रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह )

Submitted by रचना. on 18 October, 2012 - 05:29

कृतीसाठी दिलेले फोटो हे फक्त समजवण्यासाठी आहेत.

लागणारे साहित्य :-

पातळ खोका (जास्त जाड नको असल्यास टिंटेड पेपर, कार्डस्टॉक)
डिझायनर पेपर किंवा साधा रंगीतही चालेल चार्ट पेपर
डिनर प्लेट
पेन्सिल
कटर
फेव्हिकॉल
रिबीन
सजवण्याचे साहित्य

खोक्यापासुन बनवणार असल्यास आधी खोका पुर्ण उघडुन त्यावर प्लेट ठेऊन गोल काढुन कापुन घ्यावा. असे चार गोल लागणार आहेत.

गोल अर्ध्यात दुमडावा.

परत दुमडावा जेणे करुन चतकोर तयार होईल.

घड्या उलगडुन फोटोत दाखवल्याप्रमाणे त्रिज्या कापावी.

कापलेली बाजु वर दुमडावी. ह्या घडीने कापलेल्या चतकोराच्या उजव्या बाजुच्या चतकोराने दोन समान भाग झाले पाहिजेत.

खोका वापरला असल्यास खोक्याच्या गोलाला डिझायनर्/रंगीत कागद आधीच्या स्टेप्स करुन(गोल कापुन, घड्या घालुन, त्रिज्या कापुन) एका बाजुला चिकटवा. म्हणजे खोका झाकला जाईल. टिन्टेड असल्यास सरळ खालील स्टेप करावी.

रेषा मारलेल्या भागाला फेव्हिकॉल लाऊन डाव्या बाजुच्या खाली अश्या प्रकारे चिकटवा की कोनाडा तयार होईल.

अश्या तर्‍हेने चारही कोनाडे बनवा. ते एकमिकांना चिकटवा.

नीट बंद केल्यावर चतकोर बनेल. त्याला मागुन पुढुन रिबीन लावा.
आवडिनुसार सजवा. हुश्य...........

हे एका मुलीच्या चौथ्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे. म्हणुन चार कोनाडे

माबोला काय झाले कळत नाही. तिसर्‍यांदा कृती लिहिते आहे. त्यामुळे कृती लिहितांना काही गोंधळ झाला असण्याची शक्यता आहे.
कृती कुठाय असं विचारलेल्यानी स्वतः केलेल्या कोनाड्यांचे फोटो टाकावेत. Light 1

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉरिबली सुरेख, सुंदर.
माझ्या निवडक १०त. शब्द सापडत नाहियेत कौतुक करायला.

अम्या म्हणतो त्याप्रमाणे कृती टाक सर्व बारकाव्यांसकट.

काय कला आहे ग तुझ्या हातात.. मस्तय एकदम.. एखादे वर्कशॉप अ‍ॅरेंज कर ना आमच्यासारख्यांसाठी Happy

हॉरिबली सुरेख >> उपमा.. लैच आवडली Wink

अरे, कृती कुठे गायबली Uhoh आता परत लिहावं लागणार सगळं.
लाजो, लिंकवर क्लिक केलस तर मोठे फोटो दिसतील

मस्त Happy

प्रतिसादासाठी धन्यवाद !
मेधा, खरतर मला कार्ड स्टॉकच लिहायच होतं. गडबडीत कार्डबोर्ड लिहिलय. कार्डबोर्ड ला घड्या Proud

Pages