ना बाग, ना फुलं
ना समुद्र, ना किनारा
बस्स, हा माळ आपला होता
इथं नव्हतंच काही... सगळंच खडकाळ
पण तो काळ आपला होता..
आणि त्याच्या धुंद मिठीत.. आपण दोघे
हलकेच लाजायचीस
तेंव्हा लाट यायची अंगावर
अन् वाटायचं बसल्यासारखं
किनार्यावर घटकाभर
हसायचीस तेंव्हाही लाख फुलं फुलायची
खांद्यावर, छातीवर, या माळावर
फुलून यायचा भवताल
रेंगाळायचे ऋतू
प्रेम, रुसवा, मौन
सगळ्यातून उरायचीस तू
त्या क्षणांचे धागे
तेंव्हा शेला बनून यायचे स्वप्नात
पण स्वप्नच ती...
आता उरलाय केवळ त्या क्षणांचा गुंता
एखादा धागा सुटा करावा म्हंटलं
तर तास निघून जातात
मग कधी फुलं सांडत
नाहीतर व्यथा मांडत
ओंजळीत येते एखादी कविता
अन् छमकन हसून म्हणते
म्हंटलं होतं ना...
तुला कध्धी म्हंजे कध्धी एकटं सोडणार नाही ?
.......................................................................शाम
ओंजळीत येते एखादी कविता अन्
ओंजळीत येते एखादी कविता
अन् छमकन हसून म्हणते
म्हंटलं होतं ना...
तुला कध्धी म्हंजे कध्धी एकटं सोडणार नाही ?
>>>
वाह!
शामदादा जियो
व्वा वा ... मस्तच.
व्वा वा ... मस्तच.
व्वाह!!! मस्त!
व्वाह!!! मस्त!
कविता आवडली.
कविता आवडली.
सुंदर...!!!
सुंदर...!!!
>>ना बाग, ना फुलं ना समुद्र,
>>ना बाग, ना फुलं
ना समुद्र, ना किनारा
बस्स, हा माळ आपला होता
इथं नव्हतंच काही... सगळंच खडकाळ
पण तो काळ आपला होता>>>>
व्वा शाम, पोचले शब्द थेट आत.
पु.ले.शु.
सहीच!!! मस्त ही एक अशीच
सहीच!!! मस्त
ही एक अशीच माझीपण, http://www.maayboli.com/node/24688
क्या बात है शाम..........
क्या बात है शाम.......... अप्रतिम, केवळ अप्रतिम........
शाम रॉक्स !!
धन्यवाद दोस्तांनो!!
धन्यवाद दोस्तांनो!!
ह्म्म्म .......... कविता एकटं
ह्म्म्म .......... कविता एकटं सोडत नाही हे खरं!
श्यामभौ, खास !
श्यामभौ, खास !
वा वा.... आता उरलाय केवळ त्या
वा वा....
आता उरलाय केवळ त्या क्षणांचा गुंता
एखादा धागा सुटा करावा म्हंटलं
तर तास निघून जातात
मग कधी फुलं सांडत
नाहीतर व्यथा मांडत
ओंजळीत येते एखादी कविता
अन् छमकन हसून म्हणते
म्हंटलं होतं ना...
तुला कध्धी म्हंजे कध्धी एकटं सोडणार नाही ?....खास!!!
आअह्ह्हा! कक्लास्स्स्स!
आअह्ह्हा! कक्लास्स्स्स!
सुपर्ब्......नितांत
सुपर्ब्......नितांत सुंदर......
हसायचीस तेंव्हाही लाख फुलं
हसायचीस तेंव्हाही लाख फुलं फुलाची
>>
फुलायची असं हवंय का ते?
तुला कध्धी म्हंजे कध्धी एकटं
तुला कध्धी म्हंजे कध्धी एकटं सोडणार नाही ?<<< मस्तच
नवीन वाचक+ वाचिकांचे खूप खूप
नवीन वाचक+ वाचिकांचे खूप खूप आभार!