तर मायबोलीकरांनो, आता केवळ काही दिवसच उरले आहेत. निदान आता तरी सुधरु या.
थोडेसे सौजन्य दाखवूया. गेल्या १० वर्षांत जे होऊ शकले नाही, ते निदान आठवडाभर तरी
करु या. म्हणजे मायबोलीवर सौजन्य नव्हते / नाही असे नाही. तर सौजन्य सप्ताह कधी
झाल्याचे आठवत नाही. आता २१ तारीख जवळ येतेय, तेवढाच चांगुलपणा असावा पदरात !
आता सौजन्य म्हणजे काय रे भाऊ ? सौ + जन्य म्हणजे आपलेच अपत्य तर नव्हे, अशी
(मुंगेरीलाल टाईप ) कोटी करु नका. (विशिष्ठ उल्लेख कंसात करण्याचे कारण, अर्थातच सौ.स. )
तर सौजन्य दाखवायचे, म्हणजे काही पथ्य तर पाळावीच लागणार. मुख्य म्हणजे विचारसरणीत
बदल करावा लागणार. तशी आपल्याला त्याची सवय नाही, ( म्हणून तर असे सप्ताह पाळायचे
असतात. ) ( कंसाचे कारण वर लिहिले आहे तेच.)
१) टिंब. टिम्ब. टिंब....
२) आधी आपल्या ( आपापल्याच ) सदस्यत्वामधे जा. विशिष्ठ शहर, अतिविशिष्ठ शहर, बघायला
येणार आहात का ?, तूम्हाला काय करायचेय ? असे जे उल्लेख आहेत. ते नीट करा. ( नाहीतर
काढूनच टाका.)
३) पिन कोड द्यायचा असेल तर योग्य तोच द्या. ४२० ४२० असा पिनकोड नसतो. ( स्वभाव असतो.)
४) फ़ोटोपण टाकायचाच असेल, तर आपलाच टाका. करीना / कतरीना / सलमान / हृतिक हे मायबोलीकर
नाहीयेत हे सगळ्यांना, माहित आहे.
५) आता परत मायबोलीवर या.
६) फ़ुल्ली / फ़ुल्ली / फ़ुल्ली
७) आपापल्या विपू बघा. बाकिच्यांचा बघू नका. तूम्ही विपू केलीत तर ती त्या सदस्याच्या खात्यात दिसतेच.
त्याच्या खाली स्क्रोल करु नका.
८) येता जाता ऍडमिन साहेबांना विपू करु नका. त्यांना बाकीची कामे असतात. ( भांडायला काय लहान आहात.
त्यांना काय ती पोस्ट्स दिसत नाहीत. ) ( असो. कंसाचे कारण तेच.)
९) मोकळी जागा
१०) कुणाला ( दक्षे ) सद्या वगैरे हाक मारत असाल, तर या सप्ताहात सदाशिवरावभाऊ अशी हाक मारत जा.
११) "आली नाही आज आमची मोलकरीण, वेळेवर कामाला " अशी गझल कुणी ( प्राध्यापकांनी ) लिहिली तर
लगेच " आली नाही आज आमची लोकल टायमावर " असे विडंबन करु नका. ( त्यापेक्षा मोलकरीण हे कसले
रुपक असेल, यावर चिंतन करा. )
१२) ऑगस्ट पासून येणार येणार असे जाहीर झाले असले तरी साल जाहीर झाले नव्हते. त्यामूळे गुलमोहोरावरचे प्रत्येक लिखाण, तूम्हाला दिसणारच. त्या प्रत्येकावर प्रतिसाद द्या. गेल्या १० ( हजार / लाख / अब्ज / पद्म / निखर्व ) वर्षात असे ललित / कथा / कविता वाचले नव्हते असे लिहा. दहावर शून्ये आपापल्या कल्पनेप्रमाणे द्या.
१३) इब्लिस / डॅंबिस / विसरभोळा / खवीस हि त्यांची खरी नावे नाहीत. हे लक्षात ठेवा. ती लिहिताना मनात
जरी वाईट विचार आले तरी ( कानाच्या पाळीला हात लावून ) क्षमा मागा.
१४) कुणी काही क्रमश: लिहिले, तरी त्याला प्रतिसाद द्या.
१५) डुप्लिकेट आयड्यांनी, अकरा लाखात आपले कॉंट्रिब्यूशन नेमके किती, ते एकदा जाहीर करा(च).
१६) गप्पा मारताना, एकच धागा पकडून ठेवा. बाकीच्या धाग्यावर काय चाललेय त्यावर लक्ष ठेवू नका.
( ते काम ऍडमिन साहेबांचे असते.)
१७) मोकळी जागा.
१८) मोकळी जागा.
१९) आपण हे जेवलो / हे खाल्लं अशी पोस्ट करण्याआधी. बाळा / बाळे / बाबा / ताई जेवलास / जेवलीस का ?
अशी विचारणा करा.
२०) सावरकर / हिंदुत्व / जातीयवाद / इतर धर्म / शेजारी राष्ट्रे यांच्याबद्दल लिहिताना(ही) सौ.स. चे भान ठेवा.
२१) वरच्या क्रमांक १३ बरोबर, हे पण लक्षात घ्या, कि नावात काही नसते. ( एखाद्याच्या नावात दा असले म्हणून तो दादा नसतो आणि एखाद्याच्या नावात झणझणीत असले तरी तो कोल्हापूरचा नसतो.)
२२) मोकळी जागा.
२३) शाहरुख खान बद्दल लिहिताना, सलमान खान बद्दल सौजन्य ठेवा. आणि व्हाईस व्हर्सा. दोघेही मायबोलीवर नाहीत. ( पण त्यांचे पंखे आहेत ) याचे भान ठेवा.
वरती मोकळ्या जागा / टिंब / फ़ुल्ली का आहेत ? असा प्रश्न मनात आला तरी अजून विचारलेला नाहीत ( यालाच सौजन्य म्हणतात ) पण तरी मी सांगतोच ( यालाही सौजन्यच म्हणतात ) कारण प्रत्येकाची सौजन्याची कल्पना वेगवेगळी असते. तूमचे स्वत:चे नियम लिहिण्यासाठीच तशी सोय मी केली आहे. ( बरोबर, यालाही सौजन्यच म्हणतात.)
तर मायबोलीकरांनो, बघा हे जमतंय का ? आपण तर जमवाच आणि ज्यांना जमणार नाही त्यांना नम्रपणे सौ.स. चालू आहे, याची जाणीव करुन द्या.
पुढच्या आठवड्यात जगलो / वाचलेलो असू. तर मात्र एकमेकांना बघून घेऊ.. ( बरोबर, याला सौजन्य म्हणत नाहीत. कारण मग आपल्याला कुणाच्या बा ला घाबरायचे काही कारणच नसेल.)
दिनेश सुटलायस! भाऊ व्यचि
दिनेश सुटलायस!
भाऊ व्यचि झक्कास!
भाऊ
भाऊ
भाऊ, व्यंगचित्र भारीच.
भाऊ, व्यंगचित्र भारीच.
दिनेशदा, मगाशी जेवताना एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहील. :
आणि तुम्ही सांगत असलेली माहिती व अनुभव ऐकून ते इतके तल्लीन झाले आहेत की खिडकीला चिकटूनच आहेत. (एक 'निग' गटग राहिलय ना? ते तिथे करू.) 
तुम्ही 'वरती' रत्नजडीत सिंहासनावर बसला आहात, आणि आम्ही समस्त 'निग'कर तुमच्या समोर मिळेल त्या आसनावर स्थानापन्न झालो आहोत. तुम्ही तुमच्या गोड आवाजात, निसर्गाची माहिती, अनुभव सांगत आहात. इकडे तिकडे डोकावण्याची सवय असलेले काही माबोकर खिडकीतून डोकावत आहेत.
भारी!
भारी!
या "वरती" वरुन आठवलं. अगदी
या "वरती" वरुन आठवलं. अगदी जून्या काळातले मायबोलीचे एक गटग. शिवाजी पार्कला जमायचे ठरले होते. तिथे स्वर्गवासी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा होता. त्याखाली स्व. मीनाताई ठाकरे असे लिहिलेले होते. ते वाचताना एका मायबोलीकरणीने ते स्वतः मीनाताई ठाकरे, असे वाचले. आणि तिला ते तसेच वाटतही होते. खो खो हसलो होतो आम्ही !
या निमित्ताने समस्त
या निमित्ताने समस्त माबोकरांचं एक गटग ठेवून '' सौजन्याची ऐशी तैशी'' हे राजा गोसावी अभिनीत नाटक फुकटात दाखवण्यात यावं असं प्रकर्षाने वाटू लागलंय.
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा होता. त्याखाली स्व. मीनाताई ठाकरे असे लिहिलेले होते. ते वाचताना एका मायबोलीकरणीने ते स्वतः मीनाताई ठाकरे, असे वाचले. >>>>>>>>>>>.दिनेशदा, मला आपल्या गटगच्या वेळचे संभाजीबागेतल्या पुतळ्याजवळचे संभाषण आठवले. (मी आर्येला सांगितलेली खूण :हाहा:)
मस्त कल्पना आहे दिनेशदा...
मस्त कल्पना आहे दिनेशदा...
(No subject)
भाऊ ग्रेट, मस्त व्यं.चि.
भाऊ ग्रेट, मस्त व्यं.चि.
आज २२ डिसेंबर जगलो, वाचलो
आज २२ डिसेंबर
जगलो, वाचलो आणि तरलोही. सौजन्य सप्ताह संपला एकदाचा. आता बघून घेऊ एकेकाकडे
हाणा
मारा
धरा
कापा
हर हर महादेव
दीन दीन
जो बोले सौ निहाल
बघता काय मावळ्यांनो, तुमचे माघारीचे दोर केव्हांच कापले आहेत.
च्यायला, मायला, हायला उफ्फ आयला... रिचार्जिंग, रिचार्जिंग !!!! डिफॉल्ट सेटींग सिलेक्टेड !!
" हेची फळ का मम तपाला " -
" हेची फळ का मम तपाला " - दिनेशदा !!
भाऊ
भाऊ :हाहा::फिदी::हहगलो:
संपला बरं का ! आता होऊ द्या
संपला बरं का !
आता होऊ द्या सुरु बा.चा बा.ची !
दिनेशदा, किरण आधीच सुरू झाला.
दिनेशदा, किरण आधीच सुरू झाला. ::स्मित:
आता होऊ द्या सुरु बा.चा बा.ची !>>>>>>>>ती फ़क्त इथेच सुरू झाली नव्हती.
<< आता होऊ द्या सुरु बा.चा
<< आता होऊ द्या सुरु बा.चा बा.ची >> दिनेशदा, जणूं तुमच्या ह्या हिरव्या सिग्नलची वाटच पहात होती इथली तुफान मेल !!
>>>>आता होऊ द्या सुरु बा.चा
>>>>आता होऊ द्या सुरु बा.चा बा.ची !
सर्व विभक्ती,प्रत्ययासह!
दिनेशदा, जणूं तुमच्या ह्या
दिनेशदा, जणूं तुमच्या ह्या हिरव्या सिग्नलची वाटच पहात होती इथली तुफान मेल !! डोळा मारा >>>>>>>>..बरोबर. आता बघा कशी सुटेल ते.
(No subject)
मी वाचल्याच्या सुखापेक्षा,
मी वाचल्याच्या सुखापेक्षा, "ते पण" का वाचले ? याचे दु:ख जास्त आहे !
अरे ते स्वर्गीय नाही
अरे ते स्वर्गीय नाही स्वर्गवासी असेल पोस्ट एडिट कर पहिल्यांदी.
मी वाचल्याच्या सुखापेक्षा,
मी वाचल्याच्या सुखापेक्षा, "ते पण" का वाचले ? याचे दु:ख जास्त आहे !>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>१००% सहमत.
हो अश्विनी, सुधारले !
हो अश्विनी, सुधारले !
तिच्या मायनी कटकट! सऊजन्य
तिच्या मायनी कटकट! सऊजन्य सपता संपला तं का लगे शिमगा साजरा कराया लागायाचं का लोकेहो
श्रावण संपला की कसे तुटुन
श्रावण संपला की कसे तुटुन पडतात ना xxxxxवर, अगदी तस्सेच!!!
Pages