Submitted by ग्रेटथिंकर v 1.... on 13 September, 2012 - 11:48
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात आता फक्त सहा सिलेंडरवर सबसिडी मिळेल ,सातवा सिलेंडर बाजारभावाने रु ७२० ते रु ७८० च्या दरम्यान मिळणार .याचे मध्यमवर्गीयांवर काय परिणाम होतील?
डीझेलची दरवाढही पाच रुपये प्रतिलिटर झाली आहे. इंधन दरवाढ गेले काही सततचीच बाब झाली आहे. वीजेच्या वापरावरही भरमसाट खर्च मध्यमवर्गीयांना करावा लागत आहे .
अशा परिस्थीतीत पर्यायी इंधनाचा वापर आणि इंधन बचत अटळ आहे.पर्यायी इंधनाचा ,इंधनाच्या सुयोग्य वापराचे, इंधन बचतीचे मार्ग कोणकोणते आहेत.ज्यांना असे अभिनव उपाय ठाऊक आहेत त्यांनी जरुर मार्गदर्शन करावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही मी म्हणत होतो, नव्या
नाही मी म्हणत होतो, नव्या घराची रचना करतानाच सौर्य उर्जा वापरता येईल, धूर कोंडणार नाही, पावसाचे पाणी साठवता येईल, नैसर्गिक प्रकाश मिळेल, अशी घरे डिझाईन करायला हवीत. ( मुंबईतली सी एम सी ची बिल्डींग, नैसर्गिक प्रकाशाचा पुरेसा वापर होईल, अशी बांधली आहे, असे वाचले होते )
दिनेशदा, + १००००००
दिनेशदा,
+ १००००००
स्वता:चे घर किंवा फार्म हाउस बांधताना तुम्ही म्हणता तशी डिझाईन करणे आवश्यक आहे.
पिंगू ,
पिंगू ,
+१०००००००००००००००० अनुमोदन
आरती ( ARTI : Appropriate Rural Technology Institute ) ह्या विषयावर बरच संशोधन करत आहे.
सरई कुकींग स्टोव्हहा त्यांचाच
दिनेशदा | 21 September, 2012
दिनेशदा | 21 September, 2012 - 09:23
नाही मी म्हणत होतो, नव्या घराची रचना करतानाच सौर्य उर्जा वापरता येईल, धूर कोंडणार नाही, पावसाचे पाणीसाठवता येईल, नैसर्गिक प्रकाश मिळेल, अशी घरे डिझाईन करायला हवीत. ( मुंबईतली सी एम सी ची बिल्डींग, नैसर्गिक प्रकाशाचा पुरेसा वापर होईल, अशी बांधली आहे, असे वाचले होते )>>>>अनुमोदन.
दिनेशदा, सहमत आहे की अशा
दिनेशदा,
सहमत आहे की अशा प्रकारची घरे बनायला हवीत. पण सध्या तरी अशा प्रकारची घरे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात असणे शक्य नाही.
त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या संसाधनांचा योग्य वापर-पुनर्वापर केला, तर ते अधिक फायदेशीर असेल. कारण सध्या तरी शहरी भागात घर घेणे सुद्धा आवाक्याबाहेर होत आहे.
बाकी खेड्यामध्ये सध्या चालू लोडशेडिंगवर सुद्धा अशा प्रकारे उपाय शक्य आहे आणि आरती मध्ये त्यासंबंधी संशोधन झाले आहे.
गरज हि शोधांची जननी आहे, आता
गरज हि शोधांची जननी आहे, आता अशा संशोधनाला चालना मिळेल आणि अशी अनेक उत्पादने पुढे येतील.
वीजेचे भाव वाढल्यावर, गॅस गिझर्स बाजारात आले. आणि आता गॅसचे भाव वाढल्यावर, आणखी उपाय शोधले जातील.
आता शहरभागातही अशी उत्पादने मिळू लागतील. फर्निचर वेस्ट, तर सहज उपलब्ध असते.
खुप पुर्वी दूरदर्शनवर सांजा चूल्हा नावाची मालिका दाखवत असत. पंजाबमधली एक छान पद्धत आहे ती.
अनेक कुटुंबाचा मिळून एकच तंदूर असतो. आपापले पिठ घेऊन जायचे आणि त्यावर रोट्या भाजायच्या.
सहकारी सोसायट्यांमधे आता, असा सहकार करायची वेळ आली आहे.
हल्ली खेड्यातही एलपीजी
हल्ली खेड्यातही एलपीजी वापरणार्याची संख्या वाढली आहे असं माझं मी पाहिलेल्या ४ गावातील निरिक्षण आहे.
चुल हा ऑप्शन असतोच पण एलपीजी देखील आहे आता बर्याच घरात.
झकासराव, खेड्यातही आता जळण
झकासराव, खेड्यातही आता जळण मिळत नाही हे दिनेशदांचे निरीक्षण अगदी बरोबर आहे. झाडे नाहीत त्यामुळे लाकडे नाहीत. जनावरे नाहीत त्यामुळे शेण नाही. जळण शोधायला आख्खा दिवस जातो बायकांचा. मध्ये एक फिल्म , एका गॅस कंपनीने बनवलेली पाहिली. वर म्हटलेल्या सांझा चुल्ह्याची कन्सेप्ट राबवली होती. आदिवासी पाड्यावर सेन्ट्रली एका शेडवजा खोलीत कंपनीतर्फे गॅस सिलिन्डर व शेगड्या.चा संच बसवला होता .कंपनी स्वतः येऊन तिथले सिलिन्डर मोफत भरून/बदलून देत असे तिथे आसपासच्या एरियातल्या बायका येऊन स्वयंपाक करून घेऊन जात. ही सगळी सुविधा कंपनीतर्फे मोफत होती. त्यामुळे जळण शोधण्यासाठी करावयाची वणवण थाम्बली व त्या बायकाना रोजगारासाठी जाणे शक्य होऊ लागले. मुख्य म्हणजे त्यांच्याकडून नाईलाजाने होणारी झाडतोडही लक्ष्णीय रीत्या घटली.
शहरात अगदी सोसायटीत हा उपक्रम राबवला तरीही कोणी जाणार नाही. प्रतिष्ठेच्या कल्पना आणि अगदी अन्नछत्रात गेल्याचा फील येईल लोकाना.(आम्ही काय अॅफोर्ड करू शकत नाही की क्वॉय? असे फणकार्यात म्हणून दरवाढीच्या फेसबूकवरील आंदोलनास पाठिम्बा म्हणून क्लिक करण्यात येईल..:फिदी:)
यापुढे कोणतीही बिल्डींग
यापुढे कोणतीही बिल्डींग बांधताना बिल्डर सुद्धा इनिशिएटिव्ह घेऊन अशा प्लॅन्ट साठी जागा ठेवू शकतो.
@बाजो शहरात अगदी सोसायटीत हा
@बाजो
शहरात अगदी सोसायटीत हा उपक्रम राबवला तरीही कोणी जाणार नाही. प्रतिष्ठेच्या कल्पना आणि अगदी अन्नछत्रात गेल्याचा फील येईल लोकाना.(आम्ही काय अॅफोर्ड करू शकत नाही की क्वॉय? असे फणकार्यात म्हणून दरवाढीच्या फेसबूकवरील आंदोलनास पाठिम्बा म्हणून क्लिक करण्यात येईल..<<
करून तर पहा.
थोडेसे अवांतर पण
थोडेसे अवांतर पण महत्त्वाचे:
http://www.lokprabha.com/20111202/vizvasi.htm
http://www.lokprabha.com/lokprabha/20120302/vidhnyan-din-vishesh09.htm
झकासराव | 24 September, 2012
झकासराव | 24 September, 2012 - 00:17 नवीन
हल्ली खेड्यातही एलपीजी वापरणार्याची संख्या वाढली आहे असं माझं मी पाहिलेल्या ४ गावातील निरिक्षण आहे.
चुल हा ऑप्शन असतोच पण एलपीजी देखील आहे आता बर्याच घरात.>>>>शहरांना आलेली सूज आता गावापर्यंत पोचलेली आहे. दरडोई उर्जेच्या वापरात शहरी ग्रामिण जास्त फरक राहिलेला नाही.
"आरती" च्या कार्यकर्त्यांचे
"आरती" च्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन. तसेच त्या तरुण तरुणींचे पण! अश्या बातम्या ऐकल्या की फार फार बरे वाटते. हाच एक उपाय आहे, छोट्या प्रमाणावर उद्योगधंदे. मग त्यात भ्रष्टाचार, ब्यूरॉक्रसी वगैरे येण्याची शक्यता फार कमी. अधिक संशोधन करायलाहि तिथे वाव आहे.
दुसरी चांगली गोष्ट म्हणजे शिक्षणाचा उपयोग आपल्याच देशाला करणे. उगाच पैशाच्या नादी लागून अमेरिकेत येणे या पेक्षा हे जास्त प्रशंसनीय. मला स्वतःला तर अमेरिकेत येऊन कुणा भारतीय किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तीने काही केले याचा काहीच अभिमान वाटत नाही.
त्या उलट मला या असल्या व्यक्ती, बंग, आमटे, आनंद कुमार (बिहारमधे होतकरू मुलांना पुढे आणण्यासाठी चालू असणारे प्रकल्प) यांच्याबद्दल जास्त आदर आहे. आणखीहि असतीलच, मला आठवत नाहीत. कारण सगळे नुसते वाईटच लिहीतात, चांगले फार क्वचित.
बाकी राजकारण्यांबद्दल एकुणच तिरस्कार आहे. निदान भारतात तरी त्यांच्या नेतृत्वाचा, संपत्तीचा उपयोग अश्या कामांसाठी करण्याची बुद्धी त्यांना होवो, ही प्रार्थना.
एरवी भारतातले भ्रष्टाचार, राजकारणी यांच्याबद्दल वाचून कंटाळा आला. का लिहीतात असे लोक इथे? सर्वांना दिसतेच आहे ते. सर्व जगात असेच चालले आहे. फक्त कुठे चांगले जास्त, वाईट कमी. तर अश्या चांगल्या गोष्टी जास्त घडल्या तर लोक जास्त सुखी होतील.
एक बातमी आताच वाचली आणि तिचा
एक बातमी आताच वाचली आणि तिचा दुवा इथे डकवतोय.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17002655.cms
हा एक किफायतशीर व्यवसाय म्हणून करता येऊ शकतो. मिथेन गॅस प्लांट ही खेड्यांची भविष्यातील उर्जेची गरज पुरवू शकेल.
वा ,छान उपक्रम.
वा ,छान उपक्रम.
पिंगू, छान आणि स्तूत्य आहे हा
पिंगू, छान आणि स्तूत्य आहे हा उपक्रम.
गावोगावी माजलेली जलपर्णी पण यासाठी वापरता आली पाहिजे. पण त्यात काही अडचणी आहेत, असे एकदा वाचले होते.
दिनेशदा, जलपर्णीचा उपयोग पण
दिनेशदा, जलपर्णीचा उपयोग पण इथे करता येईल. फक्त जलपर्णीची गोळा केलेली पाने आणि फांद्या यांचे एकत्र मिश्रण करण्यासाठी ईंडस्ट्रीयल मिक्सर लागेल. ज्यामुळे प्रकल्पाची किंमत १ लाखाने वाढू शकते.
मी डिसेंबर महिन्यात या प्रकल्पाला भेट देण्यासाठी जाणार आहे. तेव्हा यासंदर्भात आणखी माहिती मिळवू शकेन.
बरीच चांगली माहिती मिळाली.
बरीच चांगली माहिती मिळाली.
Mobile आणि Internet सारख्या
Mobile आणि Internet सारख्या फारश्या जरुरी नसणार्या गोष्टी वरचे खर्च कमी करा.
हे जे सहा सिलिंडर मिळतात ते
हे जे सहा सिलिंडर मिळतात ते फक्त केशरी रेशन कार्डवर मिळतात का ? की पांढर्या रेशन कार्डवर पण मिळतात ? की सरसकट सगळ्यांच मिळतात ?
सगळ्यांनाच. काही विशिष्ट
सगळ्यांनाच.
काही विशिष्ट वर्गाच्या(रेशनकार्डावर आधारित) बाबतीत ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय अजून तरी झालेला नाही.
एका घरात एकापेक्षा जास्त नावांनी वेगवेगळी रेशनकार्ड किंवा सिलिंडर्सची खाती शोधण्याची मोहीम चालू होती अशी बातमी होती.
की सरसकट सगळ्यांच मिळतात ? >>
की सरसकट सगळ्यांच मिळतात ? >> सगळ्यांनाच सिलेंडर मिळणार. वर्षाचे सहा सिलेंडर सबसिडाईज्ड दरात मिळणार. नंतर लागले तर बाजारभावाने खरेदी करावे लागणार.
बरं, हे वर्ष कसं मोजत आहेत? मार्च टू फेब की जाने ते डिसें? आम्ही सप्टेंबरमधे गॅस बदली करून घेतला त्या कागदावर अजून तीन सिलेंडर मिळतील असे लिहिले आहे. दोन सिलेंडर तर लगेच ताब्यात घेतले. आता एक संपायला आला आहे.
मिथेन गॅस प्लांट ची भेट
मिथेन गॅस प्लांट ची भेट चांगलीच महागडी असल्याने तूर्तास तेथे जाणेच टाळतोय.
बाकी काही नविन माहिती मिळाल्यास इथे नक्कीच टाकेन.
मिथेन गॅस प्लांट ची भेट
मिथेन गॅस प्लांट ची भेट चांगलीच महागडी असल्याने तूर्तास तेथे जाणेच टाळतोय.>>> का बघायला ते पैसे घेतात का?
ते इंडक्शन कुकटॉप्स बद्दल
ते इंडक्शन कुकटॉप्स बद्दल ऐकतोय. तो चांगला पर्याय आहे का सिलेंडरऐवजी?
अनुभव/माहीती असल्यास कुणी सांगेल तर बरे होईल?
निवांत पाटील, होय. प्रकल्प
निवांत पाटील, होय. प्रकल्प भेट आणि ट्रेनिंग चा खर्च १५,०००/- आहे. जर प्रकल्प प्रत्यक्ष करायचाच असेल, तर १५,०००/- खर्च करायला काही समस्या नाही.
ट्यागो, इंडक्शन कुकटॉप हा
ट्यागो, इंडक्शन कुकटॉप हा स्वंयपाकासाठी परिपूर्ण पर्याय असेल हे मला तरी वाटत नाही. कारण त्याला सुद्धा मावेप्रमाणे काही मर्यादा आहेत.
उदा. इंडक्शन कुकटॉपवर भाकरी भाजता येणे शक्य आहे का? नाही ना.
त्याच्या एवजी, जरा वेगळा विचार करायला हवा.
पाणी गरम करण्यासाठी उपाय
पाणी गरम करण्यासाठी उपाय हवाय.
उन्हात ठेवा
उन्हात ठेवा
झकासराव, इंडक्शन कुकटॉप
झकासराव, इंडक्शन कुकटॉप वापरुन लवकर पाणी गरम करता येते. हा स्वानुभव आहे.
Pages