ओल्या मटारचं पिठलं

Submitted by अल्पना on 8 December, 2012 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी मटारचे दाणे, एक कांदा, ३-४ लसणीच्या पाकळ्या किंवा थोडीशी लसणीची पात, बेसन, २-३ हिरव्य मिरच्या, फोडणीसाठी तेल, हळद, मीठ, दाण्याचं कुट

क्रमवार पाककृती: 

एका पॅनमध्ये थोड्याश्या तेलावर मटारचे दाणे आणि हिरव्या मिरच्या नीट परतून घ्या. परतलेले मटार आणि मिरच्या ओबडधोबड वाटून घ्या. पिठल्यासाठी तेलाची फोडणी करून त्यात ठेचलेला लसूण किंवा लसणीची पात आणि कांदा परतून घ्या. त्यातच वाटलेले मटार घालून हळद -मीठ दाण्याचं कुट घालून घ्या. हे सगळं नीट परतलं की त्यात पेला-दिड पेला पाणी घालून उकळी आणा. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात बेसन घालून चांगलं हाटून घ्या. पिठलं रटरटेपर्यंत शिजू द्या. हे पिठलं पळीवाढच जास्त चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

हे पिठलं खरंतर मटारपेक्षा तुरीच्या दाण्यांचं किंवा सोलाण्याचं जास्त छान लागतं. मला तुरीचे दाणे आणि सोलाणे मिळत नसल्याने मटार घालून प्रयोग केला तर तोही बरा लागला.

जास्त झणझणित पिठलं हवं असेल तर मिरच्या मटारच्या दाण्यांबरोबर परतून वाटण्याऐवजी लसणीच्या पातीबरोबर वाटून पिठल्यात घालाव्या.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users