पुदिना, खोबरे पुलाव

Submitted by चिन्नु on 17 January, 2013 - 02:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या बासमती तांदळाचा फडफडीत शिजवलेला भात,
पुदिनाच्या १० काड्या,
१ चमचा चणा डाळ, १ सुकी लाल मिरची, फोडणीचे जिन्नस व तेल, मीठ
१/२ वाटी नारळाचा चव.
कडीपत्ता, कोथींबीर.
हिरवी मिरची-आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

पुदिन्याची पाने, हिरवी मिरची व नारळाचा चव मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करा.
कढईत फोडणीसाठी तेल घाला. चणा डाळ घाला. जीरे मोहरी तडतडल्यावर त्यात सुकी लाल मिरची घाला. कडीपत्ता, कोथींबीर घाला. परतवून मग त्यात पुदिना खोबरे मिरची पेस्ट घाला. जरा परतून घ्या. भात घाला. मीठ घालून परता व झाकण लावून १ मिनिट शिजवा. पुलाव रेडी!

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. खोबर्‍याची चव आवडणार्‍यांना हा भात नक्की आवडेल. सुके खोबरे घालूनही करता येइल पण ओल्या नारळामुळे येणारा किंचीत गोडवा येणार नाही.
२. पुदिना न घालताही हा पुलाव्/भात करता येइल.
३. कडीपत्ता आणि चणाडाळ जरा जास्तच घालावे.
४. पुदिना आपल्या आवडीनुसार कमी/जास्त घालावा.

माहितीचा स्रोत: 
टीव्हीवरील तेलुगु कुकरी शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!१ सहीच दिसतोय. नक्कीच करुन बघणार
मागे इथे कोणीतरी कोथिंबीरभाताची कृती दिली होती ती पण भन्नाटच होती. खुपदा केली मी ती Happy