इतकंच लागतं जेवायला (विडंबन)

Submitted by निंबुडा on 18 January, 2013 - 05:13

इतकंच लागतं जेवायला - प्रेरणास्थान हे आहे.

तू म्हणालास,"जपून खा गं!
पोटाची वाट, त्यात भूक दाट"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
मऊ खिचडी आहे ना?
मग कसली भूक आणि कसली वाट
सोबतीने खाऊ की खिचडी आणि चाट *"

तू म्हणालास,
"जपून ग!
जेवण म्हणजे नुसती,
खा-खा आणि उपासमारीची शर्यत आहे"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
लंघन करण्याचं महत्व
म्हणून ना कळत आहे?"

तू म्हणालास,
"आणि मी ओकलो तर?"

मी म्हंटलं,
"मी आहे की"

उपास-तापास, ढेकर, लंघन
कळत नाहीत रे मला

अवघड असूनही
खिचडी आणि चाट खाण्याचं वाण
मनापासून निभावतोय

हेच काय ते
ठावूक आहे मला

आणि विश्वास ठेव,
इतकच लागतं जेवायला
बाकी काहीच नाही

(* : तिकडे तुम्ही लोक खाण्या-पिण्याच्या अतरंगी कॉबिनेशन्स ची चर्चा करणार! मग बिडंबनातही तेच सुचलंय! :फिदी:)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओकलो तर... ईईईईई ...

>>
मग काय! खिचडी आणि चाट हे काँबिनेशन लंघन म्हणून खाल्ल्यावर ओकारी नाहीतर काय होणार दुसरं?? Lol