“बरं, ऐक न मी काय म्हणते”
“का....य? सांग ना”
“सकाळच्या चार पोळ्या आहेत, एक भाकरी शिल्लक आहे”
“बरं मग?”
“आईचा उपास आहे आणि बाबांचं पोट बरोबर नाही”
“अरे वा. छान छान”
“छान छान काय, लक्ष कुठंय तुझं?”
“अगं ऐकतोय ना? आता काय रंगीबेरंगी दिवे लागायला पाहिजेत का माझ्या कपाळावर बस-स्टँडवरच्या वजन यंत्रासारखे?”
“.........”
“ठीक आहे, सॉ......री. बोल, नक्की काय म्हणायचंय तुला?”
“२ मुठीचा भात टाकू की ब्रेड आणतोस कोपऱ्यावरून?”
“भाताला ब्रेड पर्याय कसा होऊ शकतो? कुस्करून खायचाय का सगळ्यांनी वरणात?”
“वरण वाटीभरच आहे, भाजीही थोडीशीच आहे”
“चालेल तेव्हढी मला”
“ते देऊन टाकलं मी बाईला दुपारीच. तू सकाळीच नावं ठेवली होतीस भाजीला”
(मग मघाशी वाटीभर आहे म्हणाली होतीस ते?....)
(जसं काही तूपण कधीच थाप मारत नाहीस....)
“मग कसा खाणार भाताबरोबर ब्रेड? सॉरी, कशाबरोबर खाणार ब्रेड?”
“मिसळ करू? तुला लागेल ना तेव्हढी भूक?”
“१ तासानी मला किती भूक लागेल ते आत्ता कसं सांगू मी?”
“बाहेर जाऊ या का?”
“बाहेर? मी आत्ताच जीवघेण्या ट्राफिक मधून आलोय, अंग आंबलय माझं”
“ठीक आहे, पिठलंच टाकते”
“थांब, मला जरा सुचू दे. जाऊ कुठंतरी जवळ”
“बदलू मी कपडे?”
“अन त्या चार पोळ्याचं काय?”
“उद्या फोडणीची पोळी”
“आणि ती एकुलती एक भाकरी?”
“मी खाईन, मला भाकरी शिळीच आवडते”
“आणि आईचा उपास?”
“त्या स्ट्रोबेरी-शेक पिते म्हणाल्या”
“बाबांचं पोट बिघडलंय ना पण... त्याचं”
“त्यांनी गोळी घेतलीये संध्याकाळीच”
“म्हणजे आधीच ठरलंय तुमचं सगळं”
“नाही तर नको, सांग भाजी काय करू? एक ढोबळी मिरची आहे, अर्धा दुध्या...”
“ठीक आहे, चला बाहेर”
“चला :-)”
'हजबंड-वाईफ जोक्स' मधून असाच
'हजबंड-वाईफ जोक्स' मधून असाच विनोद ईमेलमधून सगळीकडे फिरतो.
सगळंच लिखाण
सगळंच लिखाण भारीये.......
“अगं ऐकतोय ना? आता काय रंगीबेरंगी दिवे लागायला पाहिजेत का माझ्या कपाळावर बस-स्टँडवरच्या वजन यंत्रासारखे?” >>>> हे एक नंबर....
डॉ. इब्लिस यांनी टाकलेला अहिराणी समस पण मस्तच.....
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
क्ला.............स !
क्ला.............स !
( आमच्याकडे स्टॅन्डर्ड उत्तर
( आमच्याकडे स्टॅन्डर्ड उत्तर असतं, काही पण बनव.)) +१

पण हे ''काही पण बनवल्यावर '' परत '' हे का केल, त्यापेक्षा ते चालल असत'' हे ही ऐकाव लागत !!.....>>>++११११
माझ्या घरी: जेवण बनवायचा
माझ्या घरी:
जेवण बनवायचा कंटाळा आलाय रे [मिच [तोंडाने आवाज
सोप्पं करं मग
खिचडी बेसन नाहीतर टोम्याटो चटणी [:का म्हटले कंटाळा सरळ हेच करायला पाहिजे होते:
(No subject)
व्वा मस्तच
व्वा मस्तच
>>रंगीबेरंगी दिवे खुसखुशीत
>>रंगीबेरंगी दिवे

खुसखुशीत संवाद.
बाप रे, सॉलिड अपील झालेलं
बाप रे, सॉलिड अपील झालेलं दिसतंय... मला अजिबात अपेक्षा नव्हती
घरोघरी मातीच्या चुलीलाच सगळं श्रेय हेच खरं...
@इब्लिस अहिराणी एसेमेस जबरी
आरारा! मुंगेरीला
आरारा! मुंगेरीला भाऊ,
न्हाईतर उरलेला अर्धा दुध्या पाठीत मारायच्या 
वैनीसायेबास्नी वाचू देउ नगा
आ.न.
झोटिंग शहा
मुंगेरीलाल, अगदी मर्मग्राही
मुंगेरीलाल,
अगदी मर्मग्राही लेखन! एकदम पटेश.
आमच्या घरची ष्टोरीलाईन थोडी वेगळी आहे. मी उल्हासित चित्ताने धमकावतो की मी काहीतरी बनवणार!
बायकोची काय बिशाद आहे हो म्हणायची! मी बनवलेलं केवळ मीच खाऊ शकतो याची तिने एकदा(च(!)) प्रचीती घेतली आहे. अंती बाहेरून मागवणं होतंच (इथे इंग्लंडमध्ये त्यास टेकअवे म्हणतात).
आ.न.,
-गा.पै.
<<अशा टाईपचे वाचले आहेत एक
<<अशा टाईपचे वाचले आहेत एक दोन जोक्स >>
मी पण .तरीसुद्धा हे पण चांगल आहे
@झोटिन्ग भाउ, काळ्जी नसावी.
@झोटिन्ग भाउ, काळ्जी नसावी. प्रत्येक लेख वैनिच वाचुन 'सरटि-फुकट' देताती आन मगच टाक्तुया हित. ते अमेरिकेच्या सर्पन्चाच्या 'मन्डळी'ला फश्ट्-लेडी का काय म्हन्तेत ना, तशी मी जे लिव्तो त्याची फश्ट्-लेडी केलिय बगा तिस्नी. आजुन तर लिवू देतिया, फुडच फुड. दुध्या तर बसतोच पाठित, तो काय कसबी वागल तर सुट्त नाय, मन्ग कशाला भ्या?
@गा.पै. ही आय्डिया चांगली आहे, पण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे हो. मी चुकुन शिजवलं ते चान्गलं झालं, तर उर्लेला जन्म जायचा चुलीपाशि. रिस्क आहे,
जरा मार्गदर्शन करा की.
आमच्या घरी रोज हीच बोंब
आमच्या घरी रोज हीच बोंब
खूप हसले... मज्जा आली...
खूप हसले... मज्जा आली...:हाहा:
@गा.पै. ही आय्डिया चांगली
@गा.पै. ही आय्डिया चांगली आहे, पण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे हो. मी चुकुन शिजवलं ते चान्गलं झालं, तर उर्लेला जन्म जायचा चुलीपाशि. रिस्क आहे, जरा मार्गदर्शन करा की. >>> हे ब्येष्ट होतं बरं का!!!
आणि जे लिहिलं आहेत, त्याला तर तोडंच नाही!
अजून अस्मादिक अविवाहित असल्याने भावी काळात काय आर्ग्युमेण्ट्स करायच्या ह्याचं चांगलं ट्रेनिंग मिळतंय!
भण्णाट, पोट धरून हसु आलं,
भण्णाट, पोट धरून हसु आलं, कारण कालच आम्च्या कडे ऑलमोस्टसेम प्रसंग घडला..
हा हा हा.. आमच्या पण रुमवर आझ
हा हा हा..
आमच्या पण रुमवर आझ भाजी काहि नाहि आहे.. रात्रि गेल्यावर सेम संभाषन होनार आहे आज..
१ ढोबळि मिरचि आणि अर्धि चपाति आहे सकाळची...
मस्तच...!!! अहिराणी एसेमेस तर
मस्तच...!!!
अहिराणी एसेमेस तर आमच्या घरचं संभाषण चोरुन ऐकुन बनवला आहे असं वाटत
छानच लिहिलं आहे
छानच लिहिलं आहे
मी चुकुन शिजवलं ते चान्गलं
मी चुकुन शिजवलं ते चान्गलं झालं, तर उर्लेला जन्म जायचा चुलीपाशि. रिस्क आहे, >>> :d
अगदी आमच्याच घरातला सीन
अगदी आमच्याच घरातला सीन वाचल्यासारखं वाटलं. >>> अगदी अगदी.
मस्त
मस्त
मुगेरीलाल जी हे अगदी घरोघरी
मुगेरीलाल जी हे अगदी घरोघरी ग्यासच्या चुली असं झाल्यं लै भारी
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
मी चुकुन शिजवलं ते चान्गलं
मी चुकुन शिजवलं ते चान्गलं झालं, तर उर्लेला जन्म जायचा चुलीपाशि. रिस्क आहे, >>>
Pages