3d visualisation : making of rainy night ( बदलुन)

Submitted by मुरारी on 13 December, 2012 - 04:35

लाईफ ऑफ पाय पहिल्यापासून डोके भिरभिरलेले होते .. चायला जमाना कुठे चाललाय आणि मी कुठे . काहीतरी आपण पण हटके ३डी करायचे असे ,मनाशी वाटत होते . अर्थात मी जे नेहमी काम करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे , हटके , जे मला आनंद देईल असे. विचार करत बसलो मग मागे कधीतरी डोक्यात आलेल्या कथेचा प्लॉट आठवला. एक जुनाट हॉटेल ची रूम , भयानक पावसाळी रात्र , एक भयकथा लिहिणारा लेखक..
त्याच लिखाणाच टेबल , काही विन्ग्लीश पुस्तकं पडलेली , त्याच सिगरेट च पाकीट , एका बाहेरगावच्या मित्राने दिलेली आफ्रिकेतली एक भयानक मूर्ती (बहुतेक त्याच्या नवीन कथा संग्रहातल महत्वाच पात्र) , लाईट गेल्याने एक जळणारी मेणबत्ती.. पण अचानक अस काहीतरी घडत आणि त्या मूर्तीचे हावभाव , रंग बदलायला लागतात .. आणि त्याच वेळी भर पावसात एक विकृत , भयाण आकृती खिडकीतून डोकावून जाते .. हो .. त्याच्या हाताचे पंजे त्या धुकट काचेवर स्पष्ट दिसतायेत .. कोण असेल ?

हम्म...

एवढ सगळं लिहायला सोप्प आहे , पण ते तेवढ्या प्रभावी पणे कसे मांडणार? ते वातावरण बघ्ण्यार्याला बघता क्षणी जाणवायला हवं
अस वातावरण कि जे गूढ , अंधार, धुकट. (इतके दिवस चकाचक stores करण्याची सवय होती .)
लाईटिंग आणि तेकश्रिंग महत्वाचे होते . मग नेट वरून पावसाचे बरेच रेफरन्सेस काढले. अंधार्या खोल्या बघितल्या आणि सुरुवात केली .

आधी बेसिक रूम तयार करून घेतली .
मग बाकी गोष्टी हळू हळू add केल्या , टेबल , काही पुस्तकं , एक आफ्रिकन मूर्ती , सिगारेट च पाकीट वेग्रे .

बर्याच प्रयत्नांनी लायटिंग जमलं , आणि इमेज rendar झाली .

पण अशा सिन्स साठी मजबूत "पोस्ट - प्रोडक्शन" लागत, कारण बरेसचे चेंजेस ३डी मध्ये करता येत नाहीत .म्हटलं आपण करण्यापेक्षा या क्षेत्रातला एक्स्पर्ट जो आहे त्याची मदत घेऊ. सौरभ शी बोललो , तो मदतीला तयार झाला , त्याने अवघ्या काही मिनिटात भन्नाट "री - टच" करून सीन पाठवला. आधी काच फक्त धुकट दिसत होती , त्याने त्यावर पाउस दाखवला, हाताचे ठसे दाखवले .. कलर करेक्शन केलं, एकूण सीन ५०% नि इम्प्रुव केला.
एकूण वातावरण जे माझ्या डोक्यात होतं, त्याच्या ८०% तरी मिळवलेल होतं .

फायनल सिन

मागे केलेल्या प्रयोगात काही त्रुटी राहिलेल्या होत्या , त्या परत जमेल तसं सुधारलेल्या आहेत ,
एक क्यामेरा अजून वाढवलाय , आता त्या हॉटेल मधली रूम सुद्धा दिसतेय , एक पडलेली मोडकी खुर्ची , जुनाट भिंती , पडदे .. सिगरेट ची थोटक , वेग्रे काही काही डिटेल अधिक वाढवलेत .

azadf

रेन्दर्स

vbhn

सौरभ ने दणकून एडिटिंग केलंय , त्याचे पेशल आभार .

aax

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलय.

माझ्याकडे जो कूलपिक्स कॅमेरा आहे ( मी वापरत नाही सध्या ) त्यात ३ डी फिचर आहे. त्यात एकाच ऑब्जेक्टचे दोनदा ( कॅमेरा किंचीत हलवून) फोटो घ्यायचे आहेत आणि मग या दोन फ्रेम्सची मिळून एक ३ डी इमेज तयार होणार आहे. पण ती बघायला तसा स्क्रीन पण पाहिजे.

भारी केलय एकदम. ब्याकग्राऊंडला "गुमनाम है कोइ" वाजवायचे.

Pages