चारचौघांचेच गातो गीत मी...

Submitted by हर्षल_चव्हाण on 10 January, 2013 - 08:13

'तरही'ची दिलेली ओळ घेऊन सुचलेली ही रचना. डॉ.काकांच्या सल्ल्याने बोल्ड केलेल्या ओळी बदलून देत आहे.

आज आहे नेमका शुद्धीत मी,
गोठलो होतो जरा थंडीत मी...

बंध नाही मोकळ्या वार्‍यावरी
मोकळा, स्वच्छंद अन् नवनीत मी...

वेगळे अनुभव जगाचे घेतले,
अन् तया बसलो इथे मांडीत मी...

नेक आहे, थोर नाही जाणतो,
चारचौघांचेच गातो गीत मी...

भूतळी ह्या प्रेम होवो सोहळा,
माणसांना जोडणारी प्रीत मी...

खूप लिहिणे टाळतो मोहातही,
योग्य त्याची मागताहे जीत मी...
-------------------------------------------------
हर्षल (१०/१/१३-सायं. ६.३०)
-------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज आहे नेमका शुद्धीत मी,
गोठलो होतो जरा थंडीत मी...

वाहते वारे कुणाच्या मालकीचे,.. ( बंध नाही मोकळ्या वार्‍यावरी)
मोकळा, स्वच्छंद अन् नवनीत मी...

वेगळे अनुभव जगाचे घेतले,
अन् तया बसलो इथे मांडीत मी...

नेक आहे, थोर नाही जाणतो,
चारचौघांचेच गातो गीत मी...

भूतळी ह्या प्रेम होवो सोहळा,
माणसांना जोडणारी प्रीत मी...

खूप लिहिणे टाळतो मोहातही,
मागतो देवाकडे योग्य त्याची जीत मी... ( योग्य त्याची मागताहे जीत मी )
-------------------------------------------------
हर्षल (१०/१/१३-सायं. ६.३०)

क्या बात है!!!!

२ किरकोळ दुरुस्त्या वगळता ही गझलच आहे.

सगळेच शेर चांगले झाले आहेत.अभिनंदन.

निंबुडा, सुप्रिया : प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy
डॉ. काका, तुम्ही दिलेले बदल अगदी अगदी चपखल आहेत Happy
तसेच घेऊन बदलून गझल विभागात टाकली तर चालेल का?

धन्स प्राजू आणि वैभव Happy
विदिपा : भवितव्याचं आता माहीत नाही, ओळी सुचतात, पण व्याकरण सगळ्याच कडव्यांत पाळलं जात नाही, त्यामुळे गझल अजून मिलों दूर आहे Happy प्रतिसादाबद्दल आभार Happy

अहो व्याकरण(तंत्र) ही एक साधीशी गोष्ट आहे(पण महत्वाची). खरी गझल त्याच्या पुढे असते/सापडते.

Lol मन तरूण ठेवा, माझ्या वयाचा विचार करून आणि माबो वर मी त्यांना इतरांनीही काका म्हटलेलं वाचलंय, म्हणून म्हटलो Happy

सगळ्याची सवय व्हावी.. सदिच्छांसह.. स्वागत!

......................................................

कैलासरावांना ज्याचा फोन लागेल त्याने आमचा रामराम सांगा बर्का!

अरे हो, खरंच की! 'नवनीत' म्हणजे लोणीच (लोण्यासारखा मऊ असाही)... पण हा शब्द 'नित्य नवे' या अर्थाने मी वापरलेला पाहीलाय/ किंवा मी तसं समजत होतो... हिंदी मध्ये 'नित नया' असा वापर आहे, त्या अर्थाने वापरला होता... पण संशयास्पद आहे मग ते कडवं... Sad म्हणजे माझी पहिली गझल झालीच नाही ही Sad
वैभव, बेफी : धन्यवाद. काही वेगळं करता येतो का पाहतो.

पहिली गझल झाली नाही असे काहीच नाही. मी इतरत्र बोलत होतो. त्यामुळे गझल वाचायची राहिली. वाचून झाली की तोही प्रतिसाद देतोच. (सहसा मी गझलेवर प्रतिसाद देतोच).

Happy शुभेच्छा

नेक आहे, थोर नाही जाणतो,
चारचौघांचेच गातो गीत मी...

<<<

चांगला शेर आहे.

(माझा एक जुना शेर आठवला)

मी कवी नाही मला माहीत आहे
फालतू मी, फालतू अवडंबरे ही

(सहज आठवला म्हणून दिला) (कृगैन)

माणसांना जोडणारी प्रीत मी...<<< मिसरा मस्त आहे.

खयाल आपोआपच अधिक सुलभ, थेट आणि खोल होतील अशी आशा! धन्यवाद व पु ले शु.

-'बेफिकीर'!

मी कवी नाही मला माहीत आहे
फालतू मी, फालतू अवडंबरे ही>>

आजच पुन्हा एकदा बेफिकीरी वाचत होतो हाही शेर वाचला ४-५ वेळा ;पुन्हा तीच मजा आली ....आता इथेही तीच मजा आली

नवनीत म्हण्जे काय हे माहीत होते पण लोण्याला नवनीत का म्हणतात हे जे मला माहीत होते ते हर्शल याना माहीत आहे का ते पाहिले ते म्हणताय्त ते माझ्याही(नित नवे) माहीतीनुसर बरोबरच आहे

नव नीत चा एक अर्थ ' जे नव्याने जन्म घेते असे ते'/ 'नुकतेच जन्मले आहे असे ते' ...हा ही होत असावा असे वाटते