घरगुती गॅस सिलेँडर आणि डीझेलची दरवाढ......पर्यायी इंधन आणि इंधन बचतीचे सोपे मार्ग...

Submitted by ग्रेटथिंकर v 1.... on 13 September, 2012 - 11:48

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात आता फक्त सहा सिलेंडरवर सबसिडी मिळेल ,सातवा सिलेंडर बाजारभावाने रु ७२० ते रु ७८० च्या दरम्यान मिळणार .याचे मध्यमवर्गीयांवर काय परिणाम होतील?
LPG_gas_cylinder-450x350.jpg

डीझेलची दरवाढही पाच रुपये प्रतिलिटर झाली आहे. इंधन दरवाढ गेले काही सततचीच बाब झाली आहे. वीजेच्या वापरावरही भरमसाट खर्च मध्यमवर्गीयांना करावा लागत आहे .
अशा परिस्थीतीत पर्यायी इंधनाचा वापर आणि इंधन बचत अटळ आहे.पर्यायी इंधनाचा ,इंधनाच्या सुयोग्य वापराचे, इंधन बचतीचे मार्ग कोणकोणते आहेत.ज्यांना असे अभिनव उपाय ठाऊक आहेत त्यांनी जरुर मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक चकाकणारी मेटल शीट घ्या, त्याला पॅराबोलिक शेप द्या .घरी न जमल्यास तयार करुन आणा.उन्हात पॅराबोला ठेऊन, पॅराबोलाच्या फोकल पॉईंटला पाण्याचा कंटेनर ठेवा

एक चकाकणारी मेटल शीट घ्या, त्याला पॅराबोलिक शेप द्या .घरी न जमल्यास तयार करुन आणा.उन्हात पॅराबोला ठेऊन, पॅराबोलाच्या फोकल पॉईंटला पाण्याचा कंटेनर ठेवा.ईमेजमध्ये दाखवलेले बाण जिथे एकत्र येतात तो फोकल पॉइंट, घरच्याघरी असे ठोबळ स्ट्रक्चर बनवावे. फायदा आहे ,फक्त या रिफ्लेक्टरचा त्रास आजुबाजुच्यांना होणार नाही याची काळजी घ्या.

वर्ष जाने ते डिसें असं मोजणार बहुतेक. ६ सिलेंडर सबसिडाईज्ड दरात बाकी बाजारभावाने ९२०/- रूपयांना. गरिब लोकांनी काय करावे? Sad

घरोघरीच्या सेफ्टिक ट्यान्कवर ग्यास प्लान्ट बनवता येतो ना? कुणाला माहित आहे का ते?
खादी ग्रामोद्योगवाले ते डिझाईन पुरवायचे असे ऐकुन आहे. मला डिझाईन जरी मिळाले तरी पुरेसे आहे, बान्धकाम /इन्स्टॉलेशन माझे मी करू शकेन.

आमच्या सोसायटीत पाइप गॅसचे कनेक्शन सुरु होत आहे. सध्या माझ्याकडे डबल बॉट्ल गॅस कनेक्शन आहे.
मला जर पाइप गॅस वापरायचा असेल तर दोन्ही सिलेंडर सरेंडर करावे लागतील का?
आयत्यावेळी सिलेंडर संपण्याचे टेन्शन नाही याव्यतिरिक्त पाइप गॅसचे काय फायदे आहेत?

>> मला जर पाइप गॅस वापरायचा असेल तर दोन्ही सिलेंडर सरेंडर करावे लागतील का?

चिंगीताई, हो. माझ्या एका मित्राने घरी पाईप गॅस घेताना दोन्ही सिलींडर सरेंडर केले. किंबहुना त्याला करावेच लागले.

>>> आयत्यावेळी सिलेंडर संपण्याचे टेन्शन नाही याव्यतिरिक्त पाइप गॅसचे काय फायदे आहेत?

रनटाईम बिल येते. म्हणजे जेवढे वापरणार तेवढे बिल येणार. सणासुदीला गॅस सिलींडर संपायची कटकट नाही आहे पाईपगॅसला..

सबसिडी नसलेला सिलेँडर किती रुपयाला मिळतो? मी ९४० ऐकले आहे ,खरे आहे काय? ८७०चे ९४० कसे झाले?

८७०चे ९४० कसे झाले?>> दर महिन्याला हा दर सरकार घोषित करतं, त्यानुसार बदलतो.

पाईप गॅसच्या बिलिंगचे अजून अस्पष्ट आहे. संपूर्ण सोसायटी/ बिल्डिंग म्हणजे एकच ग्राहक आहे असं आधी जाहीर केलं होतं. त्यामुळे 'ते ६' सिलिंडर एकाच दिवसात संपतात! तस्मात, कमर्शियल गॅसचा दर लागतो. वापर कमी असेल तर हे नेहेमीच्या सिलिंडरपेक्षा महाग पडते. सोसायटी/ बिल्डींगला पाईप गॅस देताना किती अनुदानित सिलिंडर द्यावेत हे अजून ठरत नाहीये. सार्वजनिक कोणतीही वस्तू वापरताना फायदे जसे आहेत, तसेच तोटेही आहेत. आपला वापर कमी असेल, तरी संपूर्ण सोसायटीला गॅस पुरवठा करायचा म्हणजे कमर्शियल दर लागणारच. सिलिंडर संपायची भीती नाही हा एक मुख्य फायदा, तसंच वापर कमी असूनही कमर्शियल दराने खरेदी करण्याचे कम्पल्शन हा एक तोटा.

<पाईप गॅसच्या बिलिंगचे अजून अस्पष्ट आहे. संपूर्ण सोसायटी/ बिल्डिंग म्हणजे एकच ग्राहक आहे असं आधी जाहीर केलं होत<>
कोणत्या कंपनीचा गॅस? महानगर गॅसचा मीटर घराघरात असतो.

मीटर घरात असला तरी ग्राहक आपण इन्डिव्हिज्युअल नाही. ग्राहक ती संपूर्ण सोसायटी/ बिल्डींग. म्हणून ६ अनुदानिन सिलिंडरचा नियम एका सोसायटीला लागू, हरेक ग्राहकाला नाही.

मयेकर,
महानगर मुंबईतच आहे.
पुण्यात काही सोसायट्या मोठा खाजगी रिझर्वॊयर तयार करून त्यायोगे आपापल्या सोसायटीपुरते गॅसवितरण करतात. अरण्येश्वरच्या इथल्या ट्रेझर पार्कमधे ही व्यवस्था आहे. तपशिलात माहित नाही पण हे बर्‍याच सोसायट्यांमधे आहे म्हणजे त्याची काहीतरी सिस्टीम असणारच.

induction heater वापरा, उष्णता वाया जात नाही त्यामुळे वीज जास्त लागत नाही.

पाण्याचा बंब वापरायला चालू केला आहे १५-२० दिवस झालेत. बांधकामा मधे वाया जाणारा लाकूड फाटा इंधन म्हणून वापरतोय.

Pages