अंडा करी

Submitted by रसायन on 3 January, 2013 - 22:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ अंडी
ओलं खोबरं (साधारण चिरलेल्या कांद्यास १:१)
२ मोठे कांदे (अमेरिकन)
आलं-लसूण पेस्ट
तेल
जिरं
कोथिंबीर
मालवणी मसाला / गरम मसाला
लाल तिखट

क्रमवार पाककृती: 

१. अंडी उकळून घ्यावीत. १५-२० मिनिटे लागतात. तोपर्यंत कांदे चिरून घ्यावेत. फार बारिक चिरले नाहीत तरी चालेल.
२. तेलावर कांदे सोनेरी रंगावर परतून घ्यावेत. त्यात खोबरं, आलं-लसूण पेस्ट घालून परतावे.
३. वरील मिश्रण + कोथिंबीर मिक्सरवरुन वाटून घ्यावे.
४. थोड्याशा तेलावर जिरं घालून मग त्यावर वाटण खमंग परतून घ्यावे.
५. हवे तेवढे पाणी घालून त्यात उकडलेली अंडी + मीठ + मालवणी / गरम मसाला + लाल तिखट घालून एक उकळी काढावी.
६. वरून आवडत असल्यास अजून कोथिंबीर घालावी.
७. पोळी / ब्रेड / भाताबरोबर ओरपावी Happy

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

- सुकं खोबरंही चालेल बहुधा.. मी कायम ओलंच वापरतो

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्डी उभी कापा आणी थोडी शालो फ्राय करुन घ्या. त्यावर थोडा गरम मसाला भुरभुरावा..
आणी मग करीत हि अन्डी सोडावी.