इंदूरच्या छत्र्या. ( वेगळे शिल्प )

Submitted by दिनेश. on 30 January, 2013 - 03:25

इंदूरला ऑफिसच्या कामासाठी गेल्याने फारसे काही बघता आले नाही, पण भर गावात असलेल्या या छत्र्या
बघून राहवले नाही. छत्री याचा अर्थ आपण घेतो तो नसावा. तशी ही देवालयेच वाटतात. तिथल्या सावरकर
मंडईच्या समोरच आहेत या दोन छत्र्या.

दोन्ही छत्र्यातली गर्भगृहे बंद होती. पण त्यापैकी एक शिवालय असेल असे वाटते. नेहमीचा राबताही नव्हता,
कि पूजेचे सामान विकणारी दुकाने नव्हती. पण स्वच्छता मात्र होती. मी गेलो होतो त्यावेळी, चक्क पाण्याने
धुलाई चालली होती. ( तिथे जाण्यापूर्वी नेटवर शोधले होते त्यावेळी या दिसल्या नव्हत्या. पण इथे कुणीतरी
सांगेलच.)

हे बांधकाम फार जूने नसावे. पण खुप सुंदर आहे एवढे नक्की. मूर्तींच्या चेहर्‍यावरचे भाव नेमके आहेत.
आणि त्या सुबकही आहेत. बिर्ला टेम्पलमधे असतात तसे ठोकळे नाहीत. त्या मूर्तींवर खास इंदूरी ठसादेखील आहे. ( प्रल्हादाच्या आईचे नेसू, पदर आणि नथ बघा.)

बांधकामात गरम हवा बाहेर जाण्यासाठी ऊंचावर झरोखे दिसले. ते मी ईतर कुठे बघितले नव्हते. गोलाकार
कमानी आणि सज्जे पण खासच. पण सगळ्यात अनोखे होते ते अनेकरंगी दगडांचे बांधकाम.

मी स्वतः प्रत्यक्ष फारच कमी प्राचीन देवालये बघितली आहेत, पण आपल्या मार्को पोलोच्या कृपेने भारतभरातली जी देवालये बघता आली, त्यात कुठे असा अनेकरंगी दगडांचा वापर दिसला नाही.

या ज्या छत्र्या आहेत त्या भर रस्त्यात, भर बाजारात आहेत. आजूबाजूला मोकळी जागा नाही, त्यामूळे फार
लांबून फोटो घेता आलेच नाहीत.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोक,
अगदि बरोबर साधरण पणे सर्व जण ओंकारेश्वर आणि महेश्वर एकाच दिवसात करतात आणि माण्डव एक दिवसात करतात.
सध्या काहि वर्षा पासुन महेश्वर ला खुप फिल्म शूटिन्ग होतात(अशोका फिल्म नंतर), आणि माण्डव तर थेट किनारा पासुन ते सध्या सन्नि देओल च्या यमला पगला २ आणि सिह साहब द ग्रेट चे शूटिन्ग इन्दुर,महेश्वर,माण्डव ला होत आहेत
वेळ मिळाल्या वर मागच्याच महिन्यात काढ्लेले महेश्वर,माण्डव चे प्रचि अपलोड करायचा प्रयत्न करतो

रुणुझुणू, ते शंकर, पार्वती आणि गणेश आहेत. अर्थात झाडही छानच आहे.

हो भरत, खुप शांत वाटतं तिथे. पुर्वी पण पांथस्तांच्या विश्रामासाठीच वापर होत असावा.

समिर, वाट बघतोय फोटोंची. तूमच्या इंदूरला परत यावेसे वाटतेय एवढे नक्की !

दिनेशदा,

छत्री म्हणजे स्मृतीस्थळ. तुम्ही दाखवलेल्या इंदुरातल्या छत्र्या अतिशय भव्य आहेत. त्यांना पाहून हे केवळ स्मृतीमंदिर आहे की त्याहून अधिक काही आहे असा प्रश्न पडतो.

छत्रीवरून आठवलं की आमच्या इथे ब्रायटनमधल्या पॅचम गावाजवळ एक छोटुकली छत्री आहे. तिच्या खाली 'पहिल्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या हिंदु व शीख योद्ध्यांच्या स्मरणार्थ हे बांधकाम आहे' असा स्पष्ट उल्लेख आहे.

आ.न.,
-गा.पै.

मांडवगढ.. माझ्या कॅमेर्‍यातून..

हिंडोला महल

गोरखचिंच

अशरफी महल

या झाडाचा इतिहास समीर डिके सांगू शकेल नीट

सुंदर.

हां दिनेशदा, तुम्ही सांगितल्यावर पुन्हा बघितलं. आधी फक्त झाडच डोळ्यात भरलं होतं.

इंदोर ला या आणी इतर छत्र्या पाहायला गेले असता एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली..

बॉलीवुड अ‍ॅक्टर ' विजयेंद्र घाटगे' ची आई म्हंणजे ,' राजकुमारी सीता राजे घाटगे' ही , इंदोर स्टेट चे शेवटचे राज्यकर्ता यशवंतराव होळकर यांची पुत्री.
होळकर फॅमिलीच्या पर्सनल छत्र्या ही पाहिल्या त्या मात्र वरच्या दिनेश दा ने टाकलेल्या फोटोंपैकी नाहीत. ही प्रायवेट प्रॉपर्टी असून इथे फोटो काढण्याला मनाई होती.

वर्षू नील...

"मांडू" च्या फोटोबद्दल विशेष आभार. मी [म्हणजे मित्रांसोबत सहलीत असताना] पाहिली आहेत ही सारी स्थळे....विशेषतः प्रचि क्रमांक १ लक्षात राहाण्याचे आणखीन् एक कारण म्हणजे नेमक्या त्याच ठिकाणी हेमा मालिनी आणि जीतेन्द्र या जोडीवर 'किनारा' मधील एक गाणे चित्रित झाले होते. [आमच्या गाईड महाशयांनी अगदी आपुलकीने जपलेले शूटिंग फोटोचे आल्बम्स आम्हाला दाखविले....तो वाघ्या स्वतःही हेमा मालिनीसमवेत दोन फोटोत होता].

'किनारा' चे [काही] कथानकही राणी रुपमती आणि बाजबहादूर यांच्या प्रेमाची कथा व्यक्त करणारे होते.

अशोक पाटील

सध्या छत्र्यांची परिस्थिती चांगली दिसते आहे.. आम्ही ४ वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा बर्‍यापैकी अस्वच्छता होती...

आणि ह्या छत्र्या होळकरवाड्याच्या समोरच आहेत ना.. का दुसरीकडे कुठे आहेत?

आता कुणीही जाल तिथे तेव्हा अवश्य भेट द्या. तिथे फारशी वर्दळ नसते. त्यामूळे निवांत बघता येते.

वर्षू, मांडवगड / ओंकारेश्वर / जबलपूर सगळे राहिलेच.

हिमस्कूल, होळकर वाड्याजवळच आहेत, पण अगदी समोर नाहीत. होळकर वाड्यात दुरुस्ती चालू होती आणि केवळ एकच दालन बघता येत होते.

मध्यंतरी दिवाळीच्या सुमारास उज्जैनला जाणे झाले पण इंदूर, ओंकारेश्वर राहिले आहे अजुनही. Sad
पु.लं.च्या भाषेत,
मुंबईकर पुण्यात आला आणि विचारू लागला की येथे पहाण्यासारखे काय काय आहे ?
लोक सांगतील, पर्वती, शनिवारवाडा, लाल महाल, शिंदे छत्री, इ.
तर तो म्हणेल आज छत्री पहायला सांगताय उद्या रेनकोट सांगाल Happy

सुंदर Happy

Pages