रात्रीचं जेवण

Submitted by मुंगेरीलाल on 22 October, 2012 - 13:43

“बरं, ऐक न मी काय म्हणते”

“का....य? सांग ना”

“सकाळच्या चार पोळ्या आहेत, एक भाकरी शिल्लक आहे”

“बरं मग?”

“आईचा उपास आहे आणि बाबांचं पोट बरोबर नाही”

“अरे वा. छान छान”

“छान छान काय, लक्ष कुठंय तुझं?”

“अगं ऐकतोय ना? आता काय रंगीबेरंगी दिवे लागायला पाहिजेत का माझ्या कपाळावर बस-स्टँडवरच्या वजन यंत्रासारखे?”

“.........”

“ठीक आहे, सॉ......री. बोल, नक्की काय म्हणायचंय तुला?”

“२ मुठीचा भात टाकू की ब्रेड आणतोस कोपऱ्यावरून?”

“भाताला ब्रेड पर्याय कसा होऊ शकतो? कुस्करून खायचाय का सगळ्यांनी वरणात?”

“वरण वाटीभरच आहे, भाजीही थोडीशीच आहे”

“चालेल तेव्हढी मला”

“ते देऊन टाकलं मी बाईला दुपारीच. तू सकाळीच नावं ठेवली होतीस भाजीला”

(मग मघाशी वाटीभर आहे म्हणाली होतीस ते?....)

(जसं काही तूपण कधीच थाप मारत नाहीस....)

“मग कसा खाणार भाताबरोबर ब्रेड? सॉरी, कशाबरोबर खाणार ब्रेड?”

“मिसळ करू? तुला लागेल ना तेव्हढी भूक?”

“१ तासानी मला किती भूक लागेल ते आत्ता कसं सांगू मी?”

“बाहेर जाऊ या का?”

“बाहेर? मी आत्ताच जीवघेण्या ट्राफिक मधून आलोय, अंग आंबलय माझं”

“ठीक आहे, पिठलंच टाकते”

“थांब, मला जरा सुचू दे. जाऊ कुठंतरी जवळ”

“बदलू मी कपडे?”

“अन त्या चार पोळ्याचं काय?”

“उद्या फोडणीची पोळी”

“आणि ती एकुलती एक भाकरी?”

“मी खाईन, मला भाकरी शिळीच आवडते”

“आणि आईचा उपास?”

“त्या स्ट्रोबेरी-शेक पिते म्हणाल्या”

“बाबांचं पोट बिघडलंय ना पण... त्याचं”

“त्यांनी गोळी घेतलीये संध्याकाळीच”

“म्हणजे आधीच ठरलंय तुमचं सगळं”

“नाही तर नको, सांग भाजी काय करू? एक ढोबळी मिरची आहे, अर्धा दुध्या...”

“ठीक आहे, चला बाहेर”

“चला :-)”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol आमच्याच घरात शिरुन ऐकून इथे लिहिल्यासारखं वाटलं Wink बाकी ह्यावर "बायको" च्या नजरेतून लिहायला किबोर्ड खाजतोय पण तुर्तास राहु द्याव म्हणतेय Proud (ते जमणे आमच्या कोबोर्डला शक्य नाही हे नाचता येईना टाईप सत्य आपलं मनात आमच्या कोबोर्डच्या ;))

(( आमच्याकडे स्टॅन्डर्ड उत्तर असतं, काही पण बनव.)) +१
पण हे ''काही पण बनवल्यावर '' परत '' हे का केल, त्यापेक्षा ते चालल असत'' हे ही ऐकाव लागत !!

लेख भारी.

अतिशय मस्त लिखाण, तो अहिराणि एस्.एम. एस. ही जबरी...
आमच्या कडे नवर्‍याला जास्त उत्साह असतो.. तो लगेच.. चिकन मागवु......?

फारच मस्त लेख!!!
पण आमच्याकडे 'आई' म्हणतील - 'कशाला खर्च? डाळमुगाची खिचडी टाक गं त्यापेक्षा सरळ.'
'बाबा' म्हणतील - 'तुम्हीच जा आणि बाहेरनं थोडंफार काहितरी घेऊन या मला खायला...'
आणि 'हे' म्हणतील - '१० मिनीटांत आवरणारे का तु़झं? मला परत येउन कामं आहेत. मला चांगला शर्ट ठेव ईस्त्री करून. पाणी सोड... जरा फ्रेश होतो. तोवर एक फक्कड चहा टाक आणि तोंडात टाकायला कर काहितरी. आणि हो... माझे बूट....'
मी - 'खिचडी लावलीये...' Sad

बाकी ह्यावर "बायको" च्या नजरेतून लिहायला किबोर्ड खाजतोय पण तुर्तास राहु द्याव म्हणतेय>>>कविन, ह्यावर पाडा एक ललित प्लीजच !

रचना थांब गो दिवाळी साठी शेव चकली आमच्या "स्वतः" कडून घेते पाडून मग त्याच सोरणातून लेख पाडायचं बघेन म्हणते Wink Proud

लगे रहो, मुंगेरीलाल मस्त लिहीताय Happy

Rofl

आम्हा दोघांमधलेच संभाषण आहे हे. आणी एकदा नव्हे तर रोजचे. रोज रोज करणार काय्?:फिदी:

हिट्टें बॉस. माबोवर सध्या मुंगेरीलालकी हसीन विनोदी कथांए और बाबुरावकी रहस्य कथांए.:फिदी:

हिट्टें बॉस. माबोवर सध्या मुंगेरीलालकी हसीन विनोदी कथांए और बाबुरावकी रहस्य कथांए.
<<
अग्दी अगदी

आमच्याकडे "वरणफळे/रावनभात्/पिठलंभात बनवू का?" (तीन पर्यायांमधला एकच पर्य्याय एकावेळेला वापरायचा) म्हटलं की "नको, बाहेरून मागवू या" असा निकाल येतो. Proud

( आमच्याकडे स्टॅन्डर्ड उत्तर असतं, काही पण बनव.)) +१
पण हे ''काही पण बनवल्यावर '' परत '' हे का केल, त्यापेक्षा ते चालल असत'' हे ही ऐकाव लागत !!.....>>>++१११

Pages