3d visualisation : making of rainy night ( बदलुन)

Submitted by प्रसन्न अ on 13 December, 2012 - 04:35

लाईफ ऑफ पाय पहिल्यापासून डोके भिरभिरलेले होते .. चायला जमाना कुठे चाललाय आणि मी कुठे . काहीतरी आपण पण हटके ३डी करायचे असे ,मनाशी वाटत होते . अर्थात मी जे नेहमी काम करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे , हटके , जे मला आनंद देईल असे. विचार करत बसलो मग मागे कधीतरी डोक्यात आलेल्या कथेचा प्लॉट आठवला. एक जुनाट हॉटेल ची रूम , भयानक पावसाळी रात्र , एक भयकथा लिहिणारा लेखक..
त्याच लिखाणाच टेबल , काही विन्ग्लीश पुस्तकं पडलेली , त्याच सिगरेट च पाकीट , एका बाहेरगावच्या मित्राने दिलेली आफ्रिकेतली एक भयानक मूर्ती (बहुतेक त्याच्या नवीन कथा संग्रहातल महत्वाच पात्र) , लाईट गेल्याने एक जळणारी मेणबत्ती.. पण अचानक अस काहीतरी घडत आणि त्या मूर्तीचे हावभाव , रंग बदलायला लागतात .. आणि त्याच वेळी भर पावसात एक विकृत , भयाण आकृती खिडकीतून डोकावून जाते .. हो .. त्याच्या हाताचे पंजे त्या धुकट काचेवर स्पष्ट दिसतायेत .. कोण असेल ?

हम्म...

एवढ सगळं लिहायला सोप्प आहे , पण ते तेवढ्या प्रभावी पणे कसे मांडणार? ते वातावरण बघ्ण्यार्याला बघता क्षणी जाणवायला हवं
अस वातावरण कि जे गूढ , अंधार, धुकट. (इतके दिवस चकाचक stores करण्याची सवय होती .)
लाईटिंग आणि तेकश्रिंग महत्वाचे होते . मग नेट वरून पावसाचे बरेच रेफरन्सेस काढले. अंधार्या खोल्या बघितल्या आणि सुरुवात केली .

आधी बेसिक रूम तयार करून घेतली .
मग बाकी गोष्टी हळू हळू add केल्या , टेबल , काही पुस्तकं , एक आफ्रिकन मूर्ती , सिगारेट च पाकीट वेग्रे .

बर्याच प्रयत्नांनी लायटिंग जमलं , आणि इमेज rendar झाली .

पण अशा सिन्स साठी मजबूत "पोस्ट - प्रोडक्शन" लागत, कारण बरेसचे चेंजेस ३डी मध्ये करता येत नाहीत .म्हटलं आपण करण्यापेक्षा या क्षेत्रातला एक्स्पर्ट जो आहे त्याची मदत घेऊ. सौरभ शी बोललो , तो मदतीला तयार झाला , त्याने अवघ्या काही मिनिटात भन्नाट "री - टच" करून सीन पाठवला. आधी काच फक्त धुकट दिसत होती , त्याने त्यावर पाउस दाखवला, हाताचे ठसे दाखवले .. कलर करेक्शन केलं, एकूण सीन ५०% नि इम्प्रुव केला.
एकूण वातावरण जे माझ्या डोक्यात होतं, त्याच्या ८०% तरी मिळवलेल होतं .

फायनल सिन

मागे केलेल्या प्रयोगात काही त्रुटी राहिलेल्या होत्या , त्या परत जमेल तसं सुधारलेल्या आहेत ,
एक क्यामेरा अजून वाढवलाय , आता त्या हॉटेल मधली रूम सुद्धा दिसतेय , एक पडलेली मोडकी खुर्ची , जुनाट भिंती , पडदे .. सिगरेट ची थोटक , वेग्रे काही काही डिटेल अधिक वाढवलेत .

azadf

रेन्दर्स

vbhn

सौरभ ने दणकून एडिटिंग केलंय , त्याचे पेशल आभार .

aax

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकासरावांसारखं म्हणतो:
खत्तरनाक!

फायनल टचप कशात केलंत?

प्रसन्न, ...

मस्तच जमलय !!

फक्त एक मिस्टीक झालीय, दोन्ही पुस्तकांच्या मागच्या बाजुवर मुखपृष्ठ आलय !

म्हणजे दोन्ही पुस्तके उलट / ऊपडी ठेवली आहेत, असे असेल तर त्यांची मागील बाजू दिसायला हवी होती

पण त्या बाजूला मुखपृष्ठ दिसत आहे,

जर पुस्तकाची शिवण आता असलेल्या डाव्या बाजूला न ठेवता ऊजव्या बाजुला केली तर ते बरोबर होईल !!

@इब्लिस : वापरलेली सोफ्टवेर्स
3 d max 2012
vray 2.0
photoshop cs3

@ डँबिस१ : येस चूक झालीये खरी, निस्तरावी लागेल Wink

@ बाकी लोक्स : मनापासून हाभार Happy

प्रोसेस वाचायला आवडली. Happy (पण काचेवरचे हे हात इतके चिमुकले आहेत, की ते एखाद्या भीतीदायक आकृतीचे असतील असं वाटत नाही.)

शेवटचा फोटोच फक्त टाकला असतास तर 'एका खिडकीचा पावसाळ्या रात्री काढलेला फोटोच' वाटला असता - इतके खरेखुरे वाटतय. अप्रतिम!

वॉव अप्रतिम. एकदम खरे वाटतेय.

दोन्ही पुस्तकांच्या मागच्या बाजुवर मुखपृष्ठ आलय >> भुताचे पुस्तक असल्याने असेल Wink

(पण काचेवरचे हे हात इतके चिमुकले आहेत, की ते एखाद्या भीतीदायक आकृतीचे असतील असं वाटत नाही.)

लोल्स.
हाहा. ते छोट्या मुलीचे/मुलाचे भूत असावे Wink

प्रसन्न एकदम मस्त..... ती आफ्रिकन मुर्ती सर्वात जास्त रहस्यमय वाटत आहे..... तुझी स्वतःची क्रियेटिव्हिटी आहे का की रेफरन्स घेउन तयार केलीस

'व्हिज्युअलायझेशन' ते अंतिम चित्र ह्या प्रवासाच्या आनंदाची झलक जाणवली. अभिनंदन.
कदाचित , अ‍ॅशट्रेमधे जळतानाचं थोटूक दाखवलं असतं तर ' भयकथा लिहीणार्‍या लेखका'चं अस्तित्व सुचवतां आलं असतं !

Pages