पावभाजी

Submitted by बिल्वा on 15 March, 2012 - 12:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. ४-५ मध्यम आकाराचे कांदे
२. १ चमचा आलं पेस्ट
३. २ चमचे लसूण पेस्ट
४. १ मध्यम आकाराचा फ्लॉवरचा गड्डा
४. दीड- दोन कप मटार (फ्रोझन चालतील)
४. ४-५ मध्यम आकाराचे बटाटे
५. ३ हिरव्या ढब्बू मिरच्या ( अमेरिकन साईज)
६. ४-५ टोमॅटो किंवा कॅन्ड प्युरे
६. तिखट, मीठ चवीनुसार
६. पाभा मसाला चवीनुसार. ( बादशाह ब्रँड चांगला आहे. पण तो नसल्यास एव्हरेस्ट चालेल. शक्यतो ह्या दोन पैकीच घ्यावा.)
७. बटर (प्रमाण सांगत नाही) जितकं जास्त घ्याल तितकी चांगली चव मिळवाल Happy

क्रमवार पाककृती: 

१. सर्वप्रथम मटार, फ्लॉवर, ढब्बू मिरच्या धुवून घ्याव्यात. भाज्या फार बारीक नाही चिरल्या तरी चालतील. चिरलेल्या भाज्या कुकरमध्ये उकडून घेणे. अगदी गाळ नाही पण मऊ शिजल्या पाहिजेत.
२. भाज्या शिजल्या की त्यातले पाणी काढून टाकून एका पसरट भांड्यात त्या मॅश करून घेणे.
३. बटाटे उकडून घेणे. ते झाल्यावर भाज्यांमध्ये एकत्रच मॅश करून घालणे. आता ह्या बटाटे+ भाज्या मिश्रणात जेवढा अख्ख्या भाजीसाठी घालणार त्याच्या निम्मा पाभा मसाला घालून झाकून ठेवणे. मसाला मुरला पाहिजे.
४. कॅन्ड प्युरे वापरायची नसल्यास टोमॅटो उकडून ब्लेंडर मधून त्याची प्युरे करून घेणे. गाळून घेणे.
५. आता ज्या भांड्यात भाजी करायची असेल त्यात बटर घालावे. किती? त्याबद्दल वरचा थंबरूल लक्षात ठेवावा Happy तुमच्या कंफर्टलेव्हलप्रमाणे घाला.
६. ह्यात आता बारीक चिरलेले कांदे घालून परतणे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत न कंटाळता परतणे.
७. आलं , लसूण पेस्ट घालून पुन्हा चांगलं परतून घेणे.
८. आता ह्यात टोमॅटो प्युरे घालणे.
९. तिखट , मीठ, पाभा मसाला चवीनुसार घालणे.
१०. बटाटे+ भाजी मिश्रण यात घालून चांगलं एकत्र करून झाकण घालून ठेवणे.
११. भाजी तशी फार घट्ट होत नाही. पण तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर त्याप्रमाणे पाणी घालायचे असल्यास घालणे. भाजी शिजू द्यावी. तश्या भाज्या शिजलेल्या असतात पण सगळे फ्लेवर्स एकत्र व्हावे यासाठी १०-१५ मि. झाकण घालून ठेवावी.
१२. आता पुन्हा थोडे बटर घालून (:)) ५ मिनीटे झाकण घालून ठेवावी.
१३. त्यानंतर गॅस बंद करून भाजी बाजूला काढून ठेवावी. व पाव भाजण्याची तयारी सुरू करावी Happy

गरमागरम पावभाजी, त्यावर बारीक चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि सोबत बटर लावून भाजलेले पाव. बेत तयार Happy

वाढणी/प्रमाण: 
साधारण वरील प्रमाणात ८-१० लोकांसाठी होते. पण किती खाणार यावर खरतर अवलंबून आहे :)
अधिक टिपा: 

*** सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे ही भाजी बटर मध्येच करावी. तेला/ तुपात करू नये. अगदीच बाहेरचे बटर नको असेल तर घरगुती लोण्यात करावी पण शक्यतो बटरच वापरावे. Happy

दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे भाज्या मऊ शिजवून घेणे. बटाटा +भाज्या मॅश करून त्यात पाभा मसाला घालून तो मुरू देणे. याने नक्कीच चवीच छान फरक पडतो Happy

अजून टीपा हव्या असतील तर मायबोलीवरचाच फक्त पावभाजीबद्द्लच्या टीपांचा धागा "चविष्ट पावभाजी कशी जमवावी?" पहायला विसरू नका.

माहितीचा स्रोत: 
मिष्टर :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिल्वा, अग पुन्हा धन्यवाद द्यायला आले मी. माझा मुलगा तर अगदी मिटक्या मारत खातो. पण खास सांगायचे म्हणजे हल्ली त्याच्या शाळेतल्या मित्रांकडून खास फर्माईश येत असते. Happy काल मुले आणि मित्र कंपनीने अगदी चाटुन पुसुन खाल्ली.

मी भाज्या कुकरला शिजवतानाच त्यात भाज्यामध्ये खड्डाकरुन थोडा पाभा मसाला टाकते व कमी फ्लेमवर शिजवते.

मसाला मुरण्याची पद्धत आवड्ली...
मी अजुन एक पद्धत ऐकलीये-
भाज्यांबरोबर थोडीशी मसूर डाळ (केशरी रंगाची) पण शिजवून घ्यायची. आणि भाज्यांबरोबर मिक्स करायची..
म्हणजे मिश्रण एकजीव होतं... आणि गाढं होतं..

मी ट्राय केलंय... चांगलं लागतं.. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात करायची असेल नां तेव्हा तर नक्कीच...

Pages