तर मायबोलीकरांनो, आता केवळ काही दिवसच उरले आहेत. निदान आता तरी सुधरु या.
थोडेसे सौजन्य दाखवूया. गेल्या १० वर्षांत जे होऊ शकले नाही, ते निदान आठवडाभर तरी
करु या. म्हणजे मायबोलीवर सौजन्य नव्हते / नाही असे नाही. तर सौजन्य सप्ताह कधी
झाल्याचे आठवत नाही. आता २१ तारीख जवळ येतेय, तेवढाच चांगुलपणा असावा पदरात !
आता सौजन्य म्हणजे काय रे भाऊ ? सौ + जन्य म्हणजे आपलेच अपत्य तर नव्हे, अशी
(मुंगेरीलाल टाईप ) कोटी करु नका. (विशिष्ठ उल्लेख कंसात करण्याचे कारण, अर्थातच सौ.स. )
तर सौजन्य दाखवायचे, म्हणजे काही पथ्य तर पाळावीच लागणार. मुख्य म्हणजे विचारसरणीत
बदल करावा लागणार. तशी आपल्याला त्याची सवय नाही, ( म्हणून तर असे सप्ताह पाळायचे
असतात. ) ( कंसाचे कारण वर लिहिले आहे तेच.)
१) टिंब. टिम्ब. टिंब....
२) आधी आपल्या ( आपापल्याच ) सदस्यत्वामधे जा. विशिष्ठ शहर, अतिविशिष्ठ शहर, बघायला
येणार आहात का ?, तूम्हाला काय करायचेय ? असे जे उल्लेख आहेत. ते नीट करा. ( नाहीतर
काढूनच टाका.)
३) पिन कोड द्यायचा असेल तर योग्य तोच द्या. ४२० ४२० असा पिनकोड नसतो. ( स्वभाव असतो.)
४) फ़ोटोपण टाकायचाच असेल, तर आपलाच टाका. करीना / कतरीना / सलमान / हृतिक हे मायबोलीकर
नाहीयेत हे सगळ्यांना, माहित आहे.
५) आता परत मायबोलीवर या.
६) फ़ुल्ली / फ़ुल्ली / फ़ुल्ली
७) आपापल्या विपू बघा. बाकिच्यांचा बघू नका. तूम्ही विपू केलीत तर ती त्या सदस्याच्या खात्यात दिसतेच.
त्याच्या खाली स्क्रोल करु नका.
८) येता जाता ऍडमिन साहेबांना विपू करु नका. त्यांना बाकीची कामे असतात. ( भांडायला काय लहान आहात.
त्यांना काय ती पोस्ट्स दिसत नाहीत. ) ( असो. कंसाचे कारण तेच.)
९) मोकळी जागा
१०) कुणाला ( दक्षे ) सद्या वगैरे हाक मारत असाल, तर या सप्ताहात सदाशिवरावभाऊ अशी हाक मारत जा.
११) "आली नाही आज आमची मोलकरीण, वेळेवर कामाला " अशी गझल कुणी ( प्राध्यापकांनी ) लिहिली तर
लगेच " आली नाही आज आमची लोकल टायमावर " असे विडंबन करु नका. ( त्यापेक्षा मोलकरीण हे कसले
रुपक असेल, यावर चिंतन करा. )
१२) ऑगस्ट पासून येणार येणार असे जाहीर झाले असले तरी साल जाहीर झाले नव्हते. त्यामूळे गुलमोहोरावरचे प्रत्येक लिखाण, तूम्हाला दिसणारच. त्या प्रत्येकावर प्रतिसाद द्या. गेल्या १० ( हजार / लाख / अब्ज / पद्म / निखर्व ) वर्षात असे ललित / कथा / कविता वाचले नव्हते असे लिहा. दहावर शून्ये आपापल्या कल्पनेप्रमाणे द्या.
१३) इब्लिस / डॅंबिस / विसरभोळा / खवीस हि त्यांची खरी नावे नाहीत. हे लक्षात ठेवा. ती लिहिताना मनात
जरी वाईट विचार आले तरी ( कानाच्या पाळीला हात लावून ) क्षमा मागा.
१४) कुणी काही क्रमश: लिहिले, तरी त्याला प्रतिसाद द्या.
१५) डुप्लिकेट आयड्यांनी, अकरा लाखात आपले कॉंट्रिब्यूशन नेमके किती, ते एकदा जाहीर करा(च).
१६) गप्पा मारताना, एकच धागा पकडून ठेवा. बाकीच्या धाग्यावर काय चाललेय त्यावर लक्ष ठेवू नका.
( ते काम ऍडमिन साहेबांचे असते.)
१७) मोकळी जागा.
१८) मोकळी जागा.
१९) आपण हे जेवलो / हे खाल्लं अशी पोस्ट करण्याआधी. बाळा / बाळे / बाबा / ताई जेवलास / जेवलीस का ?
अशी विचारणा करा.
२०) सावरकर / हिंदुत्व / जातीयवाद / इतर धर्म / शेजारी राष्ट्रे यांच्याबद्दल लिहिताना(ही) सौ.स. चे भान ठेवा.
२१) वरच्या क्रमांक १३ बरोबर, हे पण लक्षात घ्या, कि नावात काही नसते. ( एखाद्याच्या नावात दा असले म्हणून तो दादा नसतो आणि एखाद्याच्या नावात झणझणीत असले तरी तो कोल्हापूरचा नसतो.)
२२) मोकळी जागा.
२३) शाहरुख खान बद्दल लिहिताना, सलमान खान बद्दल सौजन्य ठेवा. आणि व्हाईस व्हर्सा. दोघेही मायबोलीवर नाहीत. ( पण त्यांचे पंखे आहेत ) याचे भान ठेवा.
वरती मोकळ्या जागा / टिंब / फ़ुल्ली का आहेत ? असा प्रश्न मनात आला तरी अजून विचारलेला नाहीत ( यालाच सौजन्य म्हणतात ) पण तरी मी सांगतोच ( यालाही सौजन्यच म्हणतात ) कारण प्रत्येकाची सौजन्याची कल्पना वेगवेगळी असते. तूमचे स्वत:चे नियम लिहिण्यासाठीच तशी सोय मी केली आहे. ( बरोबर, यालाही सौजन्यच म्हणतात.)
तर मायबोलीकरांनो, बघा हे जमतंय का ? आपण तर जमवाच आणि ज्यांना जमणार नाही त्यांना नम्रपणे सौ.स. चालू आहे, याची जाणीव करुन द्या.
पुढच्या आठवड्यात जगलो / वाचलेलो असू. तर मात्र एकमेकांना बघून घेऊ.. ( बरोबर, याला सौजन्य म्हणत नाहीत. कारण मग आपल्याला कुणाच्या बा ला घाबरायचे काही कारणच नसेल.)
हा हा हा हा.. भारी लिवलया..
हा हा हा हा.. भारी लिवलया..
सुप्रभात मा./श्री / श्रीमती/
सुप्रभात मा./श्री / श्रीमती/ कु./ डॉ. ........... मा.बो. कर्स .. (सौ. स)
मामांनी तरी सौ.स. पाळायला
मामांनी तरी सौ.स. पाळायला सुरवात केली आहे.
मज्जा आहे सौ. स
मज्जा आहे सौ. स
दिनेशदांचे हे लेखन बहुदा
दिनेशदांचे हे लेखन बहुदा सौ(भाग्यवती)स घाबरून केलेले दिसतंय.
बाकी ह्या सौसचा फायदा मलाच
बाकी ह्या सौसचा फायदा मलाच होणार आहे...आता माझी गाणी ऐकवायला हरकत नसावी.
( नुसते हसणारे तर सौजन्याची
मस्तच लिहले ..दिनेश दा
मस्तच लिहले ..दिनेश दा
कल्पना आवडलेली आहे
कल्पना आवडलेली आहे
सौ. स. ची आयडीया भारी.... हा
सौ. स. ची आयडीया भारी....
हा स. संपला की सगळी कसर भरून काढतील
की पुढच्या ३ स. नंतर परत संक्रांत आहेच गोड बोला सांगायला.
बघते बाई जमतंय का
बघते बाई जमतंय का ते.........काय दिनेशदा, मी आता सासू मोडात आहे.......असं कस्काय तुमी मला सौजन्यसप्ताह पाळायला सांगाताय भलत्या वेळी?
सगळ्यांचे प्रतिसाद छान, छान,
सगळ्यांचे प्रतिसाद छान, छान, छान... ( पुढे अगदी मनिमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान लिहायचं होत. पण सौ.स. ! )
एक आठवडा सौ.स. पाळायला हरकत
एक आठवडा सौ.स. पाळायला हरकत नाही. >>>>>>>एक आठवड्यानंतर अ.सौ.स. का ग?




आपण कसे (जिलेबीसारखे) सरळ वागायचे. >>>>>:हाहा:
तशी मी सौजन्यानेच वागते हो सर्वांशी इश्श ! अजून थोडं बाणविन अंगी. फिदीफिदी>>>>>.दक्षे, कित्ती तो विनय.
आज्जे, शुभेच्छा देण्यावरून आपल्या मनात मला हे जमणार नाही ह्याबद्दल ठाम विश्वास आहे ह्याचे कौतुक वाटले.>>>>>>>विदिपा, धन्यवाद. (सौ.स.)
आज्जेंना उद्देशून वरील विधान आहे ना सौ. स. च्या आचारसंहितेत?>>>>>>>>:हाहा:
..आता माझी गाणी ऐकवायला हरकत नसावी.>>>>>>>>>काका
असं कस्काय तुमी मला सौजन्यसप्ताह पाळायला सांगाताय भलत्या वेळी?>>>>>>>>मानुषी
चला तीन दिवस राहिले. :
माझ्या बंधू-भगिनीनो, मित्र-मैत्रिणींनो, काका-काकूंनो, मामा-मामींनो, आणि राहिलेल्या सर्वांनो, गेल्या २ वर्ष ४ आठवड्यात माझ्याकडून, समजून-ऊमजून, चूकून-माकून, वगैरे, वगैरे, वगैरे कुणी दुखवलं गेल असेल तर क्षमस्व. (हे फक्त २१.१२.१२ पर्यंतच. नंतर......:डोमा:) सौ.स. झिंदाबाद. !
वर कोणी माझ्याआधी गेलात तर, माझ्यासाठी जागा ठेवा रे!
कोण कोण लिहीताय अजून?
दिनेशदा हहगलो स्माईली टाकावी
दिनेशदा
हहगलो स्माईली टाकावी तर नेमका हा लेख गंभीरपणे लिहीलेला असायचा
एकच शंका आहे. एक सप्ताह असा सौजन्यपूर्ण पाळल्यावर जर जगबुडी झालीच नाही तर...??? ( सात दिवसांच्या उपवासानंतर काय होईल याची कल्पनाच करवत नाही )
णि एखाद्याच्या नावात झणझणीत असले तरी तो कोल्हापूरचा नसतो
वर कोणी माझ्याआधी गेलात तर,
वर कोणी माझ्याआधी गेलात तर, माझ्यासाठी जागा ठेवा रे! << स्त्रियांसाठी राखिव जागा असतिल ना
एक शंका 
किरण (सौ.स.) स्त्रियांसाठी
किरण
(सौ.स.)
)
स्त्रियांसाठी राखिव जागा असतिल ना >>>>.वर पण अशी सोय असते काय? (कोणाला विचारावे बरं?
मस्तच
मस्तच
शेवटचे वाक्य डेंजर
शेवटचे वाक्य डेंजर वाटते
पुढच्या आठवड्यात जगलो / वाचलेलो असू. तर मात्र एकमेकांना बघून घेऊ..
सौ. स. चि फरफाट होईल जगलो तर
बाकी मस्तच
शोभा, आत्मा लिंगनिरपेक्ष असतो
शोभा,
आत्मा लिंगनिरपेक्ष असतो का ? असा बाफ तिथे गेल्यागेल्या उघडायचाय. प्रत्येकाने आपले "मानवीय" अनुभव लिहायचे आहेत.
कदाचित याच नव्हे तर आधीच्या जन्मातले पण आठवेल. मग मी त्या जन्मात मांजर होते आणि कुत्रा होतास, त्यावेळी मला त्रास देत होतास.. वगैरे संदर्भ येतीलच. अर्थात त्यावेळी सौ. स. नसणार !
जरी कुठल्या पामराला माझा
जरी कुठल्या पामराला माझा प्रतिसाद दिसला नाही तरी तो आहे असे मानून चालावे >> बदमास ( सौ.स. म्हणुन लिहीले रे )
दिनेशदा, मस्तच लिहीलेत,
दिनेशदा, मस्तच लिहीलेत, कल्पनाही भन्नाट, मी ही सामील सौ.स (कंपूत) (कंसात का लिहीलंय ते तुम्ही जाणताच
)
बाय द वे, मला माझ्या मधुबालेचा फोटो प्रोफाईल मधून काढावा लागेल का?
:महान दु:खी बाहुली:
(No subject)
Aiyyaayo.. Dreamum
Aiyyaayo..
Dreamum wakeuppam
Critical conditionum
Hey earthum quakepum
Hil dool sab shakeupum
Face to faceum dharti putram
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum..
Pumpingum..
Throbbingum..
Thumpingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha..
Heart beatnum
dhol peetnum
Love lust double kasht
bada dheetnum
Yeh.. body heatnum
hot seatnum
Calling fire brigade bhi defeatnum
Same to sameum
Dil me utarum
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum…
Pumpingum
Streelingum..
Pullingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha.. Ummhha.. Ummhha
अर्थात त्यावेळी सौ. स. नसणार
अर्थात त्यावेळी सौ. स. नसणार !>>>>>>>>>>>>>हे आधी सांगितल ते बरं झाल.
दिनेशदा, मस्त लिहिलंय. सौ.स.
दिनेशदा, मस्त लिहिलंय. सौ.स. एकदम आवडला.
शोभा
आयडिया लै भारी.... तशी मी सौ.
आयडिया लै भारी.... तशी मी सौ. नेच वागते तरी ह्या स च्या निमित्ताने अजुनच सौ ने वागुयात....
२१ नंतर आहेच सौजन्याची ऐशी तैशी.....
थोडंसं गंभीर लिहितो, समोर
थोडंसं गंभीर लिहितो, समोर येणार्या प्रत्येकाला आपण नमस्कार ( किमान स्मित ) करण्याचे कधीपासून टाळू लागलो ?
अंगोलासारख्या यादवी युद्धात १२ वर्षे होरपळलेल्या देशातही मी हा सुखद अनुभव घेतोय. नजरानजर झालेली प्रत्येक अनोळखी व्यक्ती किमान बोम दिया ( शुभ दिवस ) बोलल्याशिवाय रहात नाही. या संस्काराला अगदी लहान बाळे पण अपवाद नाहीत. मला बघून, अमिगो ( मित्र ) अशी आरोळी ठोकून, अंगठा दाखवल्याशिवाय ( थम्स अप ) एकही बाळ रहात नाही.
दिनेशदा,मस्त लेख!
दिनेशदा,मस्त लेख!
दिनेशदा, तुमच्याशी अगदीं
दिनेशदा, तुमच्याशी अगदीं मनापासून १००% सहमत असूनही इथला कांही खोंचक उपरोधही माबोच्या लोकप्रियतेला हातभार लावतो असं मला वाटतं. संवयीमुळें त्याचा अभाव खटकेलही. अतिरेक न होणं मात्र हितावह.
वा भाऊ. मस्तच व्यंगचित्र
वा भाऊ. मस्तच व्यंगचित्र रेखाटलंत !
Pages