मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी ब्रेकफास्ट गटग

Submitted by चिनूक्स on 18 January, 2013 - 03:42
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, पुणे

मायबोलीचे वेबमास्तर श्री. अजय गल्लेवाले येते दोन दिवस पुण्यात आहेत.
दिल्लीच्या परिषदेचे अनुभव त्यांच्याकडून ऐकण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी रविवारी, दि. २० जानेवारी, २०१३ रोजी ब्रेकफास्ट गटग आयोजित करण्यात आलं आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती. Happy

माहितीचा स्रोत: 
वेबमास्तर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, January 19, 2013 - 22:00 to रविवार, January 20, 2013 - 00:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह धन्यवाद माहितीबद्दल, पण माझ्या सदस्यत्वामधे पाहिले तर आधीच आशिया-दिल्ली असे निवडलेले आहे.
आणि तरीही मला या धाग्यावर जे दिसत आहे ते खालील प्रमाणे

तारीख/वेळ:
20 January, 2013 - 12:00 - 14:00
ठिकाण/पत्ता:
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, पुणे

माझ्या सदस्यत्वामधे पाहिले तर आधीच आशिया-दिल्ली असे निवडलेले आहे.
>>>
हा कुठला नवा ऑप्शन आहे? Uhoh आशिया-कोलकाता असायला हवे! मी आताच प्रोफाईलच्या संपादन मोड मध्ये जाऊन पाहिले. Acia-Dili असा एक ऑप्शन पाहिला. महेश, तुम्ही हा ऑप्शन सेट केला आहात का? तसे असेल तर बदलून acia-kolkata करा.

ते भारतातलं दिल्ली नसून दिली आहे en.wikipedia.org/wiki/Dili

भारतातील मायबोलीकरांनी वर दिलेल्या दुव्यात दिलेले पर्याय निवडावे.

महेश,
तुम्ही इस्ट तिमोर देशातील दिली हे शहर निवडले आहे. ते बदलून कोलकाता करा, म्हणजे भारतातल्या वेळा दिसतील.

माझी हजेरी हुकणार, मी तेव्हा कागलच्या उजवीकडे कुठेतरी आऽड बाजुला असेन Sad
असो. मजा करा, माहिती घ्या अन इथे डकवा. फोटू काढा (जमल्यास इथे डकवा)

आता दर्शवित आहे ब्रेकफास्ट गटगची वेळ Happy

तारीख/वेळ:
20 January, 2013 - 08:30 - 10:30
ठिकाण/पत्ता:
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, पुणे

ह्या भारतवारीत मायबोलीकरांना भेटणं होणार नाही, असं वाटत असतांनाच ह्या कार्यक्रमाची बातमी वाचायला मिळाली. मी येण्याचा नक्की प्रयत्न करणार... गेले दोन दिवस पुण्यात आहे आणि अजून ४ दिवस भारतात असणार आहे.

मला जायला उशीर झाला व वेबमास्तर तेव्हढ्या वेळात येऊन गेले हे कळल्याने फार चुकचुकल्यासारखे झाले. थोडक्यातच चुकामुक झाली.. बाकी सर्वांना भेटून , गप्पा मारून मजा आली!

कोडॅक मोमेंट ऑफ द गटग : २ मसाला चाय सांगितल्यावर वेटरने सिन्सिअर्ली वगैरे २ मसाला डोसा आणून दिले. Rofl

पहिल्या फोटोत मयुरेश, चिन्मय, महेश, साजिरा (लपलेले), सानी आणि सानीची आई (डावीकडील रांग)

Webmaster GTG 1  b.jpg

दुसर्‍या फोटोत वेबमास्टर आणि मी (बेफिकीर)

Webmaster GTG 2 c.jpg

चित्रे देणे अपेक्षित नसल्यास काही काळाने काढून टाकेन. एका आय डी चे चुकून नाव लक्षात राहिले नाही, क्षमस्व!

बेफि,

Rofl

तसेच, दुसर्‍या फोटोत बसलेल्यांमध्ये आशूडी आणि परागच्या पलीकडे आहेत ते सानीचे वडील आहेत.

त्यामुळे बेफिकीर, सानी, साजिरा व चिनूक्स हे प्रशासनातील दोघे व खुद्द संकेतस्थळाचे संस्थापक हे सर्वजण एकमेकांना भरदिवसाउजेडी इतर अनेकांच्या साक्षीने भेटलेले आहेत Proud

धन्यवाद बेफिकीर.
तुम्हा सगळ्यांबद्दल मी जास्त वेळ काढू शकलो नाही याबद्दल सॉरी. मला खूप वाईट वाटतंय. सहसा आलेल्या सगळ्याच मायबोलीकरांना भेटायला मी उत्सुक असतो आणि त्यासाठी अगदी शेवटपर्यंत नेहमीच थांबतो. पण यावेळेस पुण्यात इतका कमी वेळ होतो त्यामुळे नाईलाज झाला.