Submitted by पुरंदरे शशांक on 22 October, 2012 - 00:32
एक पिल्लू माऊचं
काळ्या-पांढर्या ठिपक्याचं
बसलं बागेत केव्हाचं
उन खात सकाळचं
फुलपाखरु भिर्भिरताना
कित्ती माना वळवायचं
आळसानं भरभरून
तिथेच पडून रहायचं
वास येताच दुधाचा
घरात पळत जायचं
दूध लप्लप पिताना
डोळे मिटून घ्यायचं
मग मात्र अंग सारे
चाटून साफ करायचं
अस्सं पिल्लू माऊचं
आमच्याच घरी असायचं...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच गोड.... असं पिल्लू
खूपच गोड.... असं पिल्लू आमच्या घरीपण होतं
(No subject)
अरे हत्ती झाला, आता माऊ
अरे हत्ती झाला, आता माऊ वाटत!!!
छान सोप्पी शब्द रचना
हे घ्या
मस्त..आवडलं..(पिल्लुपण आणि
मस्त..आवडलं..(पिल्लुपण आणि गाणेपण)..:)
आमचं म्यांव
सगळ्याच माऊ गोड
सगळ्याच माऊ गोड आहेत.......
सर्वांचे मनापासून आभार......
कित्ती गोड म्यावपण
कित्ती गोड म्यावपण
गोड
गोड
तुमच्या सगळ्याच बाल-कविता छान
तुमच्या सगळ्याच बाल-कविता छान असतात. ही पण मस्त गोड जमलीये
सर्वांचे पुन्हा पुन्हा
सर्वांचे पुन्हा पुन्हा मनापासून आभार.
गोड्ड्ड्डुलं
गोड्ड्ड्डुलं
मस्त
मस्त