निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूर्यकिरण, हे वाळलेल्या नेच्यासारखं दिसतंय. आम्ही त्याला ‘संजीवनी’ म्हणायचो. उन्हाळ्यात पूर्ण वाळून गेल्यासारखं दिसणारं हे झाड पाऊस पडला की परत हिरवंगार होतं. >>>>>>>>पाऊस पडल्यावर हिरवे झालेले पाहीले नाही. पण रस्त्यावर वाळलेली झाडे विकायला असतात. विकणारा एक गुच्छ पाण्यात बुडवून हिरवा झालेला, टपोरा झालेला दाखवत असतो.

छान चर्चा चालू आहे. सगळेच खूप छान माहिती देत आहेत. खूप लेट मी हा ग्रूप जॉईन केला Sad आता सवडीने आधीचे सगळे भाग वाचेन.
आजचा रंग आकाशी म्हणून माझ्याकडून पण एक फोटो.
DSC07005.JPG
फोटो जोधपूर चा आहे. Blue city.

रायगडावरची बाजारपेठ असती तर मी ओळखली असती Happy

सामी स्वागत . फोटोही छान.

मुंबईत झोपडपट्टीत, पावसाळ्यात सर्रास निळे प्लॅस्टीक छपरावर घालतात, तात्पर्य मुंबईपण आकाशातून निळीच दिसेल. ( जिप्स्याने एक फोटो टाकला होता. )

मुंबईत झोपडपट्टीत, पावसाळ्यात सर्रास निळे प्लॅस्टीक छपरावर घालतात, तात्पर्य मुंबईपण आकाशातून निळीच दिसेल. ( जिप्स्याने एक फोटो टाकला होता. ) >>> Lol

ही बाजारपेठ आणि त्यावरची निळाई

गडाची ऊंची, दुसरे काय ? वीज जमिनीत जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग शोधते. म्हणून ऊंच झाडे / इमारती / माणसे Happy यांना धोका असतो.

या सुगरण पक्ष्यांची खासियत म्हणजे प्रत्येकाचे घरटे कसे अगदी एकाच शेपचे. खालचा दांडा कमी जास्त लांबीचा असू शकतो, पण वरच्या घरट्याचा आकार अगदी तसाच, प्रमाणबद्ध. कशी मापे घेत असतील ? नाहीतर
आपण, दोन जणांच्या हातचे अक्षरच काय, लाडू, मोदक, पोळी काहीच एकसारख्या आकाराचे नसते.

अनील, द्राक्षांचा फोटो मस्तच. अगदी वेगळी जात आहे. खायच्या आणि वाईनसाठीच्या जातीत काय फरक असतो?

सोलार कूकरकरता साधारण किती तास उन लागते याबद्दल कुणाला कल्पना आहे का?

माधव, मागच्या पानावर मी इंदूरच्या एका कंपनीची माहिती दिलीय. त्यांच्याकडे चौकशी करता येईल, सोलर कूकरची.

ही माझी विशलिस्ट आहे. सगळे माहितीपट यू ट्यूबवरच आहेत पण सध्या माझे कनेक्श्न तितकेसे फास्ट नसल्याने, नीट बघता येत नाहीत. कुणाला रस असेल तर ...

WILD ASIA - ISLAND MAGIC http://www.youtube.com/watch?v=7u9Co1F9UdY

Natural World - Seychelles Jewels Of A Lost Continent
http://www.youtube.com/watch?v=cyXPxdpZP2Y&feature=related
BBC Natural World - The Falls of Iguacu
http://www.youtube.com/watch?v=N_hmnOK5DYk&feature=related

Natural World - Wild Harvest
http://www.youtube.com/watch?v=pl5HsvPdNn0&feature=related
Natural World - Wild Women Of Viramba
http://www.youtube.com/watch?v=7Qyqs4Y1lns&feature=related
BBC Natural World - The Unnatural History of London
http://www.youtube.com/watch?v=oKl03cXV9Ts&feature=related

BBC Natural World - Cuckoo
http://www.youtube.com/watch?v=3FEX1XtNbwo&feature=relmfu

Natural World - Land Of The Falling Lakes

http://www.youtube.com/watch?v=SoZq0UEdGgo&feature=related
BBC Natural World - Queen of the Savannah [HD]
http://www.youtube.com/watch?v=e82BGIZh7yM&feature=related

Natural World: Tiger Island (BBC)

http://www.youtube.com/watch?v=nHOxXOeCI0Y&feature=related

BBC Natural World - Zambezi
http://www.youtube.com/watch?v=ErC1Vf6Px48&feature=related
Natural World - Wild Ireland
http://www.youtube.com/watch?v=tAAZ7hRf3lU&feature=related

BBC Natural World - Iron Curtain, Ribbon of Life [HD]
http://www.youtube.com/watch?v=XNvKQA_D7SE&feature=related

Natural World - A Wild Dog's Story
http://www.youtube.com/watch?v=MM9UpdypVTY&feature=related

BBC Natural World - Cassowaries
http://www.youtube.com/watch?v=EUyxzAulkGk&feature=related

Natural World - The Orangutan King

http://www.youtube.com/watch?v=DnGiz8Ns0-8&feature=related

Living with Wolves

http://www.youtube.com/watch?v=RWmOtXSAr1M&feature=related

David Attenborough: Death Of The Ocean (BBC Documentary)
http://www.youtube.com/watch?v=2AJNJ5VFwzs

Congo - The River That Swallows All Rivers

http://www.youtube.com/watch?v=GGGcS_MPrW4&feature=related

Congo - Spirits of the Forest
http://www.youtube.com/watch?v=yI1IRWH0uZQ&feature=relmfu

दिनेशदा, आमच्याकडे पण तीच रड आहे.......:अरेरे:
पण ही लिस्ट कॉपी करून घेतलीये.
ईन मीन.. बाजारपेठेचा फोटो मस्त!!

या सुगरण पक्ष्यांची खासियत म्हणजे प्रत्येकाचे घरटे कसे अगदी एकाच शेपचे. खालचा दांडा कमी जास्त लांबीचा असू शकतो, पण वरच्या घरट्याचा आकार अगदी तसाच, प्रमाणबद्ध. कशी मापे घेत असतील ? नाहीतर
आपण, दोन जणांच्या हातचे अक्षरच काय, लाडू, मोदक, पोळी काहीच एकसारख्या आकाराचे नसते. >>>>>>>>>>>>>>> खरेच!!! दोन जणांच्या हातचेच काय एकाच माणसाने केलेले लाडू, मोदक, पोळी सुद्धा एकसारख्या आकाराचे नसतात.

निसर्गात माणूस सोडल्यास सगळेच कसबी कलाकार आहेत.

हॉटेलच असल्याने तिथे कोण असली काळजी करणार - की सुरवातीला २-४ लि पाणी वाया जातंय का २-४ बादल्या वाया जातंय ते !!>>>>>>>>

एकुणच सामाजिक भान कमी असते. जिथे स्वतःच्या खिशातले पैसे पडतात तिथेच लोकं काटकसरीने वागतात. नाहीतर ऑफिसमधे सुद्धा लाईट, पंखे सुरु करता येतात पण त्याच बटणाने बंद करता येत नाहीत. Copier paper, stapler pins, other stationery वाटेल तशी वापरली जाते. अटकाव केला तर "तुझ्या घरचे आहे का?" असे विचारतात.

हॉटेलमधे, समारंभ ठिकाणी जेवताना टिश्यु पेपर देतात. खरच गरज आहे का? घरी काय आपण जेवल्यावर टिश्यु पेपरने हात पुसतो का?
बुफे जेवणातून अन्न वाया जाणार नाही अशी कल्पना होती. प्रत्यक्षात नासधूसच जास्त होत असते.

पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय शिल्लक ठेवणार?

बुफे जेवणातून अन्न वाया जाणार नाही अशी कल्पना होती. प्रत्यक्षात नासधूसच जास्त होत असते. >>> मध्यंतरी एका भारतीय माणसाची मेल होती - जर्मनीत हॉटेलमधे जेवण झाल्यावर काही अन्न शिल्लक राहिले - ते तसेच ठेऊन निघाले हे बघताच शेजारच्या टेबलावरील दोन आजीबाईंनी पोलिसांना फोन करुन बोलावले व हे अन्न वाया घालवणार्‍याला जागच्या जागी दंड द्यावा लागला - काहीही करुन अन्नाची नासाडी वाचवलीच पाहिजे...

मागे आम्ही एका हॉटेलमधे पाहिले एका कुटुंबाने जेवण झाल्यावर उरलेले चांगले अन्न पॅक करायला सांगितले - थोडी ओळख असल्याने मी त्याबद्दल त्यांना विचारले - आमच्या कॉलनीच्या जवळच जी एक गरीब वस्ती (अगदी रस्त्यावरच असतात बिचारे लोक ते) आहे ती दाखवून त्यांना ते अन्न देतो असे सांगितले - व मलाही खूप बरे वाटले व हा मार्गही योग्य वाटला.

आफ्रिकेत सर्रास टिश्यू पेपर वापरला जातो. तो करतात वेस्ट पेपरपासूनच पण त्यासाठी खुप प्रमाणात ब्लीच आणि पाणी वापरावे लागते. स्थानिक लोकांचे त्याशिवाय अजिबात चालत नाही. युरोपियन वसाहतवाद्यानी हा
वारसा ठेवून दिलाय त्यांच्यासाठी.

पूर्व आफ्रिकेतल्या गुजराथी समाजाच्या जेवणावळी हा पण असाच एक इश्यू होता. ( त्यासाठी स्थानिक लोकच राबतात ) सरकार त्यावर बंदी घालू शकले नाही, पण निदान दारे ऊघडी ठेवू नका, असा नियम मात्र केलाय.

अगदी साधे जेवण जेवून ( बिन तेलाचे / मसाल्याचे ) स्थानिक लोक काटक आणि कणखर आणि भरपूर तेल / तूप / मसाले वापरुन, तड लागेस्तो जेवणारे भारतीय, मात्र रोगजर्जर. अशी परिस्थिती आहे तिथे.

वरचे सगळे वाचले, असे अनुभव रोज येतात...

आणि असे अनुभव आले की वाटते आपण इतरांवर विषेशत: राजकारण्यांवर टीका करतो की ते देशाची वाट लावताहेत, आपण देशाचे कितपत जतन करतोय?? त्यांना जसे जमतेय तशी वाट ते लावताहेत, आपले काय? आपण कधी वाहता नळ बंद करायला शिकणार? घरात एका खोलीतुन दुस-यात जायच्या आधी लाईट फॅन बंद करणार? ऑफिसात कॉम्प्युट्र स्क्रिन बंद करुन जेवायला जाणार? घरात उगीचच चार चपात्या जास्त करायचे बंद करणार? किंवा चार चपात्या उरल्यात, आज नको हॉटेलात जायला, आहे ते संपवुया आधी हा विचार करणार????

आपण निसर्गाचे जतन करतो म्हणजे काय तर दुस-याच्या दारातली रोपे गुपचुप उपटुन आणतो आणि ती आपल्या दारात लावतो, ह्या उपटाउपटीत दोन्चार रोपे मेली तरी आपल्याला काही वाटत नाही. माझे झाड जे माझ्या दारात/कुंडीत आहे ते मी जतन करेन. शेजा-याच्या कुंडीतले झाड सुकुन जात असले तरी मी पाणी घालणार नाही ही आपली वृत्ती....

साधनाने पिनपॉईंट केलंय अगदी ..... मागे आपण सार्‍यांनी मिळून एक लिस्टच केली होती अशा वेगवेगळ्या गोष्टींची....

भारतात निदान पेट्रोल व डिझेल तरी कमी वापरतात - पण अमेरिकेत एका कारमधे एकच व्यक्ति - असे हजारो, लाखो कारचालक - दररोज शेकडो मैलाचा प्रवास करतात - हे बघून माझा तरी जीव कळवळलाच - आहेत आपल्याकडे भरपूर पैसे म्हणून काय मर्यादित इंधन एवढे जाळून नष्ट करायचे - पुढच्या पिढीचा, निसर्गाचा आपण नाही तर कोण विचार करणारे ?? हे प्रश्न मी अमेरिकेत तिथल्याच माणसाला विचारल्यावर तो म्हणालाही - खरंच याच्यावर आता विचार नाही तर झडझडून कृती करायची वेळ आलीये .... त्या बिचार्‍याचा जावई इराकमधे अमेरिकन सैनिक असल्याने त्याला ते फारच जाणवले...

आजचा रंग पिवळा

बुफे जेवणातून अन्न वाया जाणार नाही अशी कल्पना होती. >>>> आपल्याकडे उरलेले अन्न गोळाकरुन गरजु लोकांना देणारी एक संस्था मुंबईत आहे , त्याची जर अधिक माहीती असल्यास कळवावी.

जागु,ईनमीनतीन,
सर्व फोटो सुंदर आलेत

दिनेशद,
छान,नविन माहिती मिळाली

अनील, द्राक्षांचा फोटो मस्तच. अगदी वेगळी जात आहे. खायच्या आणि वाईनसाठीच्या जातीत काय फरक असतो?
माधव,
वाईनचे द्राक्षे खायला चालतात पण थोडीशी चव वेगळी वेगळी,रंगानी मात्र काळसर-जांभाळ्या असतात्,
बागेत बाहेरच्या नर्सरीमधुन शेतकरी जेव्हा हजारो (वेलींपासुन काढलेल्या) काड्या (कलम) लावतो,त्यात काही अशा काही वेगळ्या जातीचेही वेली येतात.
सांगली भागात खाण्याच्या द्राक्षामध्ये मुख्यतः थॉमसन्,सोन्नाका,तास-ए-गणेश या जाती लावल्या जातात.

आज-काल कुणालाच कुणाच्या सुख -दुखात इंटरेस्ट नसतो. पण हा नवरात्रोत्सव खूप छान आणि जवळचा वाटतो साजरा करायला.
नवरात्रीच्या निमित्ताने का होईना ऑफिसमध्ये रोज नवीन रंग परिधान करून जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो.
माणूस मनाने एकत्र कधी येणार कुणाच ठाऊक, पण तो या सणासाठी एकाच रंगात रंगून एकत्र येतो हे मात्र खरे.
म्हणूनच तर प्रत्येकाने प्रत्येक सण हा सुखासुखी साजरा करायला हवा .
माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाला आणि सर्व वाचकांना
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा .....!!!!!!

अनिल, द्राक्षे खाण्याची पद्धत आपल्याकडेच, युरोपात द्राक्ष तशीच, फार कमी लोक खातात. बहुतांशी वाईनसाठीच वापरतात.

तिथे द्राक्षातील साखरेचा वापर करुन जॅम, सापा सारखे पदार्थ करतात. त्यात वेगळी साखर घालावी लागत नाही.

अनुप,

नवरात्रीच्या शुभेच्छा !

Pages