"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
म्यांऊऊऊऊउ म्यांऊऊऊऊउ
म्यांऊऊऊऊउ म्यांऊऊऊऊउ म्यांऊऊऊऊउ मी येऊ?????
या वर्षी आंबा लवकर येणार आहे
या वर्षी आंबा लवकर येणार आहे का ? आमच्या घरा शेजारील आंब्याला मोहर आला आणि काही बोरं एवढे छोटे आंबे पण लागले आहेत , लवकरच फोटो टाकतो ... आणि हा आंबा काही कलमी नाही , कोय लावूनच आलेला , दहा वर्षांपूर्वी लावलेला , गेल्या वर्षी पहिल्यांदा त्याला आंबे आले होते.. बघूया हे छोटे आंबे तग धरतात का .. नैसर्गिक रित्या आणि बच्चे कंपनी पासून ...
सुप्रभात, निगच्या या पानावर
सुप्रभात,
निगच्या या पानावर आज योग जुळुन आला आणि मी घरी काढलेले काही फोटो प्रथमच अपलोड करुन श्रीगणेशा केला.
इतरांच्या मानाने आज पहिलीत प्रवेश घेतल्यासारख वाटतयं हे नक्की.
द्राक्षाचा हा फोटो मार्चमध्ये
द्राक्षाचा हा फोटो मार्चमध्ये मोबाईल वर बागेत काढला आहे,बाकीचे नविन कैमेरातुन काढले आहेत
अनिल७६ - ही द्राक्षं तुमच्या
अनिल७६ - ही द्राक्षं तुमच्या बागेतील का ?, वा सुंदरच घोस आहे... कुठली जात / वाण आहे ?
वा.. काय सुंदर द्राक्षे. आणि
वा.. काय सुंदर द्राक्षे. आणि सदाफुलीही सुंदर दिसतेय.
ज्ञानेश, आंब्याची काही झाडे दोनदा बहरतात. आपल्याला जरी ठळकपणे जानेवारी ते मे मध्ये आंबा दिसत असला तरी कुठेना कुठे वर्षभर आंबा बहरतच असतो. दिनेशदांनीही मागच्या पानांवर लिहिलेय आंब्याच्या बहरण्याबद्दल.
शशांकजी,साधना, या नवशिक्याचे
शशांकजी,साधना,
या नवशिक्याचे फोटो पाहिल्याबद्दल (आवडल्याबद्दल) धन्यवाद !
द्राक्षे आमच्या बागेतली,पण ही काही मोजकी (चुकुन) लावलेली वाईनचचीद्राक्षे आहेत,मैंगो ग्रेप्स अस काहीतरी ऐकलयं,बाकी बागेत थॉमसन सीडलेस आहे,
११व्या भागाबद्दल सर्वांचे
११व्या भागाबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

सर्वांचे उतार, आणि माहिती मस्तच. धन्यवाद! .
वा सगळ्यांचे फोटो मस्त आहेत.
वा सगळ्यांचे फोटो मस्त आहेत.
जिप्सी - ही निळ्या डोळ्याची
जिप्सी - ही निळ्या डोळ्याची सुंदरी (माऊ) कुठे मिळाली/ दिसली रे तुला ?
अनिल द्राक्षे छानच. एकदा
अनिल द्राक्षे छानच. एकदा यायला पाहिजे तूझ्या बागेत.
गौरी, मी पण हेच लिहायला आलो होतो. माथेरान, महाबळेश्वरला हि पाने संजीवनी म्हणूनच विकतात. म्हणजे सुकलेली पाने आपल्यासमोर पाण्यात टाकतात आणि हिरवी झाली कि खा असे सांगतात !
आता विचार करताना असे वाटते, शेवग्याच्या शेंगेला मूळ चव अशी नसतेच. आपण मसाले घालून चव आणतो.
इथल्या लोकांना, मसालेच माहीत नाहीत ना !
ही मांजरींची बाळ. आता मी
ही मांजरींची बाळ. आता मी ह्यांचा एक धागा टाकतेय फोटोंचा.

दिनेशदा शेवग्याच्या शेंगेला
दिनेशदा शेवग्याच्या शेंगेला चव नसते पण तिला जो स्वाद असतो त्यामुळे मला ती खुप आवडते.
जागू, एक बाळ अगदी "सोन्या"
जागू, एक बाळ अगदी "सोन्या" आहे !
थोड्या वेळात फोटो टाकतेच
थोड्या वेळात फोटो टाकतेच सोन्यांचे.:स्मितः
(No subject)
सुकी सुंदर फोटो. हे घ्या
सुकी सुंदर फोटो.
हे घ्या मांजरपुराण.
http://www.maayboli.com/node/38613
SOLAR INDIA Inc. ½ OLD
SOLAR INDIA Inc.
½ OLD PALASIA 105 APOLLO ARCADE
INDORE (M.P.) Ph: 0731-2560554(O) 94253-12942 (M)
Email: solar_marketing@yahoo.com/solarindiainc@gmail.com
Website: www.solarindia.in
कुणाला सोलर दिवे / कूकर संबंधी माहिती असेल तर वरच्या पत्त्यावर संपर्क साधा. मला त्यांची इमेल आलीय.
सर्व नि.ग. प्रेमींना
सर्व नि.ग. प्रेमींना नवरात्रीच्या शुभेच्छा
आजचा रंग लाल
सर्वांना शुभेच्छा... नितिन,
सर्वांना शुभेच्छा... नितिन, रोज एक माळ चढवणार आहे वाटतं !
अनिल, ईन मीन फोटो सुंदर
अनिल, ईन मीन फोटो सुंदर आलेत.
शोभा, फुलं किती गोड आहेत!
जिप्सी, मनीमाऊ कुठे मिळाली? मस्त पोझ दिलीये हं....
वेका, हो गं सगळाच लेख फार मस्त लिहिलाय. ती मुलगी म्हणजे अमृता राणे. तेव्हा ती मॉरीशसमधे होती. आता सध्या ती नागालँडमधे हॉर्नबिल वाचवा या मोहिमेवर आहे.
गौरी, अगं हे पिंक पीजन तिथलं मूळचं रहिवासी आहे. आणि ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं; म्हणून त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले गेले. नाहीतर डेड अॅज डोडो सारखं ह्याचं पण झालं असतं......
नितीन सुंदर रंग आहे. ह्या
नितीन सुंदर रंग आहे. ह्या कळ्या उमलत नाहीत तिच जास्वंद आहे ना?
शांकली धन्यवाद...अमृताचं खरंच
शांकली धन्यवाद...अमृताचं खरंच कौतुक....:)
एका बागेतले थोडेसे लाल गुलाब.

सुप्रभात, जागु, फोटो आणि
सुप्रभात,
जागु,
फोटो आणि मांजरपुराण छान!
(कालच्या पोस्ट मध्ये चुकुन झालेली टायपिंग मिस्टेक दुरुस्त केली आहे,त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.)
११ व्या भागाचे सर्वांचे
११ व्या भागाचे सर्वांचे अभिनंदन.
८४ पोस्टिंग झाल्यानंतर आले. किती भरभर!!!! आता सावकाशीने वाचीन.
जिप्सी, अनिल,सुकी, शोभा मस्त
जिप्सी, अनिल,सुकी, शोभा मस्त प्रचि , हो जागुताई तिच ती
नितिन, रोज एक माळ चढवणार आहे वाटतं ! >> दा फक्त मी नाही आपण सगळेच अस करुया की.
तारीख १६ लाल ,१७ आकाशी, १८ पिवळा,१९ हिरवा,२० करडा,२१ केशरी,२२ पांढरा,२३गुलाबी,२४ निळा
फक्त निसर्गाचे रंग
आजचा रंग आकाशी
दिनेशदा, कुणाला सोलर दिवे /
दिनेशदा,
कुणाला सोलर दिवे / कूकर संबंधी माहिती असेल तर वरच्या पत्त्यावर संपर्क साधा. मला त्यांची इमेल आलीय. >>>> जरा फुरसतीत पाहीन.
त्याआधी एक अनुभव..
१३-१४ ऑक्टोबरला सातारयाला गेले होते. हॉटेलमधे गरम पाण्याची सोय (सकाळच्या वेळेस) सोलार द्वारे केली होती. गरम पाण्याचा नळ सोडल्यावर कमीत-कमी ३ मोठया बादल्या वाहून गेल्यावर नळाला गरम पाणी येऊ लागले. तिथल्या माणसांकडे चौकशी केल्यावर कळले कि "अशीच system आहे". खोलीत एकच बादली, मला काही कपडे धुवायचे नव्हते. एवढे पाणी नुसते ओतून द्यावे लागले. फार वाईट वाटले. थेंब-थेंब पाणी वाचले पाहीजे अशी परिस्थिती असताना हा पाण्याचा निव्वळ नाश होता. खरोखरच सोलार system असताना लगेच गरम पाणी येत नाही का? नेहमी सोलार वापरणारे सांगू शकतील.
नेहमी सोलार वापरणारे सांगू
नेहमी सोलार वापरणारे सांगू शकतील. >>>> आमच्याकडे ट्यूब टाईप सोलर वॉटर हिटर सिस्टीम आहे. हे युनिट अर्थातच गच्चीत बसवलेले आहे. तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर यातून व्यवस्थित गरम पाणी येते (ढगाळ वातावरण वगळता ). याच्या पाईपमधे अर्थातच थोडे थंड पाणी असते (साधारणतः १-२ लि.) ते येऊन गेले की चांगले गरम पाणी येते. मला वाटतं तुम्ही ज्या हॉटेलचा अनुभव सांगितला आहे - तिथे पाईप्सची लांबी जास्त असल्याने त्यात साठलेले गार पाणी सुरवातीला येऊन मग गरम पाणी येत असणार. हॉटेलच असल्याने तिथे कोण असली काळजी करणार - की सुरवातीला २-४ लि पाणी वाया जातंय का २-४ बादल्या वाया जातंय ते !!
हो मधु, हॉटेलमधे खरेच खुप
हो मधु, हॉटेलमधे खरेच खुप पाणी वाया जाते. काही देशात मात्र मला छान अनुभव आला. हॉटेलमधे आपण टॉवेल एकदा वापरुन, लगेच धुवायला टाकतो. पण तसे न करता तो परत एकदा वापरावा, अशी विनंति एका स्विस हॉटेलमधे केली होती. ऑकलंडला एअरपोर्टवर जो टॉवेल मिळाला, तो इको फ्रेंडली होता, म्हणजे पाण्यात विरघळणारा.
नितिन, तिसरा फोटो कुठला आहे ? प्राचीन बांधकामाचे अवशेष आहेत का ते ?
मला वाटतं तुम्ही ज्या हॉटेलचा
मला वाटतं तुम्ही ज्या हॉटेलचा अनुभव सांगितला आहे - तिथे पाईप्सची लांबी जास्त असल्याने त्यात साठलेले गार पाणी सुरवातीला येऊन मग गरम पाणी येत असणार >>> अगदी असाच अनुभव महाबळेश्वला आला होता, कारण ही हेच होत पाणी वाया जाण्याच.
दा हा रायगडावरचा प्रचि आहे खालच्या बाजुला पोटल्याचा डोंगर दिसतोय.
Pages