निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी,
फोटो अप्रतिम !
मला तर ते हरभर्‍यासारखं वाटलं ! > मलापण !

दिनेशदा,
किलीमंजारोची छान माहिती मिळाली.
गिरिश,
द्राक्षांच्या पानांवर वर्षभर (जास्त ४ महिने) ऑषध फवारणी खुप होते, त्यामुळे कदाचित कुणी इकडे माणसे त्याचा उपयोग करत नसतील्,ऑषध फवारणी नसताना याची खुडलेली फांद्या/पाने जनावरांना मात्र खायला दिल्या जातात.

सुदुपार!!!

पुन्हा साप....

आज काही कामनिमित्त घरी आहे. दुपारी दोन वाजता फोन वाजला...."मल्हार आहे का घरी? आमच्या तळमजल्यावर साप शिरला आहे." मल्हारचे उद्योग कॉलनीभर पसरले आहेत. पण तो आत्ता घरी नाही, पाच नंतर येइल. साप चार घरांच्या मधे होता, कुणाच्या घरात शिरला नव्हता. पण सगळी माणसे धीट नसतात.

पुन्हा सव्वा दोन वाजता फोन. त्याच बाईंचा. "आम्ही मारला त्याला. गटारात फेकला." मला फारच वाईट वाटले. त्यांना म्हटले,"मल्हारला सांगू नका. त्याची उगीचच चिड्चिड होते."

फोनवर बोलताना खिडकीतून खाली बघत होते. एक मांजर फ्लॉवर-बेड शेजारच्या कोरड्या गटारात कुणाला तरी खेळवत होते. नीट पाहीले तर बोट्भर जाडीचा फूट्भर लांबीचा काळ्सर साप (?). माझा फोटोग्राफर घरी नाही. मला जमले तसे फोटो काढले. एवढ्यात बेल वाजली. पुन्हा येईपर्यंत मांजर - साप दोन्ही गायब. थोडी वाट पाहिली, पण काही दिसेना. भर उन्हाचे कशाला बाहेर येत असावेत? हे सर्व ईथे सांगितल्याशिवाय राहवेना.

cat-snake1.JPGcat-snake2.JPGcat-snake3.JPG

फोटोत साप दिसतच नाही. सांभाळून घ्या.

मांजर सापाला खेळवतेय.. तिला आपण मुंगूस आहोत, असे वाटले असणार, बहुतेक !

अनिल, हे औषध फवारणीचे फारच प्रस्थ आहे ना आपल्याकडे, जैविक आणि रासायनिक, दोन्ही प्रकारच्या असतात ना फवारण्या.

परदेशी द्राक्षाच्या मळ्यांच्या कडेला, हॉप्स च्या पण वेली असतात. त्याला हिरवी फळे लागतात, वाईन करताना, त्या वेली पण द्राक्षांबरोबर घेतात.

आजकाल निसर्गातील, एखाद्या घटनेचा पडसाद जगभर उमटायला लागलाय असे होतेय का ? अमेरिकेतील सँडीच्या प्रभावाने असे थेट नाही म्हणता येत, पण भारतात अवेळी पाऊस पडतोय आणि आमच्याकडे पण.

मी इथे आल्यानंतरचा पहिला पाऊस. इथे सगळीकडे भुसभुशीत वाळूच आहे त्यात पाऊस पडल्याने, सगळीकडे चिखल झालाय. आज ऑफिसला येताना, चालकाला सगळे कौशल्य पणाला लावून, सारथ्य करावे लागले !

दिनेशदा,
खरं आहे, माणुस अनेक प्रकारे वातावरण दुषित करुन चुका करतोय, त्याचा परिणाम या पावसावर होत आहे अस वाटतं, कालच्या भयानक वादळासमोर माणुस किती हतबल आहे, हे पुन्हा दिसुन आलं

आजकाल द्राक्ष बागांवर (बाग रोगामुळे जाईल या भितीने,ऑषध कंपन्यांच्या प्रचारामुळे), तसेच एकुण शेतीमध्ये बेसुमार ऑषध फवारणी चालु आहे,याचा परिणाम म्हणून अनेकांचे (फवारणी करण्यार्‍यांचे) केस अकाली गळणे,पोटाचे आजार होताना दिसत आहेत.बाकी आजुबाजुचे वातावरण देखील नक्कीच दुषित बनत आहे यात शंका नाही

कबुतरांच्या नावडत्यांमध्ये माझेही पदार्पण झाले आहे. दिवाळीच्या फराळासाठी लावलेल्या सगळ्या डाळी ह्या आमच्या टेरेसवर सध्या खात असतात.

अनिल, अस्सल गावठी गुलाब आहे का तो ? आणि औषध फवारणीबद्दल तू सत्यमेव जयते चा भाग बघितला असशीलच ! अजिबात फवारणी न करण्याचा निर्णय, सर्वच शेतकर्‍यांना एकाचवेळी घ्यावा लागेल. नाहीतर जो फवारणार नाही, त्याच्याच मळ्याचे नुकसान होणार...

जागू, तूमचा भू भू नाही का कंट्रोल ठेवत, कबुतरांवर ? का त्याला घाबरत नाहीत, कबुतरं ?

अनिल रूईचा दुसरा फोटो छानच Happy

एक (फु)सल्ला. जेंव्हा तुम्ही फोटो क्लिक करता तेंव्हा ज्याचा फोटो काढायचा आहे त्या ऑब्जेक्टला हायलाईट करा. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला हवा असलेला ऑब्जेट कॅमेर्‍यात क्लियर दिसत नाही तो पर्यंत हाफ क्लिक करत रहा (लगेच पूर्ण क्लिक करू नका Happy )

उदा.
१. रुईच्या पहिल्या फोटोत फोकस पानांवर झालाय त्यामुळे मुख्य ऑब्जेक्ट (रूईच्या कळ्या) ब्लर झाल्यात. (सेम फॉर प्रचि १, २, ५, ६, ११)
२. रूईच्या दुसर्‍या फोटोत फोकस परफेक्ट फुलांवर झाला आहे आणि पानं ब्लर झाली आहेत. Happy

अजिबात फवारणी न करण्याचा निर्णय, सर्वच शेतकर्‍यांना एकाचवेळी घ्यावा लागेल. नाहीतर जो फवारणार नाही, त्याच्याच मळ्याचे नुकसान होणार...>>>>>> +१

अनिल, मस्त फोटो..

जिप्सी, टीप्स देत रहा अधुन मधुन, अश्याच समजणार्‍या भाषेत Happy

अनिल - शेतातले फोटो पाहून जीव सुखावला अगदी.....

दिनेशदा - किलीमांजारोवर अजून सांगा बरं काही......डिटेलवार...

अनिल, अस्सल गावठी गुलाब आहे का तो ?
दिनेशदा,
बहुतेक तोच असेल. हे गुलाबाचे झाड खुप जुने आहे,

जिप्सी,
धन्यवाद !
इतके फोटो प्रथमच काढले,अजुन कैमेरा देखील नीट माहित करुन घ्यायचा आहे.
तुमच्या सुचनांचे मनापासुन स्वागत आहे

<<माऊंट किलिमांजारोवर पण चार भागात एक माहितीपट आहे<<
दिनेशदा माउंट किलिमांजारोवर मस्त माहिती देत आहात. मी आताच उत्सुकतेने त्याचे फोटोज बघितले. अफाट सुंदर आहे.
कुठे बघायला मिळेल हा माहितीपट?

KiliExplorer - Climbing the last 200 meters of the Kilimanjaro

http://www.youtube.com/watch?v=xUY4-NobAnE

इथे एक थरारक भाग आहे.

GLOBE Webinar from Mt. Kilimanjaro on 1 October 2012

http://www.youtube.com/watch?v=vx0RjFuDNqk

इथे एक आहे.. पण मी म्हणतो दुसराच आहे.

तूम्ही लोकांनी गिरिराज किंवा मामीला काँटॅक्ट केले का ? त्या दोघांकडे कॉपी आहे, कारण मी म्हणतो तो वेगळाच आहे.

०००

जागू, एकदा जर त्याने घाबरवून टाकले तर परत नाही यायची कबुतरं.

ते द्राक्ष आहे.. आता अनिलला कळून चुकलेय, आपल्याल्या त्याने मळ्यात बोलावले तर आपण त्याला किती प्रश्न विचारुन भंडावून सोडू ते !

शशांक, या किलिमांजारोबद्दल आणखी एक...

एखाद्या डबक्यावर सुकलेली पाने ज्याप्रमाणे तरंगत असतात, त्याप्रमाणे आफ्रिका आणि युरप हे खंड, लाव्हारसावर तरंगत आहेत. या दोन्ही खंडाना जोडणारे जे देश आहेत, म्हणजे तूर्की, ग्रीस आणि इतालि, इथे या दोन्ही प्लेटस एकमेकांना ढकलत एकमेकींना खाली लोटत आहेत. त्यामूळे हा भाग भुकंप प्रवण आहे.

पण या किलिमांजारोचे वजन एवढे आहे कि तो या खंडाला, त्या जागी पेपरवेट प्रमाणे दाबून ठेवतोय.

मला गोनिदांनी सांगितलेली एक कथा आठवली. कथा एका पानाची आणि मातीच्या ढेकळाची. दोघांची असते मैत्री. एकमेकांना जपायचे ते. पाऊस आला कि पान बसायचे ढेकळावर आणि त्याला ढेपाळू द्यायचे नाही, आणि
वारा आला कि, ढेकूळ बसायचे पानावर, आणि पानाला उडून जाऊ द्यायचे नाही.

अनिल, एका फोटोत गुटी कलम केलेलं दिसतंय.. कशावर (म्हणजे कुठल्या) रोपावर केलंय?
शांकली,
बहुतेक शेतकरी 'डॉग्रेज' नावाच्या जंगली जातीच्या रोपांवर हव्या त्या इतर (थॉमसन्,सोन्नाका,तास-ए-गणेश) जातीच्या द्राक्षाच्या वेलीचे कलम केले जाते, कारण डॉग्रेज जातीमध्ये मुळांची वाढ झपाट्याने होते,उत्पादन जास्त येतं.

दिनेशदा,
Lol
तुम्ही सगळे बागेत याल, तो दिवस खरच माझ्यासाठी सोनियाचा असेल ...
द्राक्षांच्या वेलींसुद्धा आनंदाने डोलायला लागतील यात शंका नाही ..

वाचतेय सर्व........... टू ईंटरेस्टिंग!!!!!!!!!!
वर्षू, पांचगणीला भरपूर फोटो काढणार ना ?.............. हो तर!!!!!!!!!!!!! दिनेश दा आणी इतर एक्स्पर्ट्स
(मला) अनोळखी असलेल्या झाडांची माहिती विचारून आणी त्यांचे फोटो टाकून भंडावणारे मी Wink
सावधान!!!!
पण हे सर्व चायनाला परत पोचल्यावरच अर्थात..
त्यामुळे नोवे. एन्ड पर्यन्त निर्धास्त राहा.. Lol

काही राहिलेले फोटो ...
(घरी किबोर्डवर २-४ किज रजेवर आहेत्,त्यामुळे माबो लॉगईन करता येत नाही, ऑफीसमध्ये लिनक्स -जीआयएम्पी मध्ये फोटो रीसाईझ करायला वेळ लागला)

हे हळदीच पीक..
DSCN0102_new2.JPGDSCN0100.JPGDSCN0106_new.JPGDSCN0107.JPGDSCN0108.JPGDSCN0109.JPGDSCN0110.JPG

अनिल, मस्त फोटो,
हळदीच्या पेवाची पण सचित्र माहिती दे इथे, कुणाला फारशी ती प्रक्रिया माहीत नसते.

Pages