रिसेल फ्लॅट विकत घेण्याबद्दल मार्गदर्शन/सल्ला

Submitted by रंगासेठ on 13 January, 2012 - 09:27

नमस्कार

मी पुण्यात रिसेल फ्लॅट विकत घ्यायचं ठरवलय. या संदर्भात आधिक माहिती हवी आहे. माझं बजेट ठरलय आणि त्यानुसार बर्‍यापैकी उपलब्धता आहे. अर्थात मी ही माहिती magicbricks.com, makaan.com, 99acres.com या संकेतस्थळाच्या संदर्भाने सांगतोय. दुसरं म्हणजे ठिकाण/लोकेशन पण काही शॉर्टलिस्ट केली आहेत. त्यामुळे त्याबाबतीतही जास्त शंका नाहीत.

रिसेलच फ्लॅट घेण्याविषयी अनेक धागे वाचलेत पण एकत्रित अशी माहिती मिळाली नाही. परत रिसेल फ्लॅट घेताना काय काळजी घ्यावी हेही सविस्तरपणे कळालं तर बरच होईल. विशेषतः ज्यांनी रिसेलचा फ्लॅट घेतलाय अथवा आपला फ्लॅट विकलाय. मी १-२ फ्लॅट्स पाहिलेत. पण जर या विषयावर आणखी माहिती मिळाली तर उत्तमच.

१) कोणकोणती कागदपत्रे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे? ओसी, NOC, सेल्स डीड इ.
२) या व्यतिरिक्त लागणार्‍या मंजूर्‍या, जसे की सोसायटी कडून, तसेच वीजबील व मालमत्ता कर आपल्या नावे करणे इ.
३) किती जुन्या इमारतींचा विचार करावा? जसे की १२ वर्षं जुनी असल्यास नको त्यापेक्षा जरा नवीन इ.
४) बांधकामाचा दर्जा कसा तपासावा? कारण बांधून जुन्या झालेल्या घराचा दर्जा कसा तपासणार.
५) मी गृहकर्ज घेणार आहे तर बँकांच्या काय अटी असतात?
६) घरात काही रिनोवेशन करायचे असल्यास काय मंजुरी काढाव्या लागतात?
७) प्रॉपर्टी एजंट, वकील व वॅल्युएशन एजंट यांची कशी व कितपत मदत घ्यावी?
८) कार पार्किंग बद्दल देखील काय काळजी घ्यावी कागदपत्रात?
९) या फ्लॅटच्या किंमतीत व्हॅट, स्टँप ड्युटी व इतर काही खर्च पण येतात, त्यांना गृहकर्जात समाविष्ट करता येईल काय?

असे काही प्रश्न आहेत. इथे जर या प्रश्नांची उत्तरे व आधिक माहिती मिळाल्यास आनंदच होईल. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एलेक्ट्रीसिटी दिपार्ट्मेंट मधे फॉर्म्स मिळतात ट्रान्स्फर चे. त्या वर तुमचे डिटेल्स व जुन्या मालकाची सही, मागील पेड बिल, सोसायटिचे एन.ओ.सी लागतात. अजुनही काही कागद पत्रे ( जसे फोटो आय डी) असतिल तर तिकडे माहिती मिळेल.

रुटिन आहे. ८-१५ दिवसात होवुन जाते.

लाईट मीटर ट्रान्सफर खरे तर अगदी सोपे आहे.. पण सरकारी कारभार असल्याने फार किटकीट आहे...
वर मोकीमी ने लिहीले आहेच.. पण त्याच बरोबर तुम्ही किती वीज वापरता ते बघाण्यासाठी कोणी तरी लाईट कॉन्ट्रॅक्टर लागतो.. तो अर्थातच मंडळाच्या ऑफिसातच असतो कारण त्याच्याकडेच काम असते... त्यानी सही शिक्का दिला की मग काम पुढे जाते..

तसेच अर्ज भरल्यावर एक बील आधीच्याच नावाने येऊन पुढच्या वेळचे बील तुमच्या नावाने येईल..

मी २०१२ ऑगस्ट मधे फ्लॅट बुक केला. आज बिल्डरचा फोन आला की सर्वीस टॅक्स आधी मागील वर्षात २.६ % होता व बदललेल्या नियमाप्रमाणे नवीन वर्षात तो ३.२ झालाय तर फरकाचे पैसे लवकरात लवकर द्या...हे बरोबर आहे का? रिसिट वगैरे सगळे नीट मिळेल असे म्हणला.

अजून एक प्रश्न आहे. ज्या व्यक्तीकडून फ्लॅट विकत घेतोय त्याचे चालू लोन (फ्लॅटवरील) आपल्या नावावर वळवता येते असे ऐकले आहे. ते वाढवता येणे शक्य असते का? अशा डिल मधे नेमकं काय काय करावं लागतं?

Sheroff Soleno Baner- Mahulange road मध्ये कोनाचा flat अहे का?
konala tya badal kahi mahiti ahe ka?
I am booking there resale flat ( 4 yr old building). I want to know resale rate in this area.
Also, any other information related with this? Please share.

I have serach on internet no review is found for this scheme.

Please guide/

Completion Certificate:
I am purchasing resale property ( 5 yr. old) , all documetns are clear except completion certifcate.

Building is constructed under town ship planning ( collector approval). as per builder information till 2011 there is no need of completion certifcate for building under town ship planning. therfore he has applied after 2011 only and as per documents shown by him shows that completion committed has visited that site done some measurment, however till yet he has not received the completion certicate.

as per my Lawyer : completion certifcate is indicating that building (my flat) is constructed as per sancationed plan. he checked that he will ok about it. therfore he has given green signal.
I heard for peoples in society that in scheme there r some row house for that there is some issue related with completion certificate therfore entire scheme completion certificate is pending.
For the scheme builder has got revised NA order for some modification therfore builder is quoted that it means existing construction (building) is approved one.

if anyone some information or some expert in this field pl. guide.

उत्तम धागा!

आता हा धागा सापडलाय तेव्हा माझा प्रश्न विचारून टाकते, आणि मग निवांत पहिल्यापासून वाचते. Happy

आई/बहिण/भावाच्या नावावर असलेले घर मुलगा/भाऊ/बहिण होमलोन घेऊन विकत घेऊ शकत नाही, असा आरबीआयचा नॉर्म आहे. असा नॉर्म सेट करण्यामागे कारण काय असावे?

म्हणजे जर फसवा-फसवी करायची म्हटली तरी ती शक्य नाहीये, कारण बँकेतून रितसर होमलोन घेत आहोत. २० लाखाचे घर जर कुटुंबीयांनी मिळून ५० लाखाला आपांपसात विकायचे-विकत घ्यायचे ठरवले तरी, बँक अशा व्यवहाराला परवानगी(खरं तर होमलोन) देणार नाही. मग अशा नॉर्मची गरज काय?

धारा, या आरबीआय नॉर्मची लिंक देउ शकाल काय?

को ओनरशीप बद्दलचे लॉजिक इथे सापडले. अर्थात हे आरबीय रुल प्रमाणे आहे का ते माहित नाही आणि तो तुमचा प्रश्नही नाही.

http://www.itrust.in/content/home-loan/FAQs-India#2

I intend to co-own, the property with my brother, sister, father, mother. Will I be eligible for a loan?

You would not be eligible for a loan as most home loan lenders allow only immediate relatives to co-own a property. This means that a parents-son combination and a husband-wife combination is only allowed. The reason for this restriction is that if some dispute arises between the joint borrowers, their incomes might not be pooled any longer and there might be a problem in repaying the loan to the bank.

को-ओनरशिपचे लॉजिक समजू शकते पण ब्लड रिलेशनमध्ये प्रॉपर्टी घेताना होमलोन न देण्याचा नॉर्म पूर्णपणे चुकीचा आहे.... पण थोडे पुश केल्यावर काही बॅन्का हे लोन देतात कारण तसा काही hard & fast रुल नाहीये

स्वाती आणि स्वरूप, धन्यवाद.
मला पण तो आरबीआयचा नॉर्म ऑनलाईन कुठे सापडला नाही. पण जवळ जवळ सर्व प्रमुख बॅंकांनी हेच कारण देत गृहकर्ज नाकारलेय. Sad

याशिवाय, वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्‍या(करंट अ‍ॅड्रेस वेगवेगळे असलेल्या) सख्ख्या बहिण-भावांना एकाच प्रॉपर्टीसाठी एकत्र गृहकर्ज घेता येत नाही, हेही नव्याने कळाले.

धारा,
आई/बहिण/भावाच्या नावावर असलेले घर मुलगा/भाऊ/बहिण यांनी विकत घेण्यासाठी बर्‍याचश्या बँकां होमलोन द्यायला नकार देतात तरीही इंडिया बुल्स, LIC housing finanace, HDFC यांनी अशी लोन्स दिलेली माझ्या माहितीत आहेत!

माझा एक प्रश्न:
रीसेल फ्लॅट विकताना जर सोसायटी फॉर्म झालेली नसेल तर बिल्डरकडून NOC घ्यावे लागते.... बिल्डर त्यासाठी काही पैसे मागू शकतो का?.... असा काही नियम आहे का?

स्वरूप, LIC ने नाही म्हटलंय. HDFCच्या एका एजंटने हो आणि एकाने नाही असं म्हणून एकमेकांशीच भांडण सुरू केलं आणि वरून लोन होणार नाही किंवा होईलच, याची गॅरंटी देत नव्हते. मग त्यांना आम्हीही वैतागलो. इंडिया बुल्सला अजून विचारलं नाहीये. विचारून बघते. धन्यवाद.

रीसेल फ्लॅट विकताना जर सोसायटी फॉर्म झालेली नसेल तर बिल्डरकडून NOC घ्यावे लागते.... बिल्डर त्यासाठी काही पैसे मागू शकतो का?.... असा काही नियम आहे का? >>>> माझ्या माहितीप्रमाणे असा नियम नाहीये, पण बिल्डर लोकं (विशेषतः छोटे बिल्डर्स) पैसे मागतात. अडला हरी म्हणत एरवी लोकं पण त्यांना पैसे देताना पाहिलेय.

रीसेल फ्लॅटचे सेल डीड, सर्च रिपोर्ट आणि इतर लीगल फॉरर्मेलिटी करणारा सिंहगड रोड परीसरातला कोणी वकील माहित आहे का?

>>HDFCच्या एका एजंटने हो आणि एकाने नाही असं म्हणून एकमेकांशीच भांडण सुरू केलं आणि वरून लोन होणार नाही किंवा होईलच, याची गॅरंटी देत नव्हते.

धारा,
तुम्हाला याबाबतीत काही मदत पाहिजे असेल तर मी करु शकतो
व्यवहार जेन्युअन असेल आणि सगळी डॉक्युमेंट्स क्लीअर असतील तर असे काम करुन देणारा एचडीएफसीचा एक एजंट माझ्या माहितीचा आहे.

आम्ही २००७ मध्ये एक रिसेल flat विकत घेतला. विकत घेताना agreement of sale केले होते . sale deed केले नाही.बिल्डींग ची सोसायटी रजिस्टर केलेली आहे. बिल्डींग २५ वर्षे जुनी आहे .(१९९५मध्ये बांधलेली) . आता आम्ही हा flat विकायला काढलाय. नवीन खरेदीदाराला बँकने लोन साठी sale deed असणे आवश्यक आहे सांगितल आहे.
न वीन खरेदीदाराच्या नावे sale deed करण्यासाठी बिल्डर ची सही / परवानगीआवश्यक असते का ?

आमच्या बिल्डिंग मध्ये एक 2 bhk फ्लॅट घ्यायचे ठरवत आहे.
तर रिसेल फ्लॅट घेताना काय काय चेक करायचे असते प्लिज सांगाल का?
तसेच, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस किती भरावी लागेल तेही सांगा प्लिज

मी कमीत कमी खालील कागदपत्रे आवर्जुन बघतो.

१. बिल्डर कडून ज्याने पहिल्यांदा फ्लॅट घेतला त्या agreement पासून पुढची सगळी agreement+Registration receipt+Index II

२. फ्लॅट वर कर्ज घेतले होते का? घेतलेले आहे का? काही ड्यू आहे का ? नसल्यास No dues certificate.

३. फ्लॅट मॉर्ट्गेज केलाय का? केला होता का? त्याचे Release deed

४. Society conveyance deed

6. Deed of Assignment from society to owner

7. Possession Letter

8. Share Certificate

9. Property tax paid receipt

10. Latest Society's maintenance dues receipt

11. Latest MSEB electricity bill paid

12. No dues certificate from society

13. NOC from society for the sale

अतरंगी, थँक्स

फ्लॅट आमच्या सोसायटी मधलाच आहे, हा अजुन एक अधीकचा घ्यायचा आहे कारण लोकेशन चांगले आहे, सोसायटी, बांधकाम चांगली आहे.
पण विकणारा घाई करतोय, नाहीतर दुसर्याला देईल म्हणे.

स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस किती भरावी लागेल तेही सांगा प्लिज >> हे पण सांगा प्लिज.

Pages