२ इन १ पाककृती : व्हेज स्पगेटी केक आणि व्हेजी फ्रिटाटा चे दोन प्रकार

Submitted by लाजो on 30 November, 2012 - 07:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

स्पगेटी केकः

४ अंडी
उकडलेली स्पगेटी / नुडल्स - साधारण एक ते दीड कप
कांदा, लसुण आवडीच्या भाज्या तुकडे करुन किंवा चिकन चे तुकडे
किसलेले चीझ
चमचाभर मैदा / कॉर्नफ्लार
मिठ, मिरेपूड, इटालियन हर्ब्ज किंवा हिरवे तिखट चवीनुसार
थोडे दूध

spcake01.JPGफ्रिटाटा १ आणि फ्रिटाटा २:

साहित्य वरिल प्रमाणेच फक्त स्पगेटी/नुडल्स नाहित आणि ६ अंडी वापरायची.

fritata1.jpg

क्रमवार पाककृती: 

दोन्ही अत्यंत सोप्पे प्रकार. वन डिश मिल्स Happy

स्पगेटी केकः

१. स्पगेटी शिजवुन घ्या. अगदी गचगचित शिजवायची नाही. शिजली की चाळणीत घालुन पाणी काढुन टाका आणि थंड पाण्याखाली एकदा धुवुन घ्या.

२. अंडी, मिठ, दूध, मिरेपूड, हर्ब्ज आणि मैदा घालुन फेटुन घ्या. चिझ घालणार असाल तर थोडे या मिश्रणात घाला.

३. बारीक चिरलेल्या भाज्या, स्पगेटी आणि अंड्याचे मिश्रण एकत्र करा.

spcake02.JPG

४. बेकिंग डिश / खोलगट तवा / केक टीन ला तेलाचा/बटरचा हात लावुन घ्या आणि त्यात हे मिश्रण ओता. वरतुन किसलेले चिझ पसरा.

spcake03.JPG

५. १८० डिग्री से ला बेक करा. तव्यावर करणार असाल तर मंद आचेवर एका बाजुने भाजुन घ्या आणि मग बाजु पलटुन मग त्यावर चीझ घाला आणि मग दुसरी बाजु भाजुन घ्या.

spcake04.JPG

६. ओव्हन मधुन बाहेर काढल्यावर थोडा वेळ थांबा आणि मग तुकडे कापा. सॅलॅड आणि सॉस बरोबर सर्व्ह करा. हवा तर सोबत गार्लिक ब्रेड ही खा Happy

spcake05.JPGspcake06.JPG

---------

फ्रिटाटा १: मिक्स्ड व्हेज फ्रिटाटा:

१. तव्यावर थोडे बटर्/तेल घालुन कांदा, लसुण ट्रान्स्परंट होईतो परता.

२. यात बारिक चिरलेल्या भाज्या घालुन अर्धवट शिजेपर्यंत परता.

३. भाज्या थोड्या थंड झाल्या की यात अंडी, मिठ, दूध, मिरेपूड, हर्ब्ज आणि मैदा घालुन फेटलेले मिश्रण घाला चिझ घालणार असाल तर थोडे या मिश्रणात घाला.

fritata2.jpg

बाकी कृती जवळजवळ वरील प्रमाणेच.

fritata3.jpgfritata6.jpgfritata5.jpg

---------

फ्रिटाटा २: कॅरॅमलाईज्ड ऑनियन फ्रिटाटा:

आज परत केला होता फ्रिटाटा. या वेळेस जरा वेगळ्याप्रकारे केला.

१. कांदे चिरुन कॅरमलाईज केले.

२. भाज्या (कॉलिफ्लावर, किसलेले गाजर, पालक) चिरुन त्यात चीझ मिक्स केले आणि ते बेकिंग डिश मधे घातले.

Fritata01.JPG

३. अंडी + फ्रेश रेड रोस्ट पेपर्स + फ्रेश इटालियन हर्ब सॉस+ दूध + मिठ + मैदा एकत्र फेटुन घेतले आणि मग भाज्यांवर ओतले. त्यावर कॅरॅमलाईज्ड कांदे पसरले आणि मग वरतुन चिझ पसरले आणि बेक केले Happy

Fritata02.JPGFritata04.JPGFritata03.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांना भरपूर
अधिक टिपा: 

- याला पक्के प्रमाण असे नाही. भाज्या आणि स्पगेटी/नुडक्स असतिल त्याप्रमाणे अंडी कमी जास्त घेता येतिल.
- कुठल्याही भाज्या, हर्ब्ज वापरता येतिल. स्पगेटी केक मधे मी पालक, ब्रोकोली आणि मटार घातलेत आणि पेस्टो वापरलाय. फ्रिटाटा मधे लाल, हिरव्या ढब्बु मिरच्या, पालक, झुकिनी, गाजर इ इ घातेल आहे.
- ओव्हनमधे बेक करताना थोडावेळ वर अ‍ॅल्युमिनीयम फॉईल लाऊन बेक करा आणि मग फॉईल काढुन टाका. असे केल्याने आतली अंडी शिजेपर्यंत टॉप जास्त खरपूस होणार नाही.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फ्रिटाटा अस्सच करते Happy
स्पगेटी केक ची आयडिया भारी आहे. नक्की करीन एकदा डिनरला म्हणजे दुसरे दिवशी लंच ला पण देता येइल.

लाजो, काय सुरेख फोटोज आणि दोन्ही पाककृती एकदम मस्त ! फ्रिटाटा तर अगदी प्रोफेशनल कार्यक्रमात दाखवतील तसा दिसतोय.

भारी Happy

धन्यवाद मंडळी Happy

स्पगेटी केक / फ्रिटाटा दुसृया दिवशीही चांगले लागतात. मी उरलेल्या फ्रिटाटा चे सॅलड इ इ घालुन सँडविच बनवते दुसर्‍यादिवशीच्या लंच साठी.

नंदिनी, नेहमीच्या केक सारखेच फ्रिटाटा/केक झालाय की नाही हे स्युअर्/सुरी भोसकुन बघायचे Happy फ्रिटाटा साधारण २५ मिनीटात होतो, स्पगेटी केक ला जरा जास्त वेळ लागतो.

आवडले हे पण...
माझी यादी वाढतच चाललीये.. मी आतापासुनच उपवास सुरु केलाय.. तु आल्यावरच सोडणार Proud

Pages