विमलाबाई गरवारे प्रशाला

Submitted by चीकू on 17 July, 2011 - 13:11

विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

..

केला मी तसा उल्लेख, काय करणार आहात?
>>> मी मला काय योग्य वाटलं, नाही वाटलं, माझ्या विचारांना काय पटलं हे मांडण्यापलिकडे काहीही करू शकत नाही ह्याची मला पूर्ण जाणीव आहे.

काय योग्य वाटावे आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण जे काही वर लिहिले आहेत त्यावरून मेधा ओक हे व्यक्तीमत्व अजिबातच समजलेले नाही तुम्हाला, हे मी म्हणतो
>> मी माझं मत ह्या पलिकडे कोणतंही विधान केलं नाही.
आणि कोणतं व्यक्तीमत्त्व मला किती समजलं आहे, ह्यावर ४ ओळींच्या पोस्ट वरून अनुमान काढणं - परत एकदा मला योग्य वाटत नाही.

ज्यांचा जडणघडणीमध्ये सहभाग असतो त्यांच्याचबद्दल बोलायचे नाही कारण कुठल्यातरी खुळ्या कल्पना? अहो रार, शिक्षक हे माणूसच असतात.
>> मी स्वतः मास्तरांच्या घरात वाढली आहे. त्यामुळे शिक्षक आणि त्यातला माणूस थोडाफार नक्की पाहिलाय, अनुभवलाय...
शिवाय माणूस माहितही नसताना परत एकदा चार ओळींच्या पोस्ट वरून 'कोणाच्या कोणत्या कल्पना खुळया' वगैरे अनुमान काढणं माझ्या पिंडाला न पटणारं आहे.

त्यामुळे माझ्याबा़जूने मी हा विषय इथेच थांबवावा हे उत्तम !

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'माझं मत हे त्या विधानाबद्दल होतं, ते लिहिणा-या माणसाबद्दल नाही'.
उद्या खुद्द माझ्या वडिलांनी जरी असं विधान केलं असतं तरी मी त्यावर मी याच शब्दात आणि असंच मत मांडलं असतं... कारण ह्या ठिकाणी माझा विरोध, किंवा नाराजी ही 'त्या विधानाला' होती.. ते वाक्य कोण म्हणतंय याचा विचार करुन मी माझं मत व्यक्त केलं नव्हतं.

..

शाळेला मदत करण्यासाठी काही निधी जमवला आहे. कोणी आधी काही शाळेला मद्त केली आहे का? शाळेला सध्या नक्की कशाची जास्त जरूर आहे कोणाला माहीत आहे का? माहीती असल्यास प्लीज सांगा.

माझ्या बॅचच्या माझ्या एका मैत्रिणीने काही वर्षांपूर्वी शाळेच्या ग्रंथालयाला देणगी दिली होती. तिला पाहिजे तर विचारीन. शाळेत जाउनच नक्की कशी मदत उपयोगी पडेल ते समजेल.

थँक्यू शूम्पी . कोणत्या वर्षी आणि साधारण किती मदत केली होती ते कळाले तर बरे होईल. म्हणजे कोणते पर्याय निवडायचे ते समजायला मद्त होईल.
शाळेत जाउनच नक्की कशी मदत उपयोगी पडेल ते समजेल.> होय .बरोबर आहे .ते पण करण्याचा प्रयत्न करतोय.

आमच्या बॅचचे गेटटुगेदर नुकतेच शाळेत झाले.
शाळेची परिस्थिती फोटोंमध्ये खूपच खराब वाटली. सगळ्या भिंतींचा रंग निघालाय, बाकं कमी झाली आहेत, फळयाच्या जागी भिंत काळ्या रंगात रंगवली आहे. बिचारी वाटली शाळा अगदी त्या फोटोंमध्ये. ८६ च्या बॅचनी दिली होती मागच्या वर्षी देणगी, त्याचा शाळेने कसा उपयोग केला त्याची माहिती मिळाली तरी फायदा होईल.

आमच्या ८६ च्या बॅच् ने गेल्या वर्षी काही नविन बाके , वॉटर फिल्टर्स आणि काँप्युटर लॅब ला काही सॉफ्टवेअर्स इ. अशी मदत दिली होती. बाकांबद्दल शाळेनेच सुचवले होते. शाळेची एकूण परिस्थिती वाईट दिसली फोटोत तरी.मला वाटते राखी म्हणते तसे शाळेत विचारले तर सांगतील काय जास्त गरजेचे आहे ते.

फळयाच्या जागी भिंत काळ्या रंगात रंगवली आहे>>> हे तर आमच्या वेळेस पण होतं (९६ बॅच). अर्थात बाकं बरी होती. रंग पण ठिक-ठाक होता.

त्याचा शाळेने कसा उपयोग केला त्याची माहिती मिळाली तरी फायदा होईल>>> अनुमोदन

बापरे. दरोडा काय , सरांना पोत्यात मारुन नंतर नदीच्या पात्रात फेकण काय, नालायक बाई काय. भयानकच.
हे सगळ लिहुन विद्यार्थी - शिक्षक आणि एकुणच शाळेबद्दल नेगेटीव्ह मत पसरेल असं नाही वाटत का?

आमच्या ८६ च्या बॅच् ने गेल्या वर्षी काही नविन बाके , वॉटर फिल्टर्स आणि काँप्युटर लॅब ला काही सॉफ्टवेअर्स इ. अशी मदत दिली होती>> या माहीतीचा नक्कीच उपयोग होईल. बाकी काय ठरले आमच्या ग्रुप चे ते ईथे नंतर पोस्ट करते.

Teacherssvg.jpgTeacherssvg.jpgTeacherssvg.jpg

These are recent pictures of our teachers.
from left to right -- 1st row- godbole, savnoor, prabhune, namjoshi, sahastrabudhe.
2nd row-- sahastabudhe, namjoshi, sohoni, smita joshi.
3rd row -- anawalikar, mone ,rama joshi, pachkudve.
Center-- Gavade sir. He is 89 and still very active.

होय.. गावडे सर आहेत. परत नावे लिहिली आहेत बघ मी सगळ्यांची. यात राव मॅडमचा आणि ओक बाईंंचा फोटो नाहीये. उद्या शोधून टाकते परत.

फारएण्ड पण गरवारेत होता?
मला नामजोशी बाई तेवढ्या ओळखता आल्या. काही चेहेरे लक्षात होते पण नवं नव्हती आठवत. खाली सगळ्यांची नावे लिहिल्याबद्दल धन्यवाद!

थॅन्क्स ईशा! सोहोनी बाई व इतर बरेच शिक्षक्/शिक्षिका ओळखू आले नाहीत. यातील बरेच लोक आम्हाला एक पेक्षा जास्त वर्षे शिकवायला होते (ते वेगवेगळ्या इयत्तेत आल्याने. मी एकाच इयत्तेच राहिल्याने नव्हे Happy )

शूप्मी - मी नामजोशी बाईंना सुद्धा ओळखले नाही. रमा जोशी आम्हालाही होत्या पण ओळखू येत नाहीत आता.

वॉव ! यू मेड माय डे... धन्यवाद.
मला सगळे ओळखू आले, सोवनी बाई सोडून. आई शप्पथ... !
मला सोवनी बाई, रमा जोशी यांचे संस्कृतचे उच्चार (खास करून रमा जोशी बाई) आजही आठवले हा फोटो पाहून.
गोडबोले बाईंचं हसत गणित शिकवणं, नामजोशी बाईंचं कडक इंग्लिश, सावनूर बाईंंनी शिकवलेलं सायन्स, अनवलीकर सरांनी शिकवलेला भूगोल, मोनेबाईंनी शिकवलेलं गणित आणि भूगोल.... जबरी !!!
गावडे सर कधी शिकवायला नव्हते... आणि प्रभुणेसरांच्या ऑफीसमधे शिक्षा झाली म्ह्णून कधी जायची वेळ आली नाही...बक्षिसं मिळाली की त्याची रक्कम घ्यायला त्यांचा अलिशान ऑफीसमधे जायला मिळायचं !
पाचकुडवे आता असे दिसतात ... विश्वासच बसत नाहीये !
खूप वर्ष झाली शाळा सोडून आणि नुकतेच शाळेतून बाहेर पडलोय - ह्या दोन्ही भावना एकाच वेळी Happy

विमलाबाई गरवारे शाळा हा कायम 'दिल के पास' रहनेवाला टॉपीक Happy
मस्त वाटलं खूप !

गोडबोले बाई किती मोठ्या दिसायला लागल्या , ओळखुच नाही आल्या पटकन :(.
नामजोशी बाई बर्‍यापैकी आहेत तशा.. बाकिच्यांना ओळखायचा प्रयत्न करतेय...
मला माझीच गंमत वाटतेय, शाळेतले शिक्षक शाळेतून बाहेर पडताना जसे दिसत होते तसेच मेमरी मधे फिट्ट होतात :).

सावनूर बाई पण बर्‍यापैके होत्या तशाच दिसतायेत.. सोहोनी बाई पण एजेड दिसायला लागल्यायेत..

गोडबोले बाई आमच्याच सोसायटीत राहतात त्यामुळे ओळखता आल्या. त्याशिवाय नामजोशी आणि सहस्त्रबुद्धे ओळखता आल्या (नांवे न वाचता).

नावे वाचल्यावर मात्र सगळेच ओळखता यायला लागले, एक्सेप्ट सावनूर आणि रमा जोशी, या आम्हाला कधी नव्हत्याच बहुतेक!

सोहनी बाई बघून नवल वाटले. किती म्हातार्‍या दिसत आहेत. अनवलीकर आणि पाचकुडवे, तसेच प्रभुणे हे व सगळेच फोटो पाहून आनंद झाला.

अत्तिशय आभारी आहे या छायाचित्रांसाठी

ईशा१०१ - हे फोटो इथे टाकल्याबद्दल धन्यवाद....
रोहिणी आपटे बाईंची काय खबरबात? त्यांचा पण फोटो टाकता येईल का? त्या आम्हाला इंग्रजी शिकवायला होत्या. (८६ची बॅच - १०वी ब)

garware pic 2.jpg
These are recent pictures of our teachers.
from left to right -- 1st row- godbole, savnoor, prabhune, namjoshi, sahastrabudhe.
2nd row-- sahastabudhe, namjoshi, sohoni, smita joshi.
3rd row -- anawalikar, mone ,rama joshi, pachkudve.
Center-- Gavade sir. He is 89 and still very active.

Pages