शंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत

Submitted by चिंतातुर जंतू on 13 October, 2012 - 05:33

वृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा. ह्या दुव्यावर काही जुन्या वृत्तपत्रांची स्कॅन केलेली पानं मला सापडली, पण बर्‍याच पानांवरचा मजकूर वाचता येत नाही आहे, अन् जो वाचता येतो आहे त्यातला काळ अगदी सुरुवातीचा आहे (केसरीचा पहिला अंक वगैरे), किंवा अगदी नंतरचा आहे. मला विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे नमुने हवे आहेत (सुमारे १९००-१९२०). धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>विश्रामबागवाड्यात सरकारी ग्रंथालय आहे. तिथे तुम्हांला जुने अंक बघायला मिळतील.<<

धन्यवाद. तो उपाय तर आहेच, पण सॉफ्ट कॉपी मिळाली तर शेअर करायला किंवा वापरायला सोपी जाईल म्हणून हवी आहे.

१९०९ सालची बेळगाव येथील खबरदार वृत्तपत्राची प्रत (फेसबुकावरून) - मजकूर मोडी लिपीत असल्यामुळे वाचता आला नाही : http://sphotos-a.xx.fbcdn.net/hphotos-ash3/c0.0.403.403/p403x403/545840_...

>>१९०९ सालची बेळगाव येथील खबरदार वृत्तपत्राची प्रत (फेसबुकावरून) - मजकूर मोडी लिपीत असल्यामुळे वाचता आला नाही <<
हो मलाही ही सापडली होती आणि मोडीत असल्याकारणानं तिचा काही उपयोग झाला नाही.

सकाळ मधे (की लोकसत्तात?) पन्नास वर्षांपूर्वी असे सदर असायचे, त्यात पन्नासवर्षापूर्वीची ठळक बातमी थोडक्यात असायची. व्रुत्तपत्र कार्यालयातूनच तुम्हाला काही मिळाले तर मिळू शकेल असे वाटते. लायब्ररीचा उपाय आहेच, पण मग सोबत फोटो कॅमेरा वगैरे हवे.
पूर्वी बातमी ही केवळ "एक महत्वाची घटना लोकांस माहिती व्हावी" याच हेतूने दिली जायची, हल्लीसारखे भडकाऊ - भावना चाळविणार्‍या पोलिस टाईम्स सारख्या शब्दरचना/हेडीन्ग्स नसायची. तसेच संपादक त्याचे मत स्वतंत्ररित्या संपादकीयात वा अग्रेलेखात माण्डायचा ते ही स्पष्टपणे, हल्लीसारखी शब्दान्ची फिरवाफिरवी नसायचीच, व बातमी मधे देखिल संपादकाच्या/बातमीदाराच्या मताचा/धोरणाचा मागमूसही नसायचा.
हल्लीप्रमाणे "जनतेच्या मागणिनुसार" वा "सामान्यजनांच्या प्रतिक्रियानुसार" जिथे पुरावे द्यायची गरज नाही असे दाखले देऊन स्वतःचे मत बातमीमधे घुसडविण्याचा प्रकार पूर्वी नव्हता. स्वतःचे मत स्वतंत्ररित्या स्पष्टपणे रोखठोक मांडले जायचे.
हल्लि सारखा भाषेतील वृत्तपत्रीय "ढोन्गीपणा" तेव्हा नव्हता.