला जात असतानाच धाबा टाईप एका हॉटेलमध्ये समजले की तिथून जवळच मांडू या ऐतिहासिक शहराला भेट देता येते. राणी रुपमती व बाज बहादूर यांच्या प्रेमाची साक्ष असलेले हे ठिकाण आहे हे माहीत होतेच. त्यामुळे ती संधी आम्ही सोडली नाही. "जहाज महाल' ही पाहायला मिळाला. बांधकामशास्त्राचा हा एक उत्कृष्ट नमुना असून तिथे आल्यावर जणू काही जहाजातच आपण उभे असल्याचा भास होतो. सुंदर स्थळ पर्यटकांसाठी.

@ दिनेश....

तुम्ही दिलेल्या लिंकमधील "These chhattris are the cenotaphs built in the memory of the Holkar rulers. ..." हे वाक्यदेखील 'स्मृतिमंदिर' संकल्पनेची पुष्ठी करतेच.

अशोक पाटील

हो समिर,
खरं तर कुठेही जाताना तिथे कुणी मायबोलीकर आहेत का, असे विचारायला हवे सगळ्यांनीच. परक्या ठिकाणी आपले माणूस भेटण्यासारखा आनंद नाही. तूम्हाला भेटलो असतो तर कदाचित उपलब्ध वेळातही बरेच काही बघता आले असते.

जिप्स्या, यो तूम्ही नाही गेलात अजून ? सपाट जमिनीवर पण फिरा रे कधीतरी Happy

प्रत्यक्ष राणी रुपमति कशी गात असे माहित नाही, पण मांडूला गेलोच तर मला लता रफीचे चे, झन नन झन बाजे, लताचे, आजा भँवर, मन्ना डे चे, ऊड जा भँवर, रफी आणि चो़णकर साहेबांचे, बाट चलत .. आपोआप ऐकू येतील.

दिनेशजी नेट वर अवलंबुन रहाण्यापेक्षा जी माबो मंडळी ( आता वर समीर डिके आहेत तसेच) वेगवेगळ्या प्रांतात आहेत, त्यांच्याशीच संपर्क साधुन त्या प्रांतातली माहिती मिळवा. मला प्रवासाची खूप आवड असुनही जास्त फिरता आले नाही.

मात्र सा. सकाळ, लोकप्रभा हे प्रवासी विशेषांक मी जपुन ठेवलेत, न जाणो कधी प्रवास करता आला तर उपयोगी पडेलच. पण तुम्ही, जिप्सी, मार्को, यो रॉक्स आणी रोहीत मावळा सारखे गड्प्रेमी यांच्या कडुनही बरीच माहिती मिळते, त्यामुळे प्रत्येक वेळी उत्साह दुणावतो.

फोटो सुरेख आलेत.
इंदूर फिरायला आलेल्या लोकांनी काय पहावं याच्या उत्तराच्या यादीत इंदूरकर 'छत्र्या' घालायला विसरतात Sad शांतपणे जाऊन बसण्यासारखी छान जागा आहे ही. प्रत्यक्षात जितक्या छान वाटल्या नाहीत, तितक्या या फोटोंत छान वाटल्या म्हणजे मी तिथे नीट फिरलो नाही किंवा अनेकदा गेल्याने गंमत निघून गेली.

देवाच्या मूर्ती दिसल्या तरी पूजा-अर्चना होताना कधी दिसली नाही.

Pages