निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो शंख भारीच आहे. तो प्राणी आत गेल्यावर फोटो काढला नाही का? आकार केवढा होता त्याचा?
असले काहि जपूनच हाताळायला पाहिजे. >>>> जो - मीच फोटो काढलाय तो - त्याला अज्जिबात हात न लावता -हा प्राणी नीट पाहिलास तर शंखाबाहेरच आहे तो सगळा, मला शंका आहे की तो शंखात जाऊ शकेल. शंख इथे तरी बेस सारखा होता. छोट्या मुलाच्या ओंजळीएवढा असेल - तिथली स्थानिक मंडळी त्याला "खुबा" असे काही म्हणत होती.त्या मंडळींच्या म्हणण्यानुसार तो विषारी नाही - पण मी काही हात लावायचे डेअरिंग केले नाही - अशा अनोळखी प्राण्याची जबरदस्त अ‍ॅलर्जी येऊ शकते हे मला ऐकून माहित आहे. तो प्राणी बहुधा जिवंत नसावा - काहीच हालचाल नव्हती - समुद्रकिनार्‍यावर येऊन पडलेला होता.

शोभा, कुठे गायब होती ? दौरा कि काय ?>>>>>>>>दिनेशदा, आधी कामात होते. दिवाळीची ८ दिवस सुट्टी होती. पण ऊस आंदोलकांमुळे, सांगली सातारा, कोल्हापूर, पंढरपूर, येथे जाणार्‍या सगळ्या एसटी गाड्या बंद होत्या. त्यामुळे, नाईलाजाने ८ दिवस घरातच काढले. माझ्यासारखा भटक्या मुलीला, कधी नव्हे ती ८ दिवस सुट्टी मिळाली, पण स्वारगेटला जाऊन परत यावं लागलं. Sad

तो प्राणी बहुधा जिवंत नसावा - काहीच हालचाल नव्हती - समुद्रकिनार्‍यावर येऊन पडलेला होता.>>>>>>>>>>पण तो परत शंखात गेला ना? केवढा मोठ्ठा आहे ना तो? Happy

तो जीव चुकून किनार्‍यावर आला, तो जिवंत आहे तोपर्यंत भरतीची लाट आली तरच तो पाण्यात जाऊ शकेल, नाहीतर त्याचा अंत अटळ आहे.

काल जागूच्याच एका बीबी वर शेलफिश बद्दल प्रश्न होता. बहुपेशीय जीवांना, खासकरुन ज्यांचा आकार मोठा आहे, त्यांना शरीराला आधार म्हणून एक सांगाडा लागतोच. आपल्यासारख्या पृष्ठवंशीय प्राण्यांना तो शरीराच्या आतून असतो, तर शेलफिशना तो बाहेरून असतो, एवढेच.

( थोडे विषयांतर, जयपूर घराण्याचे गायक असे मानतात के सूर हे रागांचे सांगाडे आहेत, त्यामूळे ते सरगम गात नाहीत. )

तारापोरवाला, अजून असावे. पण जगभरातील पाण्याखालचे जीवन दाखवणारी संग्रहालये, तंत्रात इतकी पुढे गेली आहेत, कि ते आता जूनाट वाटेल.
ज्यांना पाण्याखालचे प्रत्यक्ष बघायचे आहे त्यांच्यासाठी मालवण / गोवा या ठिकाणी चांगल्या सोयी आहेत. ( पण अंग भिजवावेच लागणार. )

शोभा, ऊस आंदोलनाचा असाही परीणाम तर !!

गोव्यात मोठ्या शिंपल्यांना खुबे म्हणतात.. आकारावरुन त्यांचे खुप प्रकार आणि नावे आहेत. पण तिथला खुबा, हा नाही. तिथे खुबा, खातात.
हात लावल्यासही अपाय करेल असा समुद्री जीव म्हणजे जेलीफिश. ( त्याला मात्र शंख वा काटे नसतात ) अगदी लिबलिबीत असतो, पण नूसता स्पर्शही घातक ठरू शकतो.

हात लावल्यासही अपाय करेल असा समुद्री जीव म्हणजे जेलीफिश. ( त्याला मात्र शंख वा काटे नसतात ) अगदी लिबलिबीत असतो, पण नूसता स्पर्शही घातक ठरू शकतो. >>>>> येस्स दिनेशदा - माझा एक मित्र कोकणात ट्रिपला गेला असताना त्याच्या मिसेसच्या पायाला एका जेली फिशचा स्पर्श झाला तेव्हा लगेच अँटीहिस्टामाईनचे इंजेक्शन उपलब्ध होते (जवळच्याच डॉ कडे) म्हणून जीव वाचला तिचा..... प्रचंड अ‍ॅलर्जीक असतात हे जेलीफिश... अगदी जीवघातक....

हे जेलीफिश, बहुदा पारदर्शक असतात. पाण्यात काय जमिनीवर ( रेतीत ) पण नीट दिसत नाहीत. त्यांना सहज दिसेल असा कुठला, अवयवही नसतो. पण निसर्गाने त्यांना एक स्वसंरक्षणार्थ हत्यार दिलेले आहे.

पण ते बहुदा उष्ण तपमानाच्या पाण्यात जास्त दिसतात. गोवा, मस्कत, दुबई.. इथे उन्हाळ्यात पाण्याचे तपमान खुपच वाढलेले असते, त्या वेळी लाखोच्या संख्येत ते दिसतात.

तो शंखातला किडा कसला भारी दिसतोय! एवढा मोठा किडा कसा काय मावला पण? - आर्याचा प्रश्न

दिनेशदांचे उत्तर -
काल जागूच्याच एका बीबी वर शेलफिश बद्दल प्रश्न होता. बहुपेशीय जीवांना, खासकरुन ज्यांचा आकार मोठा आहे, त्यांना शरीराला आधार म्हणून एक सांगाडा लागतोच. आपल्यासारख्या पृष्ठवंशीय प्राण्यांना तो शरीराच्या आतून असतो, तर शेलफिशना तो बाहेरून असतो, एवढेच.

एखाद्या लोकरीच्या गुंड्याची लोकर सुटावी तसा दिसत होता तो जीव. बहुतेक सगळ्या धाग्यांना परत स्वतःमध्ये गुंडाळुन ढकलत ढकलत शंखाबाहेर आला असेल, आणी मग तसाच आत गेला असेल.:फिदी:

मी ही तेच लिहीणार आधी की काही समुद्री जीव विषारी असु शकतात, माहीत नसेल तर घातक ठरु शकते.

कळीत गुलाबाचे फूल, किंवा कवचात कासव मावते तसेच.. आपल्याला तशी शक्ती असती, तर सीतामाईला, दे माय धरणी ठाय... असे करावे लागले नसते !

आम्ही दिवेआगारच्या समुद्रकिनार्‍यावर शंखातला जो प्राणी पाहिला त्यासंदर्भात -

<<<हे काय आहे? दिवेआगरच्या समुद्र किनार्‍यावर दिसलं. एका शंखात हे होतं. आम्ही ते घेऊन खोलीवर आलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांना विचारलं. पण ते सांगू शकले नाहीत. आणि काही वेळाने ते जे काय होतं ना ते चक्क परत त्या शंखात गेलं.. >>>
( हे मत शांकलीचे आहे, माझ्या मतानुसार तो प्राणी त्या शंखात मावणे शक्यच नव्हते - त्याला इतर कुठल्या पक्ष्याने / प्राण्याने पळवले असणार - त्यामुळे नंतर फक्त शंखच दिसत होता - शशांक.)

शशांक, आतले प्राणी शंखात मावेनासे झाले कि दुसर्‍यांचे शंख किंवा रिकामे झालेले शंख जबरदस्तीने ताब्यात घेतात. त्या शंखाची वळणे अशी असतात, कि एखाद्या पक्ष्याला, चोच आत घालून, तो प्राणी मटकावणे शक्य होत नाही. कावळ्यासारखे काही पक्षी, शंख फोडण्याचा, ( दगडावर आपटून ) प्रयत्न करतात. त्यामूळे असे जीव, शक्य तितक्या कमी वेळात, असा शंख बदल करतात.

न्यू झीलंडच्या समुद्रकिनार्‍यावर एक पक्षी दिसतो, खडकाखालचे कृमी मटकावण्यासाठी, त्याची चोच एका बाजूला वळलेली असते. अशी वाकडी चोच असणारा तो एकमेव पक्षी. सर्व पक्ष्यांची चोच, उजव्या बाजूलाच वळलेली असते.

शशांकजी हे पहा खुबे - http://www.maayboli.com/node/22575
हे खुबे खाडीतील चिखलातले आहेत. हे शिजवलेले आहेत त्यामुळे मिटलेल्या अवस्थेत आहेत. पण काही काही खुबे तुम्ही दाखवलेल्या चित्रासारखे कधी कधी काही प्रमाणात दिसतात.

उत्तम अनुवाद ह्या दि. अ. मधे निगप्रेमी मारुती चितमपल्लींनी एका चिनी कथेचा अनुवाद केला आहे. मारुती चितमपल्लींचे नवीन काही वाचले नाही इतक्यात चांदण चकव्या नंतर.

बागेत चितमपल्ली कुठुन आले? त्यांचे साहित्य परीचीत आहे, पण बाफ चुकला का बी? Uhoh

आणी कुठल्या अनुवादाबद्दल इथे चर्चा चालू आहे?:अओ:

सुदुपार मंडळी !
ही कडुलिंबासारखीच पण थोडी वेगळी असलेली झाडे, याला गावाकडॅ 'लिंबारी' अस म्हणतात,काही 'गर्ड' (कारण माहित नाही) अस म्हणताना ऐकलं आहे,ही झाडे (सरळ आणि उभी) ऊंच वाढतात, पानमळ्यात याच प्रकारच्या कडुलिंबची लागवड केली जाते.
DSCN0115.JPG
याची दोन झाडे वाढली आहेत्,पण नाव/उपयोग माहित नाही, जाणकरांनी माहिती द्यावी
DSCN0123.JPG

अनिल पहिला बकाणा निंब दिसतोय.. मी लिहिले होते याच्याबद्दल.
दुसरे नीट ओळखता येत नाही, पण शिवण ( गंभारी ) किंवा कुंकवाच्या झाडाची पाने अशीच असतात, साधारण.

दिनेशदा,
माहितीबद्दल धन्यवाद !

शोभा१२३,
गेल्या २ महिन्यात एकदाच वापरलाय फक्त..खुप फोटो काढायचेत, पण वेळ नाही.

गेल्या २ महिन्यात एकदाच वापरलाय फक्त..खुप फोटो काढायचेत, पण वेळ नाही.>>>>>>>>>>सद्ध्या सांगलीत आहात का? Happy

अनिल, शोभेचे ऐकू नकोस, भरपूर काढ फोटो !
तूमच्याकडे या दिवसात भरपूर भाजी असेल ना, मळ्यात ? इकडे अंगोलात आता शेतीची कामे सुरु झालीत, पण लागवड सगळी टोकण पद्धतीनेच केलेली दिसतेय. आफ्रिकेत कुठेच मी नांगर वापरताना बघितला नाही. इजिप्त, सुदान मधे असेल. तिथे गाढवांचा सुकाळ आहे, त्यानाच जुंपतात.
केनयात गाई गुरे भरपूर, पण तिथेही बैलांना नांगराला जुंपलेले नाही बघितले.

दिनेशदा,
नक्कीच !
गावी गेलो होतो, तुम्ही बोलल्याप्रमाणे हळदीचे २-४ फोटो काढायचे होते, पण घरी काही फोटो काढले आणि बैटरी संपली, जाताना बैगेत दुसराच चुकुन कॉर्ड नेलेला होता,
इकडे दुष्कल्ळ असल्यामुळे कालच पंढरपुरातल्या जनावरे बाजारात हजारो जनावरे कमी किमतीत विकली गेली, हजारो तशीच राहिली, चार्‍याचा खुप गंभीर मोठा प्रष्न आहे, त्यामळे हे घडत आहे

इकडे दुष्कल्ळ असल्यामुळे कालच पंढरपुरातल्या जनावरे बाजारात हजारो जनावरे कमी किमतीत विकली गेली, हजारो तशीच राहिली, चार्‍याचा खुप गंभीर मोठा प्रष्न आहे, त्यामळे हे घडत आहे >>>> अरेरेरे रे रे - चारा छावण्या काढल्या नाहीत का सरकारने अजून ?????

Pages