निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, माझ्या एका बनारसच्या मित्राने सांगितलेली हकीकत..

तिथे दोन माणसे समोरासमोर आली, कि राधे, राधे असे म्हणतात. त्याचे कारण असे, कि राधेचे नाव घेतल्यास कृष्ण अस्वस्थ होतो. त्याला उत्सुकता असते कि आपल्याशिवाय राधेचं, नाव घेणारा कोण आहे ? ( आणि असूयाही वाटते.) मग तो त्या भक्ताचे संकट निवारायला धावत येतो.

सुदुपार ...!

हीरा,
पेवाबद्दल अधिक माहिती मिळाली.

दिनेशदा,
फुलोर्‍याचे फोटो मलाही काढुन पाहायचे आहेत

खलनायिका वर्षू!!....हाहा...........वर्षूतै, तुझं अभिनंदन!! स्मित
अनुमोदन (फक्त अभिनंदनाला :हाहा:)


मज्जा म्हंजे त्याने त्याच दिवशी रसवंतीचे उद्घाटन केले होते. चरक लावलेल्या टेबलाभोवती रांगोळी काढलेली होती. नुकतीच पूजा ही आटोपली होती...

वर्षु,
ती रसवंती खास तु येणार्‍या दिवशीच सुरु झाली?
वाह क्या बात है !

हीरा 'पेव' बद्दलच्या माहितीबद्दल धन्यवाद! मग पेव फुटणे या वाक्प्रचाराचा उगम कशात आहे?

माधव, पेव फुटणे म्हणजे ही शेणामातीने लिंपलेली कोठारसदृश खोली फुटणे.मग त्यातून धान्य भसाभस बाहेर सांडते.म्हणजेच धान्याचा सुकाळ होतो, लयलूट होते.
पेव म्हणजे शेणामातीचे कोठार या अर्थी हा शब्द नपुंसकलिंगी असतो. उदा.पेव फुटले, पेवे फुटली.
वनस्पतीच्या बाबतीत पेव फुटली, पेवी फुटल्या.

सुदुपार,
DSCN0099.JPGDSCN0093.JPGDSCN0087_1.JPGDSCN0111.JPGDSCN0056_0.JPGDSCN0067.JPGDSCN0093_0.JPGDSCN0103.JPGDSCN0104.JPG

ही केळीची नविन बाग ..
DSCN0105.JPGDSCN0118.JPG

हे तुतीचे झाड, हे कुंपणात नक्की असतं, खुप वाढल्यावर याचा उपयोग चारा म्हणून केला जातो
DSCN0113.JPG

हे 'तरवाडी' च झाड पानमळ्याच्या कुंपणात हम्खास असतं, शेतकर्‍याला केळी पिकवायला या शिवाय दुसरं काही लागत नाही.
DSCN0119.JPG

हे झाड कशाच आहे या बद्दल जाणकार माहिती देतीलच
DSCN0122.JPGDSCN0125.JPGDSCN0128.JPGDSCN0130.JPGDSCN0133.JPG

सुरेख अनिल.

दिनेशदा, साधना, शशांक, जागो, अनिल मला भृंगराजाचे झाड बघायचे आहे दाखवाल का? असे म्हणतात भृंगराजाच्या पानांचा रस डोक्याला लावला की केस भुंग्यासारखे काळेशार होतात.

शोभे तु येणार आहेस ना पहायला. तिने सांगितलय मामा-मावशा आल्याशिवाय माबोवर ती यायची नाही.

अनिल छान फोटो.

अनिल मस्त फोटो.

मलबेरी (तूती) मुंबैला क्रॉफर्ड मार्केटला ७५ रु / २०० ग्रॅ. या भावाने मिळतेय. पुण्याला आणूनच विका. टिकणारे फळ नाहीये पण हातोहात खपेल. मुंबैला विकायला पाठवणार असाल तर मला नक्की सांगा Happy

हाय् लोक्स............कसे आहात?
लेकाच्या लग्नाच्या तयारीत आहे. माबो मिस् करतेय!
काल माझ्या मामेनणंदेची मुलगी(विवाहित) आणि सून ...दोघी आल्या होत्या. तिशीच्या आत बाहेरचं वय. मामेनणंद नेवरे(गणपती पुळ्याच्या जवळ) इथे असते. मुलगा सून, सगळे एकत्रच. मागील वर्षी नणंदेचे मिस्टर वारले. वय साठीच्या आतच. प्रचंड मोठा पसारा.......घराचा आणि शेतीचा. तर ही सून आधीपासून शेतीत रस घेत होतीच. आता ती जे काही करते ते ऐकल्यावर थक्क झाले. अगदी "आधुनिक शेतकरीण" या शीर्षकाखाली एक इंटरेस्टिग लेखच(मुलाखत असेल तर ती अवलने घ्यावी असं वाटतं!) होईल तिच्यावर. फ़ोर आणि टू व्हीलर चालवते. आणि आता तिचे सासरे(माझ्या नणंदेचे मिस्टर) गेल्यावर तिने खूप मेहेनत करून पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रद्न्यानाची जोड देऊन खूपच जबाबदारीने सगळं वाढवलं आहे. पूर्वापार खत म्हणून यूरिया वापरला जायचा. हिने "सत्यमेव जयते" ...आमीरचा.......पाहून संपूर्ण ऑर्गॅनिक शेती सुरू केली आहे. तिचा नवरा(माझा भाचा) फक्त संपूर्णपणे आंब्याच्या लागवडीपासून ते विक्री, कॅनिंग पहातो. आणि ही उरलेलं सर्व अगदी भाजीपाला, भातशेती, ते हळदीचं उत्पादन , आणखीनही बरीच पिकं, असं सगळं पहाते. खूप मस्त वाटलं तिला भेटून!
आता नवीन पद्धतीने गोठा ती करून घेतीय. १५ जनावरं आहेत. असो...................सध्या इतकंच. तुम्हा सर्वांशी शेअर केल्याशिवाय रहावलं नाही.

मानुषी, खरंच अनुकरणीय आहे हे सगळे.

बी, भृंगराज म्हणजेच माका ना ? तो तर माहित असेलच.

अनिल, तुतीचा जॅम वगैरे करता येतो. तसे ते फळ नाशिवंतच आहे. त्याच्या पानावर रेशमाचे किडे पोसता येतात. पण त्याची मात्र जास्त उस्तवार असते.
सगळेच फोटो दिसत नाहीत. मला. पण दिसताहेत ते छानच आहेत.

थोडेसे केळ्याच्या शेतीबद्दल.

दक्षिण अमेरिकेत, कोस्टा रिका नावाचा छोटासा देश आहे. अमेरिकेला लागणार्‍या केळ्यांचे, उत्पादन इथे करतात.
ही सगळी शेती यांत्रिक पद्धतीनेच केली जाते. केळ्यांच्या घडाची वाहतूक करण्यासाठी, रुळ लावलेले आहेत. घड कापला, कि त्या हूकला अडकवला जातो. ( केळ्याची शेती इतकी किफायतशीर पद्धतीने केली जाते कि त्याच्या
वाहतूकीसाठी खास बोटी आणि रेल्वेगाड्या पण आहेत. ) मग त्यावर अनेक रसायने फवारली जातात. ( आणि त्याने त्या कामगारांच्या प्रकृतीवर परिणाम होतो.)

अमेरिकेत केळी पाठवताना, त्यावर जराही डाग असलेला चालत नाही. अशी डाग असलेली केळी, तिथे वेगळी केली जातात. मग किलो दोन किलोच्या वजनात, पॅक केली जातात.

डाग पडलेली केळी, खाण्यास अयोग्य असतात असे नाही. पण ती तिथेच सडून जातात. तिथपर्यंत कुणी स्थानिक गेलाच, तर त्याला ती फुकट मिळतात.

( संदर्भ समुद्रापारचे समाज- लेखक मिलिंद बोकिल )

इथे आफ्रिकेत पण केळ्यांचे भरगोस उत्पादन घेतले जाते. केनयातली केळी विशेष चवदार असतात. त्यांना स्वीट बनाना म्हणतात, युगांडामधली केळी खास करुन मोठ्या आकारांसाठी प्रसिद्ध आहेत. इथे केळ्याबरोबरच
प्लांटेन म्हणजेच राजेळी केळी, ( स्थानिक स्वाहिली भाषेत, मटोके ) फार लोकप्रिय आहेत.
हि केळ्याचीच जात असली, तरी कच्ची खाता येत नाहीत. ( पिकलेली असली तरी ) ती शिजवूनच खातात.
नूसती भाजून वा उकडून खातात. माझ्या जेवणात, आठवड्यातून एकदा असतातच.
याच्या तळून केलेल्या चिप्स पण लोकप्रिय आहेत. लहान मुलांचा पण पहिला घन आहार तोच असतो...

( तर हरदासबुवांची कथा सुफळ संपूर्ण )

प्लांटेन म्हणजेच राजेळी केळी>>प्लांटेन म्हणजे वांगी असेच मला वाटत होते.

दिनेशदा, मी माका फक्त ऐकला आहे पाहिला नाही. प्लीज मदत करा.

दिनेशदा.. इथे लाल रंगाची केळी मिळतात ती म्हणे डोळ्यांसाठी सर्वात उपयुक्त असतात.

इथे फिलिपाईन्समधून छोटी बुटकी केळी येतात. त्याची फणी/घड अतिशय सुरेख दिसते. असे वाटते खेळणीतली केळी असावी ही.

दिनेशसा राजेळी केळी म्हणजे ती लांबसर असणारी केळी का?

माझे बाबा म्हणायचे केळीवर वेलची खाली की केळी पटकण पचतात.

माका म्हणजे अगदी छोटेसे झाड असते. पाणथळ जागी हमखास असते. पाने मेंदीसारखी असतात. देठ हिरवट तपकिरी. फुले पांढरी.. इथे भास्कर यांनी फार सुदर फोटो टाकला होता. पण माका नावाने तो सापडत नाही.
जागूने पण टाकला होता, बहुतेक.

ती लाल केळी, पुर्वी वसईला लोखंडी केळी नावाने मिळायची. चवीला तशीच लागतात, पण सगळीच केळी, तब्येतीला चांगली. केळी आणि वेलची चांगला संयोग आहे. पण तशीही केळी पचायला सोपीच.

राजेळी केळी म्हणजे तिच लांबट केळी, तामिळ लोक त्याचा हलवा करतात तर केरळी लोक चिप्स. गोव्यात त्यांना रसबाळी केली म्हणतात.

आमच्या कडे ती हिरवी केळी आहेत. त्याची भाजी आणि चिप्स चांगल्या होतात. पिकल्यावर खायला खुप जड असतात.

दिनेशदा, चटकन उत्तर देता नेहमी त्याचे फार अप्रुप वाटते! धन्यवाद.
जागू, धन्यवाद. कित्येकदा पाहिली आहे ही वनस्पती पण आठवत नाही कुठे इथे की भारतात.

दिनेशदा, चिप्स बनवण्यासाठी राजेळी केळी काळीकुट्ट होऊ द्यावी लागतात ना? ते का?

नाही रे, कच्ची असतानाच चिप्स करतात. त्यावेळी जरा कडक असतात. नीट काप करता येतात.
काळी झाली कि हलवा करतात. तिथले तामिळ लोक नक्कीच करत असतील. आणि अगदी सोपा आहे. चकत्या करुन तूपात परतायच्या, त्या मऊ पडल्या कि साखर घालायची. या केळ्याचा रंग आणि स्वाद खुप छान असतो. हा हलवा थंड झाला, कि त्यात दूध घालून खायला, मला खुप आवडते.

घराचा आणि शेतीचा. तर ही सून आधीपासून शेतीत रस घेत होतीच. आता ती जे काही करते ते ऐकल्यावर थक्क झाले. अगदी "आधुनिक शेतकरीण" या शीर्षकाखाली एक इंटरेस्टिग लेखच(मुलाखत असेल तर ती अवलने घ्यावी असं वाटतं!) होईल तिच्यावर. फ़ोर आणि टू व्हीलर चालवते. आणि आता तिचे सासरे(माझ्या नणंदेचे मिस्टर) गेल्यावर तिने खूप मेहेनत करून पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रद्न्यानाची जोड देऊन खूपच जबाबदारीने सगळं वाढवलं आहे. पूर्वापार खत म्हणून यूरिया वापरला जायचा. हिने "सत्यमेव जयते" ...आमीरचा.......पाहून संपूर्ण ऑर्गॅनिक शेती सुरू केली आहे. तिचा नवरा(माझा भाचा) फक्त संपूर्णपणे आंब्याच्या लागवडीपासून ते विक्री, कॅनिंग पहातो. आणि ही उरलेलं सर्व अगदी भाजीपाला, भातशेती, ते हळदीचं उत्पादन , आणखीनही बरीच पिकं, असं सगळं पहाते. खूप मस्त वाटलं तिला भेटून!
आता नवीन पद्धतीने गोठा ती करून घेतीय. १५ जनावरं आहेत. असो..... >>>> मानुषी, तूच मुलाखत घेऊन इथे टाक बरे हे सगळेच डिट्टेलवार - फारच इंटरेस्टिग आहे हे सगळे.

दिनेशदा - केळ्यावर एक स्पेशल धागाच सुरु करा बरं -

इथे दिलेली सर्व माहिती सुरेखच, फोटोही सुंदर. खूप छान वाटतं हे सगळं वाचताना.

दिवाळीच्या निमित्ताने नवनवीन फुले - झाडे - फळे- पशू - पक्षी यांची माहिती व फोटो दोन्ही येऊंद्यात.

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व निसर्ग प्रेमींना दिवाळी शुभेच्छा
उद्यापासून सुट्टी म्हणून आत्ताच

दिवाळीतल्या रांगोळी सम, कण कण जुळून यावा
दिव्या दिव्यातिल ज्योती सम अन्, उजळून ही जावा
असा असावा रेखिव क्षण क्षण, जीवनात सरणारा
झरा असावा घराघरातून, प्रेमाचा झरणारा
रांगोळी सम जुळून येवो, हे ही चित्र निराळे
तृप्त होवोत डोळे तेव्हा, पाहून ते सोहळे

सुधीर

Pages