अडदियु

Submitted by स्वप्ना_तुषार on 14 January, 2013 - 02:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसन ५०० ग्रॅ
उडिदाचे पीठ ५०० ग्रॅ.
पीठी साखर ५०० ग्रॅ.
मेथी पावडर १५० ग्रॅ.
गंठोडा पावडर सुंठ पावडर प्रत्येकी २५ ग्रॅ.
बदाम पावडर ५० ग्रॅ.
सुकं खोबरं एक वाटी किसून
डिंक १०० ग्रॅ.
तूप १ कि.

क्रमवार पाककृती: 

वरील सर्व पीठ आणि खोबरे तूपात वेगवेगळे भाजून घ्यावेत.
डिंक तूपात फुलवून घ्यावा व त्याची पावडर करावी.
नंतर वरील सर्व जिन्नस एकत्र करून त्यात सुंठ पावडर, गंठोडा पावडर, बदाम पावडर मिसळावे. हे मिश्रण मंद आचेवर थोडे गरम करून घ्यावे. नंतर गॅस बंद करून त्यात मेथीची पावडर आणि पीठी साखर मिसळावी.
एका ताटाला तूपाचा हात लावून वरील मिश्रण त्यात पसरावे व त्याच्या वड्या पाडाव्यात.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात ५० -६० वड्या होतात
अधिक टिपा: 

साखरे ऐवजी गूळ वापरायचा असल्यास गूळाचा तूपात पाक करून तो मिश्रणात मिसळावा.
गुजरात मध्ये थंडीच्या दिवसांत विशेष करून मुलांसाठी हा प्रकार बनविला जातो.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"तारक मेहता का....." मध्ये याचं नांव ऐकलं होतं, तेव्हापासुन उत्सुकता होती की काय प्रकार असेल. धन्यवाद स्व_तु

खुप आवडतो हा प्रकार मला, रेसेपी माहीत नव्हती म्हणुन केला नाही कधीच, आता नक्की करेन. Happy
गंठोडा पावडर म्हणजे काय ?

आई बनवते, खास गुज्जु प्रकार आहे हा. आम्ही बेसन नाही टाकत.

गंठोडा पावडर म्हणजे एक प्राकरची फुलाची पावडर असते. मसाल्यासारखे वापरतात.

गंठोडा नावाचे एक आयुर्वेदिक मूळ (अनंत मूळ सारखे) आहे. आयुर्वेदिक दुकानांमध्ये ही पावडर मिळते. गुजरातमध्ये किराणा मालाच्या दुकानात हे सहज मिळते. इथे पुण्यात कुठे मिळते ते नाही माहित. मुंबईत मिळत असावे बहुदा.