रिसेल फ्लॅट विकत घेण्याबद्दल मार्गदर्शन/सल्ला

Submitted by रंगासेठ on 13 January, 2012 - 09:27

नमस्कार

मी पुण्यात रिसेल फ्लॅट विकत घ्यायचं ठरवलय. या संदर्भात आधिक माहिती हवी आहे. माझं बजेट ठरलय आणि त्यानुसार बर्‍यापैकी उपलब्धता आहे. अर्थात मी ही माहिती magicbricks.com, makaan.com, 99acres.com या संकेतस्थळाच्या संदर्भाने सांगतोय. दुसरं म्हणजे ठिकाण/लोकेशन पण काही शॉर्टलिस्ट केली आहेत. त्यामुळे त्याबाबतीतही जास्त शंका नाहीत.

रिसेलच फ्लॅट घेण्याविषयी अनेक धागे वाचलेत पण एकत्रित अशी माहिती मिळाली नाही. परत रिसेल फ्लॅट घेताना काय काळजी घ्यावी हेही सविस्तरपणे कळालं तर बरच होईल. विशेषतः ज्यांनी रिसेलचा फ्लॅट घेतलाय अथवा आपला फ्लॅट विकलाय. मी १-२ फ्लॅट्स पाहिलेत. पण जर या विषयावर आणखी माहिती मिळाली तर उत्तमच.

१) कोणकोणती कागदपत्रे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे? ओसी, NOC, सेल्स डीड इ.
२) या व्यतिरिक्त लागणार्‍या मंजूर्‍या, जसे की सोसायटी कडून, तसेच वीजबील व मालमत्ता कर आपल्या नावे करणे इ.
३) किती जुन्या इमारतींचा विचार करावा? जसे की १२ वर्षं जुनी असल्यास नको त्यापेक्षा जरा नवीन इ.
४) बांधकामाचा दर्जा कसा तपासावा? कारण बांधून जुन्या झालेल्या घराचा दर्जा कसा तपासणार.
५) मी गृहकर्ज घेणार आहे तर बँकांच्या काय अटी असतात?
६) घरात काही रिनोवेशन करायचे असल्यास काय मंजुरी काढाव्या लागतात?
७) प्रॉपर्टी एजंट, वकील व वॅल्युएशन एजंट यांची कशी व कितपत मदत घ्यावी?
८) कार पार्किंग बद्दल देखील काय काळजी घ्यावी कागदपत्रात?
९) या फ्लॅटच्या किंमतीत व्हॅट, स्टँप ड्युटी व इतर काही खर्च पण येतात, त्यांना गृहकर्जात समाविष्ट करता येईल काय?

असे काही प्रश्न आहेत. इथे जर या प्रश्नांची उत्तरे व आधिक माहिती मिळाल्यास आनंदच होईल. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.

एका मित्राकडुन फोन आला की फ्लॅट आहे १८.५ लाखात मिळेल. ज्याची मार्केट प्राईस ३५-४० लाखात आहे. मला फक्त माहीती हवी आहे जर हा व्यवहार केला तर काय धोके आहेत का? आणी काय काळजी घ्यावी? ज्या बँकेने हे डिक्लेर केले आहे त्याच्याकडून च लोन मिळत आहे ६% ने. काय करावे? अजुन फ्लॅट पाहिलेला नाहेये पण लोकेशन प्राईम आहे.

दिपाली अशा व्यवहारांची माहिती नाहिये पण बॅन्केने सर्व टायटल क्लीयर करुन दिले आणि फ्लॅट ओनरकडुन ना हरकत प्रमाणपत्र मिळत असेल तर ठीक आहे. अर्थातच एखादा चांगला वकील सोबत हवा जो पुढे होउ शकणार्‍या कायदेशीर कटकटीतुन आधीच मार्ग काढेल. अन्यथा पुढे बर्‍याच कटकटी होउ शकतील.
लंपन तुला अशा केसेस मध्ये होणार्‍या कायदेशीर कटकटी माहिती असतील तर लिह प्लीज.

मी ज्या तयार घराकरिता home loan घेतले आहे त्याच घराकरिता मला त्याच वेळि home renovation करिता कर्ज मिळेल काय? please मार्गदर्शन करावे...

??

देवकु,
तुमच्या ब्यांकेच्या म्यानेजरशी बोला. कर्ज देणे त्यांच्या हातात असते.
दुसरे म्हणजे, तुम्ही आधीच तुमच्या इन्कमवर लिमिटपर्यंत कर्ज घेतले असेल, तर लगेच दुसरे लोन घेणे थोडे आततायीपणाचे ठरू शकते. कर्ज मिळेल, फक्त अंथरूण पाहून पाय वाली म्हण लक्षात ठेवा.
तुमच्याकडे आधीच पैसे आहेत, पण ब्ल्याक झाकायला कर्ज हवे असेल तर म्यानेजर नक्की देईल कर्ज.

मला त्याच वेळि home renovation करिता कर्ज मिळेल काय? >तुम्ही अर्ज करा. तुमच्या आर्थिक ताळेबंदाचा अंदाज घेउन बॅंक योग्य तो निर्णय घेईल.

मला फक्त माहीती हवी आहे जर हा व्यवहार केला तर काय धोके आहेत का? > नाही. जप्ती आणलेल्या प्लॅटच्या Liquidity साठी बँक जाहिरीती देतात. त्यानुसार बिड करुन लिलावाद्वारे तो प्लॅट घेता येतो. मात्र मार्केट पेक्षा जरा स्वत पडतो.

आणी काय काळजी घ्यावी? > नवी मुंबईतील घणसोली मधे बिल्डरने एकच प्लॅट दोन, तीन जणांना विकलाने एकाच घरावर तीन बँकांची जप्ती आलेली होती.

कॅपिटल गेन टॅक्स किती असतो? तो विकलेल्या प्लॅटच्या पुर्ण रक्कमेवर असतो का?

घर विकल्यावर आलेल्या पैशांतून जर घरच घेतले तर कदाचित त्यावर काहीच टॅक्स नसतो. >>>>+१
घर विकल्यावर पुढील ३ वर्षात घ्यावे लागते.

घर विकल्यावर आलेल्या पैशांतून जर घरच घेतले तर कदाचित त्यावर काहीच टॅक्स नसतो. > माझा प्रश्न असा आहे की मग खरोखर फायदा झाला का? कारण सगळेच पैसे पुन्हा दुसरीकडे गुंतवले जातात शिवाय बरेचदा विकेल्या पैशातून तेवढे पण घर येत नाही. बरेचदा अजून कर्ज काढून मोठे घर घेतले जाते. म्हणजे हे मृगजळा सारखे आहे. मागे एका धाग्यावर मी विचारले होते की खरोखर कोणाला फायदा झाला आहे का? अजून कोणीच उत्तर दिले नाहीये. पूर्वी ज्यांची जमीन होती, वाडे होते त्यांचा झाला फायदा पण आता इन्वेस्टमेंट साठी घर घेणे खरोखर किती फायद्याचे आहे?

कॅपिटल गेन टॅक्स बद्दल खालिल लिंकवर दिलेली माहिती योग्य आहे का? त्या प्रमाणे Indexation Benifit नुसार नफा कमी करुन कर भरणे सोईचे दिसते.

http://www.moneycontrol.com/news/mf-experts/understanding-long-termshort...

कॅपिटल गेन संदर्भात..... इकडे आपण फक्त घर किंवा फ्लॅट बद्दलच बोलुयात. बाकी लॉ समुद्र आहे.

१. कॅ. गे. दोन प्रकारचे असतात. एक लाँग टर्म ( जेंव्हा कुठलेही घर खरेदी केल्या नंतर विकताना ३ वर्षां पेक्षा जास्त काला वधी लोटला आहे) आणि दुसरा शॉर्ट टर्म ( घर विक्री ३ वर्षां पेक्षा कमी कालावधीत)

२. लाँग टर्म असेल टॅ, तुमचे इतर इन्कम कितीही असो ( म्हणजे शुन्य किंवा अगणित) टॅक्स हा २०% लागतो.

३. शॉर्ट टर्म असेल तर जो फायदा होतो तो तुमच्या रेग्युलर टॅक्सेबल इन्कम मधे अ‍ॅड करतात आणि मग जी स्लॅब येइल त्या प्रमाणे टॅक्स लागतो

४. कॅ.गे. म्हणजे विक्री वजा खरेदी ( आफ्टर इन्डेक्सेशन) = झालेला फायदा

५. इन्डेक्सेशन म्हणजे काय? = तुम्ही जेंव्हा घर खरेदी केलेत तेंव्हा जी रक्कम दिलीत ती जर आज द्यायची म्हंटली तर महागाई ( इन्फ्लेशन) मुळे त्याची आजची व्हॅल्यु वेगळी असेल. म्हणुनच तुम्हाला हा बेनेफिट कायद्याने दिलेला आहे. एक उदाहरण घेउ.

खरेदी रक्कम = १०,००,०००
तारीख = एप्रिल २००८
विक्री रक्कम = २५, ००,०००
विक्री तारीख = एप्रिल २०१२

वरील उदा मधे तसे पहायला गेले तर फायदा १५ लाखाचा झालेला आहे. पण ते १५ लाख त्या जुन्या किमती वर होते. महागाइ नुसार त्या घराची खरेदी ची व्हॅल्यु काढायची असेल तर खालील गणित करावे लागेल

खरेदीची रक्कम (भागीले) २००८ चा इन्डेक्स (गुणिले) आजचा इंडेक्स
१०,००,००० / ५८२ * ८५२ = १४,६३,९१७.

ह्याचाच अर्थ टोटल फायदा / कॅगे = २५,००,००० - १४ ६३ ९१७ = १०,३६,०८३

म्हणजेच टॅक्स चे कॅल्क्युलेशन ह्या रकमेवर करायचे आहे १५ लाख ह्या सकृत दर्शनी फायद्यावर नाही.

६. हा इन्डेक्स दर वर्षी आयकर खाते प्रसिध्ध करत असते. साधारण मार्च शेवटी किंवा एप्रिल मधे हे प्रदर्शीत होते

७. तुम्ही जर ३ वर्षाच्या कालावधीत दुसरे घर ( फक्त घरच हां!!! जमिन, व्यावसायिक जागा वगैरे नाही) घेणार असाल तर ह्या फायद्यावर टॅक्स लागत नाही. हे फायद्याचे पैसे तुम्ही बँकेच्या " कॅपिटल गेन अकाउंट" मधे ठेवु शकता. सगळ्या बँका ही सर्वीस देतात. ह्या खात्यावर इंटरेस्ट मिळत नाही. असे केल्यास ३ वर्षात कधीही तुम्ही घर घेवु शकता.
८. घर घ्यायचे नसेल तर?..... तर तुम्ही कॅपिटल गेन बाँड मधे हा फायदा इन्व्हेस्ट करु शकता. हे रोखे सरकारी असतात त्या वर जास्तित जास्त ६ ते ७ % व्याज मिळते. ह्या रोख्यांची बांधेलकी ३ वर्षांची असते.

९. वर म्हंटल्या प्रमाणे "घर खरेदी" म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अ‍ॅग्रीमेंट रजिस्टर करता व तुम्हाला घराचे लॉफुल पझेशन मिळते तो दिवस. ह्यात अनेक श्लेश आहेत. आजकाल मोठ्या शहरात इमारतीला ओ.सी. नसते तरी पझेशन्स असतात. लोकं रहातात. अश्या वेळी आपण अ‍ॅग्रीमेंट करुन नंतर ज्या दिवशी बिल्डर ने पझेशन दिले ती तारीख घ्यावी. बर्‍याचदा हे खपुन जाते.

घर विकल्यावर आलेल्या पैशांतून जर घरच घेतले तर कदाचित त्यावर काहीच टॅक्स नसतो. > माझा प्रश्न असा आहे की मग खरोखर फायदा झाला का? कारण सगळेच पैसे पुन्हा दुसरीकडे गुंतवले जातात शिवाय बरेचदा विकेल्या पैशातून तेवढे पण घर येत नाही. बरेचदा अजून कर्ज काढून मोठे घर घेतले जाते. म्हणजे हे मृगजळा सारखे आहे. मागे एका धाग्यावर मी विचारले होते की खरोखर कोणाला फायदा झाला आहे का? अजून कोणीच उत्तर दिले नाहीये. पूर्वी ज्यांची जमीन होती, वाडे होते त्यांचा झाला फायदा पण आता इन्वेस्टमेंट साठी घर घेणे खरोखर किती फायद्याचे आहे?>>>>

फायदा झालेला असतो म्हणुनच टॅक्स असतो. पैसे दुसरी कडे गुंतवले जातात म्हणजे त्यातुनही फायदाच मिळतो ना? दुसरे घर घेताना तुम्ही अनेक पर्यायांचा उपयोग करु शकता जसे जी एरीया आज देव्हलप नाहिये पण झपाट्याने देव्हलप होते आहे. किंवा लहान घर.

मागे एका धाग्या वर मी लिहिले होते की आज कोणतीही गुंतव्णुक तुम्हाला ८ ते ९ % पेक्षा जास्त फायदा देत नाही. अपवाद फक्त जमिन, घरे, सोने, चांदी आणि शेअर्स.

कोणतीही गुंतवणुक व त्या मधुन एक्झीट ही डोळे उघडे ठेवुन आणि जरा अंदाज घेवुन केलीत तर फायदा हा नक्कीच होतो. अनेक लोक आपलाच पैसा आंधळे पणे गुंतवतात. आणि मग मार्केट ला परिस्थीतीला दोष देतात. पण प्र्त्येक वेळी तसे नसते. आपलाच पैसा आपणच नीट समजुन गुंतवला तर आपल्याला कोणीच फसवु शकत नाही.

धन्यवाद मीरा Happy
अनेक लोक आपलाच पैसा आंधळे पणे गुंतवतात. आणि मग मार्केट ला परिस्थीतीला दोष देतात. > +१

तुम्ही जर ३ वर्षाच्या कालावधीत दुसरे घर घेणार असाल तर ह्या फायद्यावर टॅक्स लागत नाही. > जुने घर २५ लाखाला विकले आणि नविन घराची खरेदी किंमत १५ लाख असेल तर त्या व्यवहारातील उरलेल्या फायद्याच्या १० लाखावर २०% टॅक्स भरावा लागेल का? तस असेल तर त्या १० लाखा वर Indexation Benifit लागू होत का?

जुने घर २५ लाखाला विकले आणि नविन घराची खरेदी किंमत १५ लाख असेल तर त्या व्यवहारातील उरलेल्या फायद्याच्या १० लाखावर २०% टॅक्स भरावा लागेल का? तस असेल तर त्या १० लाखा वर Indexation Benifit लागू होत का?>>>>

हा एक गैर समज आहे की सेल ची पुर्ण रक्कम नव्या घरात गुंतवली पाहिजे. कायदा म्हणतो की "फायदा/कॅगे" नव्या घरात गुंतवा. सेल ची रक्कम नाही. तुम्ही वर दिलेल्या उदा मधे घर २५ लाखाला विकले पण फायदा किती झाला? माझेच वरचे उदा घेतले तर कॅगे १० लाख झाला. नव्या घराची रक्कम १५ लाख आहे मग नो टॅक्स..... नव्या घराची रक्कम जर कॅगे पेक्षा कमी असेल तर आणि तरच टॅक्स भरायला लागतो.

मोकिमी,
हे असले सल्ले देण्यासाठी सीए लोक्क्ष पैसे घेतात हो, अन तरीही नीट सांगत नाहीत Sad
मनःपूर्वक धन्यवाद, उत्तम व खरा सल्ला, तोही विनामूल्य इथे टंकण्याचे कष्ट घेतल्याबद्दल!

इब्लिस +१ या महत्वपुर्ण माहिती बद्दल मीरादेवींचे खुप खुप आभार. Happy

नव्या घराची रक्कम जर कॅगे पेक्षा कमी असेल तर आणि तरच टॅक्स भरायला लागतो. > ह्ह्म्म्म म्हणजे कॅगे १० आहे... पण नविन घर घेतानाचा व्यवहार ६०-४० असल्याने ४०% फायद्यावर कॅगेटॅ भरावाच लागणार.

हे असले सल्ले देण्यासाठी सीए लोक्क्ष पैसे घेतात हो, अन तरीही नीट सांगत नाहीत
मनःपूर्वक धन्यवाद, उत्तम व खरा सल्ला, तोही विनामूल्य इथे टंकण्याचे कष्ट घेतल्याबद्दल!>>>

हा अवेअरनेस आहे. माझे जे ज्ञान आहे त्याचा कोणाला उपयोग होत असेल तर मला आनंदच आहे. कारण माझा माझ्या ज्ञानावर पुर्ण विश्वास आहे त्या मुळे पैसे तर मिळणारच !!!!

आणि माझ्या सीए बंधुं बद्दल मी काय सांगु ?

रीसेल फ्लॅट घेतल्यावर ओनर च्या नावावर असलेले इलेक्ट्रिसीटी मीटर आपल्या नावावर करून घेण्यासाठी काय करावे लागते? कोणते डोक्युमेन्ट्स लागतात? ठीकाण : नवीमुंबई/ खारगर

Pages